रेल्वेच्या काही खिडक्या असतात या कारणांमुळे वेगळ्या, जाणून घ्या या लेखातून.

Indian Train Window

देशात असे काहीच व्यक्ती असतील ज्यांनी रेल्वेने कधी प्रवास केला नसेल, पण बहुतांश लोक लांबचा प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. आपणही प्रवासासाठी कधी ना कधी रेल्वेचा वापर केला असेल, आपण रेल्वेविषयी बरेचश्या अश्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या नेहमी आपल्या निदर्शनास येतात पण त्या नेमक्या कशासाठी असतात हे आपल्याला कळत नाही.

अश्याच काही गोष्टींविषयी आपण या आधीही पाहिले होते जसे रेल्वेचे सामान्य डबे सुरुवातीला आणि शेवटी का असतात? आपण अजूनही हा लेख वाचला नसेल तर आपल्याला तो लेख आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्या लेखामध्ये रेल्वेच्या सामान्य डब्यांविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आजच्या लेखात सुध्दा आपण रेल्वेच्या काही खिडक्यांविषयी काही गोष्टी पाहणार आहोत ज्या बरेच लोकांना माहिती नसतील, तर चला पाहूया रेल्वेच्या खिडक्यांविषयी.

रेल्वेच्या खिडक्या विषयी मराठी – Indian Train Window Information in Marathi

Indian Train Window
Indian Train Window

रेल्वेच्या विषयी बरेच लोकांना माहिती असेलच की रेल्वे मध्ये एसी आणि नॉन एसी दोन प्रकारचे डबे असतात, आणि याच प्रकारे साधारण डबे सुध्दा असतात, आणि रेल्वेच्या नॉन एसी डब्यांमध्ये असलेल्या खिडक्या आपण पाहिल्या असतील, दरवाज्या जवळ असलेल्या खिडक्यांना लोखंडी गज जास्त असतात, तसेच काही खिडक्यांवर आपत्कालीन म्हणून लिहिलेल आपल्याला दिसते, तर या सर्व खिडक्यांच्या असण्याच्या मागे काय कारण असणार बरे, हा प्रश्न बरेचदा आपल्याला पडतो, तर या खिडक्यांमागे काही कारणे आहेत तर ते काही कारणे आपण पाहू.

रेल्वेच्या खिडक्यांना सामान्य प्रकारे लोखंडी गज असल्याचे आपण पाहिले आहे, परंतु दरवाज्या जवळ असलेल्या काही खिडक्यांना सामान्य प्रमाणापेक्षा काही लोखंडी गज जास्त असतात, त्यामागे सुध्दा काही कारणे आहेत, जसे रेल्वे मध्ये दरवाज्या जवळ असलेल्या खिडकीमधून एखाद्या वस्तूला चोरणे चोरांसाठी खूप सोपे असते आणि रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला या गोष्टीचा सामना करावा लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने या खिडकीला प्रमाणापेक्षा जास्त लोखंडी गज बसविले असतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चोरीची घटना घडणार नाही, आणि रेल्वेच्या कोणत्याही प्रवाशाला याचा त्रास होणार नाही.

सोबतच आता तर रेल्वे डब्यांच्या दरवाज्याला सुध्दा काही खिडक्या अश्या येत आहेत, ज्यांच्या लोखंडी गज ह्या जवळजवळ आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी रेल्वे गाडी उभी असल्यास बाहेरुन कोणतीही दुसरी व्यक्ती बाहेरून हात टाकून उघडू शकणार नाही. म्हणजेच एखाद्या चोराला चोरी करायची असल्यास तो या काही गोष्टींमुळे चोरी करू शकणार नाही. ह्या साठी रेल्वे ने ही सुरक्षितता बाळगली आहे.

याचसोबत आपल्याला माहिती असेल की रेल्वेच्या प्रत्येक डब्यांमध्ये एक अशी खिडकी असते ज्यावर लिहिलेले असते आपत्कालीन खिडकी. तर ह्या खिडकीला एक प्रकारे मोकळी सोडलेले असते, जसे त्या खिडकीला वर खाली होणारे काही लोखंडाचे आवरण असते, या आवरणाला आपण जर वरती केले तर ही खिडकी पूर्णपणे उघडते. आणि आपण या खिडकीतून आपत्कालीन वेळी बाहेर सुध्दा पडू शकतो. या खिडकीला ठेवण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की रेल्वेमध्ये एखाद्या आपत्कालीन वेळी प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी या खिडकीला बनविल्या गेले आहे. कधी रेल्वेत आग लागली तर किंवा काही दुर्घटना झाली तर या खिडकीमधून प्रवाशी बाहेर निघू शकतात.

रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ह्या काही खिडक्यांचे निर्माण केलेले आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top