इंडक्शन ची शेगडी गरम का होत नाही? त्यामागे आहे हे वैज्ञानिक कारण

Induction Cooktop Information

अश्मयुगापासून जर आपण पाहिले तर सुरुवातीला जेव्हा अग्नी चा शोध लागला तेव्हा मानवाने केलेली शिकार आगीवर भाजून खाण्यास सुरुवात केली. काही काळानंतर तो त्याच आगीच्या साहाय्याने अन्न शिजवून खाऊ लागला. जेव्हा मनुष्य वस्ती करून राहायला लागला तेव्हा त्याने स्वयंपाक बनविण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचा अवलंब केला ती म्हणजे चूल. या चुलीवरच स्वयंपाक बनविल्या जात असे, आणि बऱ्याच गावांत आजही बनविल्या जातो.

कालांतराने चुली नंतर स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात गॅस चा वापर केला जाऊ लागला. आणि गॅस चा वापरअजूनही होतच आहे, पण म्हणतात ना जसजसे दिवस बदलत जातात तसतसे नवीन बदल घडत राहतात, त्याचप्रमाणे आधी चुल, मग गॅस आणि त्यांनंतर इंडक्शन ची शेगडी आली आहे. ज्या इंडक्शन च्या शेगडी ला इलेक्ट्रिक सप्लाय दिला की इंडक्शन ची शेगडी सुरू. मग त्यावर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बनवू शकता.

पण जर आपल्या घरी ही इंडक्शन ची शेगडी किंवा इलेक्ट्रिक ची शेगडी असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल की ही शेगडी तापत नाही म्हणजे बाकीच्या शेगडींप्रमाणे गरम होत नाही, तर आपण या विषयीच आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे इंडक्शन ची शेगडी तापत नाही. तर चला पाहूया यामागील वैज्ञानिक कारण.

इंडक्शन ची शेगडी गरम का होत नाही – Why Induction Cooker not Heating

Induction Cooktop Information
Induction Cooktop Information

सर्वात आधी तर आपल्याला समजून घ्यायला हवं की इंडक्शन च्या शेगडी चे निर्मिती काश्याप्रक्रे झालेली असते, इंडक्शन च्या शेगडी मध्ये एक कॉईल असतो जो कॉईल कॉपर सारख्या धातू पासून बनलेला असतो. कॉपर पासून बनलेला कॉईल ची विशेषता अशी आहे की या कॉईल मधून जेव्हा करंट पास होतो तेव्हा ही कॉईल स्वतःच्या आजूबाजूला एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते ज्याला इंग्रजी मध्ये आपण “मॅग्नेटिक फिल्ड” सुध्दा म्हणतो. आणि मॅग्नेटिक फिल्ड सुध्दा त्याच वस्तूला प्रभावित करते जी धातू ने बनलेली आहे.

म्हणजेच जेव्हा इंडक्शन शेगडी च्या कॉईल मधून इलेक्ट्रिक करंट पास करणार तेव्हा आतमध्ये असणारी कॉईल एक मॅग्नेटिक फिल्ड निर्माण करणार आणि त्या निर्माण झालेल्या मॅग्नेटिक फिल्ड मुळे शेगडीवर धातूच्या भांड्यात ठेवलेला पदार्थ गरम होतो. पण शेगडी गरम होत नाही. कारण शेगाडीमध्ये असणारी कॉईल फक्त चुंबकीय क्षेत्र निर्माण करत आहे.

एवढंच नाही तर या शेगाडीच्या कॉईल वरती एक सिरॅमिक चे कोटिंग असते आणि या कोटिंग वर आपण भांडे ठेवता आणि कॉईल मधील मॅग्नेटिक फिल्ड सरळ भांड्याला प्रभावित करते. शेगडी ला नाही आणि ह्याच कारणामुळे इंडक्शन ची शेगडी गरम होत नाही.

आणि एक विशेषता म्हणजे या शेगडी वर काही ठराविक भांडे च काम करताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ज्या भांड्याची निर्मिती आयर्न पासून झालेली आहे त्या भांड्यांचा वापर आपण या शेगडीवर करू शकतो, कारण जेव्हा आयर्न असलेले भांडे आपण या शेगडीवर ठेवतो, तेव्हा कॉईल मधील चुंबकीय तरंगे त्या भांड्यामध्ये असणाऱ्या आयर्न च्या कणांना गरम करून भांड्यातील पदार्थाला गरम करतात. म्हणून या शेगडीवर फक्त आणि फक्त आयर्न ने बनलेल्या भांड्यांचा वापर केला जातो.

आपला जर या शेगडीला चालू केल्यानंतर चुकून किंवा मुद्दाम हाथ सुध्दा लागला ना तरी सुध्दा आपल्याला गरम चटका लागणार नाही कारण ही शेगडी कॉईल वर काम करते.

तर वरील लेखात आपण इंडक्शन च्या शेगडी विषयी माहिती पाहिली, आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असणार आणि आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top