Thursday, November 30, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

तुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते

How to Increase Child Brain Power

पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. वाचन या प्रकाराला घरातील लहान मुलेही अपवाद नव्हती. लहान मुलांसाठी खास चंपक, चांदोबा, ठकठक, इसापनीती, इ. अनेक गोष्टींची पुस्तकं तेव्हा लोकप्रिय झाली होती. मुलांमध्ये गोष्टीची पुस्तके वाचण्याची आवड निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे बाळ साधारणतः दोन अडीच वर्षांचं झालं की त्याला झोपताना गोष्ट सांगितली जाते.

तुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते – How to Increase Child Brain Power

How to Increase Child Brain Power
How to Increase Child Brain Power

पूर्वी एकत्र कुटुंबात आजी, आजोबा, काका, काकू यापैकी कोणी ना कोणी सगळ्या मुलांना गोष्ट सांगून झोपवण्याची जबाबदारी पार पाडत असे. पुढे काळ बदलला. एकत्र कुटुंबाची व्यवस्था हळूहळू मागे पडली परंतु मुलांना झोपताना गोष्ट सांगायची प्रथा मात्र अजूनही बहुतांश कुटुंबांमध्ये चालू आहे.

आजच्या डिजिटल जमान्यात तर, ‘बेड टाइम स्टोरीज’ साठी खास ऑडिओ / व्हिडीओ देखील निघाले आहेत. प्ले स्टोअर मध्ये यासाठी काही अ‍ॅप देखील उपलब्ध आहेत. परंतु, यापेक्षा मुलांना गोष्ट रंगवून सांगितली तर त्याचे अनेक फायदर आहेत.

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार बाळ जन्मल्यापासून त्याच्याशी बोलणे, त्याला गोष्टी सांगणे, अशा गोष्टींमुळे बाळाच्या मेंदूची शक्ती वाढते. लहान बाळांशी सतत संवाद साधल्यामुळे त्यांच्या शब्दसंग्रहात वाढ होते आणि लहान वयातच त्यांना भाषेची चांगली ओळख होते.

ज्या मुलांचा आपल्या पालकांशी असलेला संवाद अतिशय कमी होता, अशी मुले भाषेच्या चाचणीमध्ये मागे पडल्याचे निरदर्शनास आले आहे. ज्या अपंग मुलांसमवेत त्यांचे पालक सतत राहत असतात त्यामुळे शालेय जीवनात अशी मुले जास्त हुशार असतात.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक अ‍ॅने फर्नाल्ड यांच्या मते, लहान मुलांशी संवाद साधल्यामुळे त्यांना अगदी लहान वयातच भाषेचे नियम आणि लय समजण्यास मदत होते. याचबरोबर त्यांना जगराहाटी समजून घेणेही सोपे जाते.

गोष्ट ऐकताना अनेकदा मुले त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या गोष्टींच्या संदर्भात काल्पनिक चित्रे मनात रंगवत असतात. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते त्याचबरोबर मुलांची आकलनशक्तीही वाढते.

“शिकागो येथे अमेरिकन असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक सभेमध्ये फेरनाल्ड यांनी सांगितले, “आपण लहान मुलांशी त्यांच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून बोलायला हवे. यामुळे मुलांची मानसिक वाढ चांगली होते आणि वैचारिक वाढीस एक दिशा प्राप्त होते”. प्रगल्भ विचारसरणीमुळे माणूस आयुष्यात यशस्वी होतो. आपल्या वैचारिक धोरणांमुळे वर्तमान आणि भविष्याचे नियोजन सहजपणे करू शकतो.

फर्नाल्डने यांनी एक गमतीशीर प्रयोग केला होता. ज्यामध्ये त्यांनी मुलांच्या भाषा कौशल्यांची चाचणी केली. त्यापैकी एका चाचणीत, छोट्या बाळांना त्यांच्या पालकांच्या मांडीवर कॉम्प्यूटरसमोर बसवले होते. ज्यात शेजारी शेजारी ‘बाळ’ आणि ‘कुत्र्याचे’ चित्र होते.

“बाळाकडे पहा” किंवा “कुत्र्याकडे पहा” असे सांगितले तेव्हा मुलांनी आपली नजरे चुकीच्या प्रतिमेवरुन कशी हलविली हे नोंदविण्यासाठी स्लो-मोशन व्हिडिओ कॅमेर्‍याचा उपयोग करण्यात आला. यामध्ये जवळपास निम्मा वेळ बाळं आधीपासूनच योग्य प्रतिमेकडे बघत होती. या प्रयोगामुळे प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला गेला. यामध्ये छोट्या वयाच्या बाळांनी योग्य चित्राकडे पाहण्यासाठी काही वेळ घेतला होता.

