भविष्यात या क्षेत्रांतील लोकांना असेल नोकरी करिता जास्त मागणी

Job of the Future

विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपण कुठल्याही क्षेत्राकडे पाहिलं तर, आपल्या निदर्शनास येईल की, कश्या प्रकारे ही स्पर्धा सुरु आहे. अगदी, शिक्षण क्षेत्रापासून तर नोकरी, व्यवसाय क्षेत्रांपर्यंत आपणास स्पर्धा असल्याचे निष्पन्न होते. अश्या या स्पर्धेच्या जगात वावरतांना आपण कश्या प्रकारे स्वत:चे भविष्य उज्ज्वल करू शकतो.

याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या लेखाचे लिखाण केलं आहे. आपल्या पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसत की १२ वी झाल्यानंतर कोणत्या क्षेत्राकडे वळायचं. कोण कोणते कोर्स आपण करावे जेणेकरून आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तर, अश्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही खास या लेखाचे लिखाण केलं आहे.

भविष्यात या क्षेत्रांतील लोकांना असेल जास्त मागणी – Most In-Demand Jobs for the Future

Jobs for the Future
Jobs for the Future

List of Jobs for the Future

  • मीडिया/जर्नलिज्म – Media /Journalism
  • ऐप डेवलपर – App Development
  • सोशल मीडिया मैनेजर – Social Media Manager
  • डाटा एनालिस्ट – Data Analyst
  • ग्राफ़िक डिज़ाइनर – Graphic Designer

मित्रांनो, वरील नमूद केलेल्या कोर्सेस असणार भविष्यात जास्त मागणी, कारण आजचे युग हे डीजीटल बनत चालले आहे. जगात कोठेही काही घटना घडली असेल तर ती आपणास काही सेकंदाच्या आत आपल्या मोबाईल वर समजते. अश्या वेगवान जगात वावरतांना आपण वरील दिलेले कोर्स करणे आवश्यक आहे. शिवाय, या क्षेत्रांतील लोकांना भरघोस पगार देखील मिळतो.चला तर जाणून घेवूया या कोर्सेस बद्दल सविस्तर माहिती.

1) मीडिया / जर्नलिज्म – Media / Journalism

मित्रांनो, मिडिया व जर्नलिज्म हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात आलं असेल की, मीडिया / जर्नलिज्म म्हणजे वर्तमान पत्रात बातमी लिहिणारा पत्रकार किंवा कुठल्याही न्यूज़ चॅनल वर बातमी सांगणारा बातमीदार. मित्रांनो, आपण अगदी बरोबर ओळखलं परंतु आपणास माहिती आहे का? भविष्यात या क्षेत्राला किती मागणी आहे?  मित्रांनो,  मीडिया/जर्नलिज्म हे अश्या स्वरूपाचे क्षेत्र आहे ज्याठिकाणी तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी मिळू शकते.

आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक बातम्यांचे चॅनल आपली दूरदर्शनवर उपलब्ध आहेत. हे चॅनल दरवर्षी मिडिया किंवा जर्नलिज्म कोर्स मध्ये  उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देतात. शिवाय, आपण दूरदर्शन चॅनल वर नोकरी करीत असल्याने आपला समाजातील मान देखील वाढतो.

मित्रांनो, आपणास हा कोर्स करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आपल १२ वी च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण या कोर्स ला प्रवेश घेवू शकता. या कोर्स बद्दल विशेष सांगायचं म्हटल तर, आपण आपल्या गुणवत्तेच्या बळावर या क्षेत्रांत भरपूर पैसा व मान सन्मान कमावू शकतो. याकरिता कोणत्याही पदवीची आवश्यकता नसते. हे एकमेव अश्या स्वरूपाचे क्षेत्र आहे ज्याठिकाणी आपणास केवळ आपल्या कौशल्याच्या आधारे नोकरी मिळते.

2) ऐप डेवलपर – App Development

मित्रांनो, आजचे युग हे पूर्णतः डीजीटल बनलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपणास आता मोबाईलवर समजते. पूर्वीच्या तुलनेने आताच्या काळात खूप बदल झालेला आहे.  कुठलीही वस्तू आपणास विकत घ्यायची असल्यास मार्केट मध्ये जायचं काम राहील नाही. आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण ती वस्तू विकत घेवू शकतो.

