अंतराळात शास्त्रज्ञ कसे करतात नवीन प्रयोग. जाणून घ्या या लेखातून.

International Space Station

माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एवढी प्रगती केली आहे कि, पृथ्वीवरून अवकाशात जाण्यासाठी त्याने सगळ्या गोष्टींचा शोध लावला, सुरुवातीला जेव्हा माणसाची सुरुवात झाली होती तेव्हा तो अश्मयुगात होता.

अश्मयुगात त्याने अनेक शोध लावले, सुरुवातीला आगीचा आणि त्यानंतर चाकाचा असे करता करता तो कधी बाकी गोष्टींच्या शोधापर्यंत पोहचला त्याला कळलेच नाही, आता तर माणसाने इतकी प्रगती केली कि तो अवकाशात जाऊन कितीतरी दिवस राहू शकतो.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, कि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (International Space Station) म्हणजे नेमक काय असते? आणि हे काम कसे करते. तर चला जाणून घेवूया कि हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाविषयी (International Space Station).

अंतराळात शास्त्रज्ञ कसे करतात नवीन प्रयोग. जाणून घ्या या लेखातून – What does the International Space Station Do

What does the International Space Station Do
What does the International Space Station Do

International Space Station म्हणजे काय? – What is the International Space Station

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे अवकाशात सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले एक स्टेशन जेथे माणसे राहून कित्येक दिवस प्रयोग करू शकतात. यालाच ओर्बीटल स्टेशन सुद्धा म्हटल्या जात. हे स्टेशन बऱ्याच सुविधांनी पुरेपूर भरलेले असते.

जेथे एखादे नवीन क्राफ्ट येऊन तेथे उतरविले जाऊ शकते, आणि त्यात इंजिन सुद्धा टाकले जाऊ शकते, हे स्टेशन एक असे स्टेशन असते जेथून पृथ्वीचे निरीक्षण करून तिचा अभ्यास केला जाऊ शकतो. येथे अनेक शास्त्रज्ञ मिळून कित्येक दिवस अभ्यास करू शकतात, सोबतच ब्रम्हांडाच्या रहस्यांची आणखी माहिती या स्पेस स्टेशन वरून मिळवता येते.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशन हे अभियान एक संयुक्त अभियान असते, या अभियाना मध्ये एकापेक्षा जास्त देश मिळून सुद्धा अभियान राबवत असतात, जसे आजपासून २१-२२ वर्षा अगोदर २० नोव्हेंबर १९९८ ला प्रक्षेपित केल्या गेले होते. आणि तेव्हापासून हे पृथ्वी पासून  ४०० किलोमीटर उंचीवर राहून पृथ्वीचे चक्कर लावत असते.

या अभियानात पाच देशांचा सहभाग होता, रशिया, अमेरिका, जपान, युरोप, कॅनडा. या पाच देशांच्या अंतराळ संस्थांचा सहभाग होता. या सर्व संस्थांनी मिळून या अभियानाला पूर्णत्वास घेऊन गेले होते.  या अभियानाचा मालकी हक्क सर्व राष्ट्र संमती नुसार झाला होता.

ISS वर अनेक देशांनी त्यांच्या नवनवीन गोष्टींचा अभ्यास घेतला, त्यामध्ये मायक्रोग्रैविटी, स्पेस स्टेशन, एस्ट्रोबायोलॉजी, एस्ट्रोनोमी, मीटियरोली आणि बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास केला गेला.

आतापर्यंत १९ वेगवेगळ्या देशाचे शास्त्रज्ञ या स्पेस स्टेशन मध्ये मध्ये जाऊन परत आलेले आहेत. हे स्पेस स्टेशन जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त उपयोगी ठरत आहे, कारण पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर अनेक असे प्रयोग करता येत नाहीत, पण या स्टेशन वर असे बरेचशे प्रयोग केल्या जातात जे पृथ्वीवर राहून करणे अश्यक्य असतात.

चीनची स्पेस लॅब – Chinese Large Modular Space Station

२०११ मध्ये चीन ने स्वतःची एक स्पेस लॅब अवकाशात पाठविली होती, पण काही कारणास्तव २०१६ मध्ये त्या स्पेस लॅब शी चीन च्या स्पेस एजन्सी चा संपर्क तुटला, आणि २०१८ मध्ये हि स्पेस लॅब पॅसिफिक महासागरात पडली.

सुदैवाने ती स्पेस लॅब अंतराळातून कोणत्याही देशावर पडली नाही, पडली असती तर जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली असती.

स्पेस स्टेशन ला भेट देणाऱ्या व्यक्ती:

या स्पेस स्टेशन ला अनेक शास्त्रज्ञांनी भेट दिली म्हणजे या स्पेस स्टेशन मध्ये त्यांनी काही काळ घालवला आहे. आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये सर्वधिक काळ राहणारी व्यक्ती पेगी व्हिटसन (Peggy Whitson) आहे.  या व्यक्तीने ६६५ दिवस अंतराळात राहण्याचे रेकॉर्ड केले आहे.

आतापर्यंत या स्पेस स्टेशन मध्ये १९ देशांच्या २५० शास्त्रज्ञांनी या स्टेशन चा दौरा केला आहे. सुनीता विल्यम्स, आपल्या भारताची कल्पना चावला. या व्यक्ती सुद्धा या स्पेस स्टेशन चा दौरा करून आले आहेत.

या स्टेशन च्या बाहेर येऊन जे शास्त्रज्ञ चालतात, त्याला स्पेस वॉक म्हणतात, आणि असे सर्वात आधी करणारी व्यक्ती अलेक्सी लिओनोव्ह हि होती. या व्यक्तीने १८ मार्च १९६५ मध्ये सर्वात आधी स्पेस वॉक केले होते.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here