Internet Speed Slow in Rainy Season
आज संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे. इंटरनेटमुळे आज जगातील कान्याकोपऱ्यात असलेल्या मित्रांशी आपण गप्पा मारू शकतो, सोबतच संपूर्ण जगातील घडामोडी इंटरनेट मुळे सेकंदात आपल्या समोर येतात. आज प्रत्येक मोबाईल किंवा कॉम्प्युटर चा आत्मा इंटरनेट होऊन बसला आहे, इंटरनेट मुळे आज प्रत्येक गोष्ट सोपी झाल्यासारखे वाटते आणि त्याचा वापर जगातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती करायला शिकला आहे.
आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण लगेच इंटरनेट वर जातो आणि माहिती मिळवतो. आणि इंटरनेट ची स्पीड जेवढी जास्त चांगली असेल तेवढीच इंटरनेट वापरण्याची मजा जास्त असते. पण आपण पाहिलं असेल की पावसाळ्यात इंटरनेट ची स्पीड अचानक कमी होताना आपल्याला दिसून येते, तर हे असे का होत असेल बर, पावसाळ्यातच इंटरनेटची स्पीड अचानक कमी होताना आपल्याला का दिसून येते, तर चला आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की पावसाळ्यात इंटरनेट ची स्पीड कमी होण्याचे काय कारण आहे? तर चला पाहूया..
पावसाळ्यातच इंटरनेटची स्पीड कमी का होते – Internet Slow During Rain
सर्वात पहिले आपण समजून घेऊया की आपल्याला इंटरनेट कशा प्रकारे मिळते आपण इंटरनेटचा वापर आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये करत असतो. इंटरनेट आपल्याला सिग्नलच्या माध्यमातून मिळत असते. आणि सिग्नल रेडिओ व्हेव च्या माध्यमातुन. जेव्हा वातावरण साफ असते तेव्हा इंटरनेट चे सिग्नल आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर पर्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊन जातात, आणि आपण त्याचा चांगल्या स्पीड ने वापर सुध्दा करतो, याचा अर्थ असा की वातावरणात जेव्हा पाण्याची मात्रा कमी असते तेव्हा रेडिओ व्हेव आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर पर्यंत कोणत्याही अडथळ्या शिवाय येऊन आपल्याला इंटरनेट ची स्पीड चांगली मिळण्यास मदत करतात.
पण तेच पावसाळ्यात आपल्याला इंटरनेट ची स्पीड कमी अनुभवायला मिळते, त्यामागे काय कारण असणार तर चला ते सुध्दा पाहूया, पावसाळ्यात इंटरनेट ची स्पीड कमी व्हायचं कारण आहे की जेव्हा हवेमध्ये पाण्याची मात्रा वाढते तेव्हा इंटरनेट च्या सिग्नल ला म्हणजेच रेडिओ व्हेव्स ना हवेतून ट्रॅव्हल करण्यास कठीण जाते आणि त्यामुळे आपल्या इंटरनेट ची स्पीड आपल्याला कमी होताना आढळते कधी कधी तर इंटरनेट मिळतच नाही.
आपण इंटरनेट हे फक्त एक उदाहरण म्हणून पाहिले, आपल्याला माहीतच आहे पावसाळ्यातील वातावरणामुळे घरातील डिश अँटीना सुध्दा व्यवस्तीत रित्या सिग्नल पकडत नाहीत आणि आपल्या टीव्ही वर नो सिग्नल लिहून येते, त्यामध्ये सुध्दा ह्याचप्रकारची समस्या पाहावयास मिळते, पण तेच जेव्हा वातावरण साफ असत हवेमध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी नसत त्यावेळी इंटरनेटचे सुध्दा सिग्नल असतं आणि टीव्हीचे सुध्दा.
तर या लेखाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती झालीच असेल की कोणत्या कारणामुळे पावसाळ्यात इंटरनेट च्या स्पीड मध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!