इंपोर्टेंस ऑफ़ टाइम मैनेजमेंट

Importance of Time Management

अस म्हणतात कि वेळेची किमंत केली तर वेळ आपली किमंत करेल.

या वाक्यातून आपल्याला वेळेचे महत्व कळले असेलच, कि आपल्या जीवनात वेळेला किती अनन्यसाधारण महत्व आहे.

तसेच गेलेली वेळ सुद्धा पुन्हा येत नाही. त्यासाठी आपल्या जवळ असलेल्या वेळेची किंमत केली पाहिजे.

निसर्गाने पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला दिवसाचे २४ तासच दिले आहे.त्यामध्ये मनुष्य सुद्धा आहे, तसेच जगाच्या पाठीवर कोणीही असो त्याला जवळजवळ एका दिवसात २४ तासांचाच कालावधी दिला आहे, त्या २४ तासांमध्ये आपण काय करता हे आपल्यावर निर्भर आहे.  त्या वेळेचा वापर आपण कश्या प्रकारे करता हे सुद्धा आपल्यावरच अवलंबून आहे.

असे तर नाही आहे कि जो सर्वात श्रीमंत आहे त्याला बाकी लोकांपेक्षा जास्त वेळ भेटत असेल आणि जो गरीब आहे त्याला त्यापेक्षा कमी.

वेळेचा योग्य उपयोग केला तर जीवनात कोणताही व्यक्ती अपयशी राहू शकत नाही हे मी विश्वासाने सांगू शकतो.

आपल्याला जीवनात यशाच्या शिखरावर पोहचायचे असेल तर वेळ हि त्या शिखरावर पोचण्यासाठीच्या पायर्यांमधली एक पायरी आहे.

जर आपण त्या पायरी वरून चांगल्या प्रकारे सर झाले तर यश आपल्या पायाजवळ असेल.

Time Management

इंपोर्टेंस ऑफ़ टाइम मैनेजमेंट – Importance of Time Management in Marathi

कोणी तरी मला विचारले कि या आभासी जगात तुझं असं कोण आहे ?

मी त्याला उत्तर दिले,

वेळ !

कारण जर वेळ चांगली आहे तर कोणीही मला विचारेल आणि वाईट असेल तर कोणीही नाही.

तर चला मित्रहो या वेळेला वाचाविण्यासाठी आपण यावर काही टिप्स पाहू. जेणेकरून आपण आपला वेळ हा चांगल्या मार्गी लाऊ शकू.

१) एका वेळी एकाच कामावर लक्ष द्या – Focus on one task at a time.

बरेच लोक हा विचार करतात कि आपण एकापेक्षा जास्त काम करून आपल्या वेळेला वाचवू शकतो.

पण काही शोधांमध्ये असे समोर आले आहे कि आपण दोन्ही काम सोबत केल्याने होते असे कि आपल्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते.

आणि आपण काम करताना जेवढा वेळ लागणार असतो त्यापेक्षा जास्त वेळ लागून जातो. म्हणून एकावेळी एकच काम करावे.

२) अनावश्यक कामे टाळा – Avoid unnecessary tasks

धावपळीच्या या जीवनात मनुष्याला आज आपला वेळ वाचवणे खूप महत्वाचे झाले आहे, जर आपण आपला वेळ वाचवण्यात यशस्वी ठरले तर आपण बऱ्याच उपलब्धी आपल्या नावावर करू शकता.

दैनिंदीन जीवनात बरेच असे कामे असतात ज्या कामांना एवढे महत्व नाही दिले तरीही चालते.

वेळ वाचविण्यासाठी आपण अनावश्यक कामांना टाळणेच योग्य ठरेल. ज्यामुळे आपण त्या वेळेला आपल्या परिवाराला किंवा आपल्या कामाला देऊ शकाल.

३) गॅजेट्स वापरा – Use gadgets

तंत्रज्ञानामुळे माणसाची बरीच प्रगती झाली आहे. माणसाचे जे काम होण्यास तासोंतास लागत असत,

आज तंत्रज्ञानामुळे ते अवघ्या काही मिनिटात होतात.

गॅजेट्स मुळे आपण आपला बराच वेळ वाचवू शकतो. आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे मनुष्याचे जीवन बऱ्यापैकी सोपी झाले आहे. मनुष्याला जर त्याचा आणखी वेळ वाचावा असे वाटत असेल तर त्याने त्याच्या जीवनात गॅजेट्स वापरायला काही हरकत नाही. जेणेकरून आपण आपला वेळ चांगल्या प्रकारे वाचवू शकू.

४) सोशल मीडिया चा वापर टाळां! – Avoid the use of social media!

सोशल मीडिया म्हणजे एक आभासी जग आहे. आणि आजकाल बरेच लोक त्याच्या आहारी सुद्धा गेले आहेत.

त्यांच्या दिवसाची सुरुवात हि सोशल मिडियाने च होते, आणि दिवसाचा अखेर सुद्धा शोशल मिडियाने च !

शोशल मिडिया वर एखादी गोष्ट पहिली कि आपण आणखी त्या गोष्टी मध्ये चुरस घ्यायला लागतो.

असे करता करता कधी आपले तासोंतास निघून जातात आपल्याला सुद्धा कळत नाही.

या गोष्टीमुळे आपला वेळ हा खूप वाया जाताना आपल्याला दिसेल. मग आपण म्हणणार कि मग आम्ही काय आमचे शोशल मिडिया वरचे खातेच डिलीट करून टाकायचे कि काय?

तर तसे काहीही करायला मी आपल्याला सांगणार नाही. मी आपल्याला एवढच सुचवेन कि आपण आपला वेळ हा आपल्या कामाला द्या जेणेकरून आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकाल आणि शोशल मिडिया चा वापर हा आपल्या गरजेनुसार करा.

कारण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली तर त्या गोष्टीचे विषामध्ये रुपांतर होत असते. म्हणतात ना “अति तिथे माती.”  असेच काही तरी.

५) जिथे वेळ भेटेल तिथे कार्य करा – Work where the time comes

वेळेचा सदुउपयोग करायला जो व्यक्ती शिकला. तो जगात कोणत्याही कोपर्यात आपले नाव उंचावू शकतो.म्हणून वेळेचे भान ठेवून कार्य करायला हवे.

बरेच वेळ आपण प्रवासात असतो आणि विचार करतो कि आपले ऑफिस चे काम किंवा पर्सनल काम हे घरी गेल्यावर करू,

पण माझे आपल्याला एवढेच सांगणे आहे कि वेळ मिळण्याची वेळ पाहू नका वेळेचा पुरेपूर वापर करायला शिका आणि तुम्हाला जिथे फावला वेळ मिळेल तिथे आपल्या कामाला लागा. जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही.

आणि बऱ्यापैकी तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकाल.

६) झोपेची गुणवत्ता वाढवा – Increase sleep quality

 सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली झोप आहे, कामाला तर आपण आपला पुरेपूर वेळ देतोच.

सोबतच आपण आपल्या झोपेला सुद्धा योग्य ती वेळ दिली तर आपले मन आपल्या कामात चांगल्या प्रकारे लागू शकेल,

नाहीतर होईल असे कि आपण वेळ वाचवण्याच्या नादामध्ये आपल्या झोपेला पुरेसा वेळ देणार नाही आणि त्यानंतर आपले लक्ष हे आपल्या कामात लागणार नाही म्हणून आपण आपल्या झोपेला योग्य ती वेळ देऊन झोपेची गुणवत्ता वाढवली तर बर होईल.

७) मोबाईल मधील गेम्स डिलीट करा – Delete Games in Mobile

माझ्या या मुद्याला बरेच लोक त्यांची असहमती दाखवतील आणि मला बरेच लोकांचे नकारात्मक अभिप्राय सुद्धा येतील, पण हो मी माझ्या बाजूला राहणाऱ्या लोकांना बघितलं आहे जे त्यांच्या मोबाईल मध्ये चार-चार गेम्स ठेवतात आणि त्या गेम्संना ते दररोज खेळतात सुद्धा !

गेम्स मुळे तुमचे मनोरंजन होते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, परंतु आपला जास्त वेळ सुद्धा गेम्स मुळेच वाया जातो.

तर असे ठरवा कि आपण आठवड्यातून एकच वेळ गेम्स खेळणार ते हि फावल्या वेळामध्ये. या मुळे आपण आपला बराच वेळ वाचवू शकता.

८) वेळेचे नियोजन करा – Schedule time

कोणतेही कार्य प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी नियोजन करणे खूप आवश्यक आहे.

नियोजना शिवाय कोणतेही कार्य योग्य प्रकारे अखेरीस जाऊ शकत नाही.

आपण आपल्या वेळेचे योग्य नियोजन केल्यावर आपल्याला कळेल कि आपण आपला वेळ कुठ जास्त देत आहोत आणि कुठ कमी, त्यावर विश्लेषण काढून आपण ठरवू शकतो कि आपण आपला वेळ कुठ द्यायला हवा.

जेणेकरून आपला बहुतांश वेळ हा योग्य कामात लागेल आणि वाचेलही.

म्हणून कोणतेही कार्य हाती घ्यायच्या अगोदर त्या कार्याला लागणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करावे. आणि त्यानंतर कामाला सुरुवात करावी.

९) नाही म्हणायला शिका – Learn to say no

आपण म्हणणार कि हे काय नवीन आता ?

तर मित्रहो बरेचदा होते असे कि महत्वाचे काम नसताना सुद्धा आपण आपल्या सोबतच्या काही व्यक्तींसाठी आपला मौल्यवान वेळ काढून त्यांच्या सोबत जात असतो, कारण आपण त्यांना ‘नाही’ म्हणू शकत नसतो,

तर अश्या वेळेला त्या व्यक्तींना आपण काम आवश्यक नसेल तर नाही म्हणायला काही हरकत नाही.

कारण त्यावेळेस आपण आपला वेळ हा काही कारण नसताना एक प्रकारे वायाच घालवत असतो.

म्हणून आपण तेव्हाची स्थिती पाहून व्यवस्थित प्रकारे परिस्थितीला हाताळावे. आणि नाही म्हणायला शिकावे.

१०) काम ठरावा आणि वेळेत पूर्ण करा – Schedule work and complete it on time

आपण ठरवलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. पूर्ण दिवसाचा नित्यक्रम बनवा, आणि बनवलेला नित्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे मनाशी ठाणून घ्या.

नित्यक्रम बनवितेवेळी एका तासाच्या मध्ये ब्रेक घ्यायला विसरु नका.

कारण काम करून करून आपल्याला कंटाळा येऊ शकतो म्हणून ब्रेक सुद्धा आवश्यकच आहे.

कोणतेही काम वेळेत झाल्यावर आपल्यात एक नवा आत्मविश्वास जागृत होईल.

आणि त्या आत्मविश्वासाच्या भरवश्यावर आपण यशप्राप्ती करू शकाल.

म्हणून काम ठरवणे आणि त्या कामाला वेळेत पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.

या लेखातून मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि पैसा असणे म्हणजे श्रीमंती पण ज्याच्याकडे खूप वेळ आहे तो खरा श्रीमंत म्हणून वेळेचे महत्व समजून घ्या आणि आपले जीवन आणखी सुंदर बनवा.

आशा करतो मित्रहो, कि आजचा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top