ताइवान देशातील लोक या गोष्टींना मानतात अशुभ 

Taiwan Country Information 

जगातील प्रत्येक देश किंवा शहर वेळेनुसार स्वतः मध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याप्रमाणे स्वतः मध्ये एक आवश्यक त्या गोष्टींचे परिवर्तन करून आपल्या देशाला जागतिक स्तरावर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण या सोबतच काही देश आपल्या येथील रूढी परंपरा यांना सोबत घेऊन देशामध्ये काही गोष्टींचे पालन करत आहेत, आता पहा ना चीन पासून १५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेलं एक छोटस बेट आहे ज्यावर आपल्याला अश्याच काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, आणि त्या बेटाचे नाव आहे, ताइवान.

तर आजच्या लेखात आपण ताइवान मध्ये मानल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया ताइवान च्या काही आगळ्या वेगळ्या गोष्टी.

ताइवान देशातील आगळ्या वेगळ्या प्रथा – Information about Taiwan in Marathi 

Information about Taiwan
Information about Taiwan

ताइवान एक छोटंसं बेट असलेल शहर आहे. ह्या शहराला रिपब्लिक ऑफ कॉम्प्युटर म्हणून सुध्दा ओळखल्या जातं. ज्याप्रमाणे आपल्या देशात आसाम मध्ये मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन होतं त्यामुळे आसाम ला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्याचप्रमाणे येथे सुध्दा कॉम्प्युटर मध्ये वापरण्यात येणाऱ्या सेमी कंडक्टर चिप चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, म्हणून ताइवान ला रिपब्लिक ऑफ कॉम्प्युटर म्हटल्या जात.

ताइवान मध्ये चीन च्या फ्यूकियन आणि क्वांगतुंग या शहरांतून आलेले लोक येथील कायमचे रहिवासी झालेले आपल्याला पाहायला मिळते. पण एक विशेष म्हणजे येथे त्याच लोकांना ताइवान वासी म्हटल्या जात जे लोक दुसऱ्या विश्व युद्धाच्या आधीच ताइवान येथील रहिवासी झालेले आहेत. ताइवान मधील लोक मोठ्या प्रमाणात हक्का (Hakka), अमाय (Amoy) आणि स्वातोव (Swatow) या भाषांचा वापर करताना आपल्याला दिसतात, ह्या भाषा चीन च्या दक्षिणी क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहेत.

ताइवान येथे आपल्याला पाहायला मिळेल की येथील लोक ४ या क्रमांकाला अशुभ मानतात, आपण या गोष्टीचे आकलन यावरून करू शकता की येथे जेव्हा एखादी मोठी इमारत बांधली जाते ना तेव्हा त्या इमारती मध्ये ४ नंबर च्या मजल्याला ५ नंबर दिला जातो एवढंच नाही तर लिफ्ट मध्ये आपण जर गेलात तर आपल्याला लिफ्ट मध्ये ३ नंतर डायरेक्ट ५ व्या मजल्याचे बटन पहायला मिळणार. यावरून आपण अनुमान लावू शकता की येथे ४ या क्रमांकाला अशुभ क्रमांक म्हणून पाहला जातो.

एवढंच नाही तर आपण आपल्या दररोज च्या जीवनात आपल्या गाडीचा हॉर्न दिवसातून किती वेळ वाजवत असणार पण येथील लोक होईल तेवढ्या कमी प्रमाणात हॉर्न वाजवतात. जास्त करून लोक येथे हॉर्न वाजविण्या पासून स्वतःला दूरच ठेवतात.

यानंतर आणखी म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखाद्याचा वाढदिवस किंवा एखादा विशेष दिवस असला तर तेव्हा आपण त्या व्यक्तीला एक विशेष वस्तू भेट करतो. येथे सुध्दा भेटवस्तू घेतल्या जातात आणि एखाद्याला दिल्या सुध्दा जातात. पण येथील लोक भेटवस्तूंमध्ये चाकू, रुमाल, टॉवेल, घड्याळ, कैची ह्या गोष्टी कोणाला देतही नाहीत आणि कोणाकडून स्विकारत सुध्दा नाहीत.

पुढे आणखी म्हणजे बहुतेक करून प्रत्येकाला पाऊस आवडतो, जो एक मातीचा वेगळा सुगंध देऊन जातो, सर्वदूर हिरवळ करण्यासाठी ज्याची मदत होते, या पावसात भिजणे प्रत्येकाला आवडते पण ताइवान मध्ये सर्व याविरुध्द आहे येथे लोक पावसात भिजण्यापासून स्वतःला वाचवतात एवढंच नाही तर पाऊस आलाच तर ते घराबाहेर पडणे सुध्दा टाळतात, यामागे एक कारण असेही आहे की ताइवान मध्ये ऍसिड रेन पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते, त्यासाठी येथील रहिवासी स्वतःला पावसापासून दूर ठेवतात.

तर आजच्या लेखात ताइवान विषयी थोडक्यात आपण माहिती पाहिली तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असले आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top