परंतु जसजसे त्यांची भाषा कौशल्ये विकसित होत गेली तसतसे त्यांनी ‘बाळ’ किंवा ‘कुत्रा’ हा शब्द पूर्ण होण्यापूर्वीच योग्य प्रतिमेकडे पाहिले होते. याच प्रयोगामध्ये अजून एक गोष्ट फर्नाल्ड यांना आढळली, ती म्हणजे, जलद प्रतिक्रिया देणाऱ्या बाळांपेक्षा इतर बाळं योग्य चित्र शोधण्यासाठी 200 मिलिसेकंद इतका जास्त वेळ घेत होती. यामध्ये बाळांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लावलेल्या वेळामधला फरक जरी किरकोळ असला तरी शालेय जीवनातील मुलांच्या बुद्धिमत्तेवर याचा तीव्र परिणाम होतो.

यामध्ये सहभागी झालेल्या बाळांचे पालक त्यांच्याशी किती वेळ बोलतात याचाही अभ्यास करण्यात आला. जेव्हा पालक मुलांबरोबर अधिक संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मुलांच्या भाषेच्या ज्ञानामध्ये सुधारणा होते आणि त्यांना नवीन शब्द शिकायला मिळतात. काही मुले पाच वर्षांच्या वयाच्या मानाने त्यांच्या समकालीन मुलांपेक्षा शब्दभांडार आणि स्मरणशक्तीच्या बाबतीत तल्लख असल्याचे आढळून आले. या मुलांची स्मरणशक्ती आणि शब्दभांडार सात वर्षांच्या मुलाएवढे असल्याचे आढळून आले.

फर्नाल्ड यांनी सांगितले की पालकांसोबतच्या संभाषणाला मुलांना टीव्हीसमोर बसवणे, त्यांना खेळायला आयपॅड देणे हा पर्याय असूच शकत नाही. पालकांनी मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. जर पालकांचा मुलांशी सुसंवाद नसेल किंवा तो अत्यंत कमी असेल तर याच परिणाम मुलांची विकासावर होत असतो. मुलांना भरवताना, आंघोळ घालताना किंवा त्याला कपडे घालताना त्यांच्याशी बोला. हा संवादा मनमोकळा असायला हवा.

फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ प्रो एरिका हॉफ म्हणाल्या की पालकांनी त्यांचे संभाषण साध्या बाळांच्या बोलण्यापुरते मर्यादित ठेवू नये. मुलांची भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या शब्दांचा आणि वाक्यरचनेचा वापर करा यामुळे मुलांची ग्रहणशक्ती वाढेल, इतकंच काय तर ते एक चांगला श्रोता बनू शकतील.

Editorial team

Editorial team

Related Posts

फक्त ३५० रुपयांसाठी केली हत्या, आणि नंतर हत्यारा नाचायला लागला!
Viral Topics

फक्त ३५० रुपयांसाठी केली हत्या, आणि नंतर हत्यारा नाचायला लागला!

भारताच्या राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये एक धक्कादायक, आणि अंगावर काटे येतील अशी गोष्ट घडली आहे. फक्त ३५० रुपयांसाठी एका युवकाची...

by Editorial team
November 27, 2023
हिवाळ्यात ह्या चुका करू नका…
Viral Topics

हिवाळ्यात ह्या चुका करू नका…

हिवाळा म्हणल कि डोक्यात येतात ते म्हणजे गरम गरम पदार्थ, अत्यंत थंडी, आणि गरम कपडे. पण त्यासोबत येतात ते म्हणजे...

by Editorial team
November 27, 2023
या राशीची व्यक्ती आपल्या पार्टनर ला कधीही धोका देत नाहीत….
Viral Topics

या राशीची व्यक्ती आपल्या पार्टनर ला कधीही धोका देत नाहीत….

आपल्या जीवनावर वास्तुशास्त्र किवा ज्योतिषशास्त्र याचा कुठेना कुठे काहीतरी प्रमाणात प्रभाव पडत असतो. प्रत्येक राशी एकमेकांनसोबत जुळून घेईल कि नाही...

by Editorial team
November 26, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved