सेनेतील जवानांना मद्यपान करण्यास का मुभा असते?

Why is alcohol allowed in the Army?

सर्वांनाच माहिती आहे की सेनेतील जवानांच जीवन हे कठीण आणि संघर्षाचे असते, त्यांना देशाची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर राहावे लागते. त्यांनंतर त्यांना अनेक नियम आणि अटींचे पालन करणे अनिवार्य असते, जे त्यांच्या फिटनेससाठी सुध्दा चांगले असते.

त्यांचे दैनंदिन जीवन हे ठरलेलं असतं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, फिट राहण्यासाठी दररोज प्रॅक्टिस, व्यायाम आणि बाकी सर्व गोष्टींकडे लक्ष देत असतात, आपण जाणून थक्क व्हाल की सेनेतील जवानांना मद्यपानाच्या बाटल्यांवर डिस्काऊंट उपलब्ध असते. आता आपण विचार करत असणार की सेनेच्या जवानांना मद्यपान करण्यास प्राधान्य का असते. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की जवानांना मद्यपान करण्यास का प्राधान्य (Indian Army Alcohol Policy) असते. तर चला पाहूया..

सेनेचे जवान मद्यपान का करतात – Why is alcohol allowed in the Army?

"<yoastmark

मद्यपान केल्याने शरीराला हानी पोहचते यामध्ये काहीही शंका नाही, परंतु तरीही सरकार जवानांना मद्यपान करण्यास का प्राधान्य देत असेल बर तर या मागे काही ठोस कारणे आहेत ज्यामुळे सरकार जवानांना मद्यपान करण्यास परवानगी देते, पण त्याला काही मर्यादा असतात,

यामागील प्रथम कारण असे की बरेचदा सेनेतील जवानांना कठीण परिस्थिती मध्ये सुध्दा आपले कर्तव्य पार पडावे लागते,

थंडीच्या दिवसांत सुध्दा सेनेतील जवानांना सीमेवर गस्त घालावी लागते आणि आपल्या देशाचे संरक्षण करावे लागते.

अश्या थंडीच्या दिवसांत शरीराला गरम ठेवण्यासाठी मद्यपान करणे मदतगार ठरते, आणि शरीराला थंडीपासून वाचविण्यासाठी उपयोगी ठरते, म्हणून सेनेच्या जवानांना मद्यपान करण्यास प्राधान्य दिले जाते. जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज सरकारने सुध्दा ह्या गोष्टी अवलंबल्या होत्या, त्यांच्या मधील सेना प्रमुख आणि काही सैनिक मर्यादेत मद्यपान करत असत,

आणि भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर ही प्रथा सुरूच राहिली, आणि अजूनही सुरूच आहे.

असे नाही की मद्यपान करण्यास मुभा मिळाली तर नशा होईपर्यंत मद्यपान करावे, मद्यपान करण्याच्या काही मर्यादा आहेत,

त्यामध्ये सुध्दा काही नियम आहेत जर जवान जास्त मात्रेमध्ये मद्यपान घेतलेला आढळल्यास किंवा नशेत आढळल्यास त्या जवानावर कारवाई केल्या जाते,

आणि परिस्थिती जर जास्त गंभीर असेल तर ती परिस्थिती कोर्ट मार्शल कडे सोपविण्यात येते.

या लेखातून आपल्या लक्षात आले असेल की सेनेतील जवानांना मद्यपान करण्यास का मुभा असते? तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here