उत्तम बायोडाटा म्हणजे Resume कसा तयार करावा?

How to Make Resume

जर तुम्ही नुकतच तुमचं Graduation पूर्ण केलं आणि जॉब च्या शोधात असाल. तर तुम्हाला तुमचा एक Resume तयार करावा लागेल ज्यामध्ये तुमचं शिक्षण, आवड, व्यावसायिक कौशल्य, तुमचे Achievements हे सगळ नमूद केलेलं असेल.

Resume ला बायोडाटा देखील म्हणतात. तुमचा बायोडाटा म्हणजेच Resume नोकरी साठी तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसाच असतो. म्हणून तुमचा Resume प्रभावशाली आणि तुमच्या बद्दल पुरेशी माहिती देणारा हवा तरच तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य Resume कसा लिहावा हे फार महत्वाचे असते आणि त्याचीच चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

उत्तम बायोडाटा म्हणजे Resume कसा तयार करावा? – How to make Resume for Job Fresher

How to make Resume for Job Fresher
How to make Resume for Job Fresher

१. सर्व प्रथम resume ची रचना कशी असेल ते ठरवा –

आजकाल resume तयार करण्यासाठी वेगवेगळे word processor सॉफ्टवेयर वापरतात त्या सॉफ्टवेयर मध्ये काही templete असतात जे तुम्ही resume लिहण्यासाठी वापरू शकतात.

तुमचा resume दिसायला आकर्षक दिसला पाहिजे असा template तुम्ही निवडला पाहिजे किवा तुम्ही इंटरनेट वरून पण एखादे template डाऊनलोड करू शकतो. माहिती type करताना योग्य font size चा वापर केला पाहिजे.

२. तुमचे नाव, पत्ता मोबाइल नंबर आणि इ-मेल लिहण्यासाठी HEADER चा वापर करू शकता –

पानाच्या सर्वातवरच्या भागावर आपले नाव लिहा तसेच पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल हे सुद्धा तुम्ही वरच्या भागात नाव खाली लिहावे. इथे पाहिजे तशी पद्धत तुम्ही वापरू शकता जशे कि पत्ता हा डाव्या बाजूला आणि मोबाईल नंबर आणि इ-मेल उजव्या बाजूला किवा सर्व माहिती आपण center मध्ये सुद्धा लिहू शकता .

नाव नेहमी center मध्ये असल पाहिजे आणि मोठ्या आणि bold अक्षरात असला पाहिजे.

३. थोडक्यात आणि आकर्षक शब्दात resume चा सारांश आणि उद्देश लिहा –

Resume चा सारांश हा तुमचे कौशल्य आणि अनुभवाचे मोजक्या शब्दात केलेले विवेचन असते. तसेच तुम्ही या नोकरी साठी किती अनुकुल आहात हे तुम्हाला carrier objective मध्ये लिहायचे आहे.

४. तुमची सॉफ्ट आणि हार्ड स्किल्स चा उल्लेख करा –

तुम्ही तुमच्या resume मध्ये तुमचे हार्ड स्किल्स म्हणजे ते गुण आणि कौशल्य जे तुम्हाला शैक्षणिक जीवनात आत्मसात केले आहे त्याचा तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे. त्याचप्रमाणे सॉफ्ट स्किल्स म्हणजे जे तुम्हाला कोणी शिकवले नाही ते तुमच्या व्यक्तिमत्वचा भाग आहे अशे काही गुण व कौशल्य तुम्हाला तुमचा resume मध्ये लिहायचे आहे.

५. तुमच्या कामाच्या अनुभवाचे विवरण करा –

तुम्हाला तुमच्या कामाचे विवरण उलट्या क्रमाने लिहायचे आहे सर्वात आधी तुम्ही नुकतीच जी नोकरी केली त्याचा अनुभवाचा कालावधी आणि त्या संस्थेत तुमचे पद. त्या त्यानंतर त्या आधी जी नोकरी केली त्याचे असेच विविरण करायचे आहे. त्याच प्रमाणे एखाद्या नोकरी करत असताना तुम्ही एखाद्या बाबतीत यश संपादन केले असेल तर त्याच्या ही तुम्हाला उल्लेख करायचा आहे.

६. शैक्षणिक माहितीचे विवरण करा –

तुमच्या Resume मध्ये तुम्ही शैक्षणिक माहितीचे जे विवरण करता ते फार महत्वाचे असते. शैक्षणिक माहितीचे विवरण देताना तुम्ही कोणत्या वर्षी कोणती परीक्षा कोणत्या महाविद्यालयातून उतीर्ण केली याची संपूर्ण माहिती तुम्हाला लिहावी लागते.

तुम्ही जर academics सोडून जर दुसरे कोणते कोर्सेस केले असतील तर तुम्हाला त्याचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. शैक्षणिक जीवनात तुम्हाला काही पारितोषिक मिळाले असतील तर त्याचा उल्लेख तुम्ही नक्कीच केले पाहिजे.

७. छंद आणि आवडीचा उल्लेख करा –

तुमच्या resume मध्ये आवड आणि छंदाचा उल्लेख करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहे हे समजण्यास मद्दत करते. पण उगाचच काही पण आवड आणि छंद लिहू नका. कारण तुमच्या मुलाखतीच्यावेळस तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

८. Resume मध्ये व्याकरणाशी संम्बंधित चुका नसायला पाहिजे –

तुम्ही एका नोकरी साठी आवेदन करत आहेत म्हणून तुम्ही सुशिक्षित व्यक्ती आहात. अस असेल तर तुमच्या resume मध्ये कोणत्याच प्रकारच्या व्याकरणाच्या चुका असता कामा नये. resume लिहून झाल्यावर तुम्ही त्याला परत तपासले पाहिजे की त्याच्यात काही व्याकरणाच्या चुका तर नाहीना.

९. Job प्रमाणे आपल्या resume ला एडीट करा –

एकदा resume तयार झाला की तुम्ही job description वाचून त्याची तुम्ही एडिटिंग केली पाहिजे. job description प्रमाने तुम्ही आवश्यकते बदल resume मध्ये केले पाहिजे.

FAQ

१. Resume मध्ये तुमचा नाव आणि पत्ता कुठे असयला पहिजे?
उत्तर: Resume मध्ये तुमचा नाव आणि पत्ता पानाच्या सुरवातीला एकदम Header position ला असला पाहिजे.

२. Resume लिहिल्यावर आपण त्याला रिचेक का केले पाहिजे?
उत्तर: Resume लिहिल्यावर आपण त्याला रिचेक केले पाहिजे ज्याने करून त्याच्यात काही व्याकरणाशी संबंधी चुका दुरुस्त करता येतील.

३. Resume मध्ये आवड आणि छंद लिहताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
उत्तर: प्रत्येक व्यक्तीचे काही आवड आणि छंद असतात आपण ते resume मध्ये प्रामाणिकपणे लिहीले पाहिजे पण खोटी माहिती देता कामा नये कारण नोकरीच्या मुलाखातीवेळेस आपला resume interviewer कळे असतो आणि तो त्या संबंधित प्रश्न आपल्याला विचारू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top