जागतिक परिचारिका दिन विशेष (Corona Warriors Special)

2020 World Nursing Day

ज्या प्रमाणे जागतिक स्तरावर मातृ दिन, पितृ दिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठी एक दिवस साजरा केल्या जातो. तो दिवस म्हणजे १२ मे. जागतिक परिचारिका दिनाची सुरुवात ही बरेच वर्षा आधी झालेली आहे, सुरुवातीला हा दिवस साजरा करण्यात येत नव्हता. परंतु १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय नर्स परिषद चे आधुनिक नर्सिंग च्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला त्या दिवसाला जागतिक नर्स दिवस म्हणजेच जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आले. आणि तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे ला जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरे करण्यात येते.

परिचारिका म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती, त्यांना वेळोवेळी लागणाऱ्या गोष्टी पुरवणारी व्यक्ती, रुग्णांची चांगल्या प्रकारे निगा राखणारी व्यक्ती, या व्यक्तींचा मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांचे जीवन हे हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करण्यात निघून जाते, आपल्या माहितीसाठी जागतिक विध्यार्थी परिचारिका हा दिवस  ८ मे ला १९९८ पासून साजरा केल्या जातो, आणि ६ मे ते १२ मे पर्यंत या आठवड्यात जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केल्या जातो.

फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्यांचा जन्म १२ मे १८२० मध्ये इटली येथे झाला होता, त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या, तसेच सोबत त्या सामाजिक कार्यकर्त्या सुध्दा होत्या, त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली. त्या रात्री जागून तासोंतास रुग्णांची सेवा करत असत, रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत, त्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” म्हटल्या जात असे. तसेच त्यांच्या नावाने लंडन मध्ये नर्सिंग स्कुल सुध्दा उघडण्यात आले आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना १९०७ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

जागतिक परिचारिका दिन विशेष – International Nurses Day Information in Marathi 2020

International Nurses Day
International Nurses Day

जागतिक पातळीवर परिचारिका दिवस कश्या प्रकारे साजरा केल्या जातो? – How do people celebrate International Nurses day

१२ मे ला जागतिक नर्स दिवस साजरा केल्या जातो, लंडन मध्ये दरवर्षी एका ठिकाणी सर्व नर्स एकत्र येऊन या दिवसाला साजरे करतात, त्या एक पेटवलेली मेणबत्ती एक दुसऱ्या जवळ पास करतात. आणि एका उंच ठिकाणी पोहचवून त्या मेणबत्ती ला लावल्या जाते आणि परिचारिका दिवस साजरा केल्या जाते. फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस सुध्दा साजरा केल्या जातो आणि त्या नंतर दुसऱ्या दिवशी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. युनायटेड स्टेट आणि अमेरिकेमध्ये हा संपूर्ण आठवडा नार्सिंग आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो.

कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या नर्सेस बनल्या “कोरोना वॉरियर्स” – Nurses are Corona Warriors

जगात प्रत्येक ठिकाणी आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला दिसत आहे, आणि प्रत्येकाला घरात राहण्याचे आदेश आपल्याला मिळाले आहेत पण तरीही आपल्या पूर्ण परिवाराला घरी सोडून देशातील मेडिकल स्टाफ, नर्स रुग्णांच्या सेवेत आपले दिवस काढत आहे.

आपल्या देशात बरेचश्या नर्स आजही कोरोनासारख्या संकटकाळात देशातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत, पण काही मूर्ख त्यांच्यावर दगड फेक करत आहेत तेही विनाकारण अश्या मूर्ख लोकांपासून या देशाला नेहमी धोकाच राहणार आहे.

प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असलेल्या मेडिकल स्टाफ चा आदर केला पाहिजे कारण ते सर्व आपल्या साठी लढत आहेत, देशासाठी लढत आहेत.

जे आपला परिवार सोडून देशातील रुग्णांची सेवा करण्यासाठी मृत्यूच्या तोंडात सुध्दा जायला भीत नाही आहेत. अश्या या कोरोना वॉरियर्स ला माझी मराठीचा मानाचा मुजरा.

परिचरिकांचे मेडिकल क्षेत्रातील योगदान – Contribution of Nurses in Medical Field

नार्सिंग चे मेडिकल क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय आहे आणि प्रशंसनिय आहे. परिचरिकांमुळे रुग्णांची वेळोवेळी निगा राखली जाते. त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, या सेवेसाठी परिचारिकांना नेहमी प्रत्येकाच्या आठवणीत जपून ठेवल्या जाईल आणि त्यांना समाजात प्रत्येकाने चांगल्या प्रकारे सन्मानित वागणूक द्यावी. कारण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या आरोग्याची काळजी परिचारिका च घेत असतात, अश्या या सर्व परिचारिकांना जागतिक नर्स दिवसाच्या (International Nurses Day) हार्दिक शुभेच्छा.

Happy Nurses Day 2020

आशा करतो वरील लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here