जेवण करताना का बोलू नये? हे आहे त्यामागील कारण

Jevan Karatana Bolu Naye

आपण बरेचदा आपल्या परिवारात ऐकत असतो की जेवण करताना कोणाशीही न बोलता जेवण करावे. पण या मागचं शास्त्रीय कारण काही जणांना माहीत नसेलही की नेमकं जेवताना बोलणं बंधनकारक का मानलं जातं.

तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत, की जेवताना न बोलण्याच्या मागचे कारण काय आहे? तर चला पाहूया पुढे..

 जेवण करतांना बोलणे टाळावे – Jevan Karatana ka Bolu Naye

Jevan Karatana ka Bolu Naye
Jevan Karatana ka Bolu Naye

जेवताना का बोलु नये – Jevatana Ka Bolu Naye 

वास्तविक पाहता जेवणाच्या आधी आणि जेवताना बऱ्याच गोष्टींचं पालन करणं आवश्यक मानलं जात,

जसे जेवायच्या आधी हाथ स्वच्छ धुणे, जेवण बारीक चावून करणे, जेवण झाल्याबरोबर पाणी न पिणे, आणि जेवताना न बोलणे.

यामागे बरेच कारण आहेत त्यापैकी आपण जेवतांना का बोलू नये या मागील कारण आपण बघूया.

जेवताना आपल्या तोंडामध्ये लाळेच प्रमाण वाढण्यात मदत मिळते, ह्या लाळेमुळे शरीरात अन्नपचनाच्या क्रियेस मदत होत असते, आणि जेवताना बोलल्यास आपल्या तोंडातील लाळे ला हवा लागल्याने अन्नपचनाच्या क्रियेस बाधा निर्माण होऊ शकते. सोबतच श्वास घेण्यास अडथळा निर्माण करू शकते तो कसा तर चला जाणून घेऊया.

आपल्या गळ्यातून दोन नलिका जातात, एक नलिका वातावरणातील हवा आपल्या फुफुसांपर्यंत घेऊन जाण्यास मदत करते,

आणि दुसरी नलिका आपल्या उदरापर्यंत जाते, या नलिकेद्वारे जेवण घेऊन जाण्याचे कार्य  केल्या जात,

आपण जेवताना बोलल्यास आपल्या घश्यातील काही कण जर आपल्या स्वास नलिकेत अडकले तर आपल्याला श्वसनास त्रास होऊ शकतो.

आणि आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागू शकते.

म्हणून आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तिपासून तर पालकांपर्यंत आपल्याला एकचं गोष्ट सांगितल्या जाते की जेवताना बोलू नये.

या लेखाला वाचून आपण आजपासून ठरवू शकता की आता जेवण करताना बोलायचं नाही जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणींना सामोरे जावं लागणार नाही.

काळजीपूर्वक आपला आहार ग्रहण करा.

आशा करतो हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top