तसचं, सरकारी कामे देखील आता online झाल्याने या क्षेत्राला अजूनच बळकटी मिळाली आहे. यामुळे, काही प्रमाणात का असेना परंतु, भ्रष्टाचारास आळा बसला आहे. शिवाय, कामे देखील लवकर होत आहेत. त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होत आहे. या सर्व गोष्टी मुळे आज ऐप डेवलपर या क्षेत्राला जास्त मागणी आली आहे.

मित्रांनो, जर आपण या क्षेत्रांत नोकरी करायचा विचार करीत असाल तर आपण पार्ट टाईम किंवा फुल टाईम जॉब करून भरपूर पैसे कमावू शकता.एक यशस्वी ऐप डेवलपर्स बनण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे. एक उत्तम ऐप डेवलपर्स बनण्यासाठी प्रथम डेव्हलपमेंट व सर्टिफिकेट कोर्स करणे आवश्यक आहे. या कोर्सचा कालावधी हा तीन महिन्यापासून एक वर्षापर्यंत असतो. या कोर्स बद्दल सांगायचं झालं तर या कोर्सचे शिक्षण गुगल वर देखील उपलब्ध आहे.

3) सोशल मीडिया मैनेजर – Social Media Manager

मित्रांनो, सोशल मिडिया हे अशे क्षेत्र आहे ज्याठिकाणी सामाजिक बांधिलकी जपली जाते. आजच्या या डिजिटल युगात मोबाईल हाताळणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. या डिजिटल युगात वावरतांना लोक सोशल मिडिया द्वारे आपल्या मित्रमैत्रिणी तसचं, नातेवाईक यांच्या प्रती आपल्या मनात असणारे भाव आपण व्यक्त करती असतो. सोशल मिडियामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. परंतु, असे असलं तरी,  या सोशल मिडिया मागील कथित सत्य काय आहे ते आपणास माहिती आहे का? चला तर जाणून घेवूया.

मित्रांनो, फेसबुक या सोशल साईटचे निर्माता मार्क जुकरबर्ग यांनी जेंव्हा या साईटची निर्मिती केली तेव्हा त्यांनी स्वत:च पैसे कमावले नाही तर, आपल्या या फेसबुकच्या साह्याने त्यांनी जगातील अनेक लोकांना देखील पैसे कमविण्याचा मार्ग दाखवून दिला. आजच्या काळात, प्रत्येक मोठा नेता, उद्योगपती, डॉक्टर, अभियंता, अभिनेते सोशल मीडियावर सक्रीय आहेत परंतु,  त्यांना लोकांशी संपर्क साधण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो.

या करिता हे सर्वजण लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मिडिया मैनेजर हायर करीत असतात. या क्षेत्रांत नोकरी करण्याचा विचार करीत असाल तर, तुमच्याकरिता खूप नफ्याची गोष्ट आहे. कारण तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. या क्षेत्राबद्दल विशेष बाब सांगायची म्हणजे आपण, एकाच वेळेला खूप साऱ्या लोकांचे मिडिया अकाऊंटस घरी बसल्या बसल्या हाताळू शकतो. याकरिता आपणास उत्तम पगार देखील मिळेतो. याकरिता आपल्यासाठी आवश्यक बाब आहे ती, आपणास सोशल मिडिया क्षेत्रांत उत्तम प्रकारे काम करता यायला पाहिजे, तसचं, आपली इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे खूप गरजेच आहे.

4) डाटा एनालिस्ट – Data Analyst

मित्रांनो, आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक उद्योगधंदे व व्यवसाय हे आजच्या युगातील टेक्नोलॉजी वर अवलंबून आहेत. आपल्या रोजच्या व्यवहाराची देवाण घेवाण तसचं, इतर महत्वपूर्ण माहिती ही टेक्नोलॉजीच्या दृष्टीने डेटा च्या स्वरुपात संगणकात साठवून ठेवली जाते. शिवाय, आधुनिक युगातील ही पद्धत उद्योग क्षेत्रांला फायदेशीर ठरत असल्याने तिचा जास्त वापर होत असल्याचे आपण पाहत आहोत.

परंतु, या दररोजच्या देवाण घेवाणीच्या व्यवहाराच्या माहितीचा डेटा सर्वसामान्य व्यक्तीला साभाळून ठेवणे मोठ्या जोखीमच काम आहे. याकरिता या क्षेत्रांतील प्राविण्य व्यक्तीचीच आवश्यकता आहे. म्हणून आजच्या काळात डाटा एनालिस्ट क्षेत्रांतील नोकरी भरतीची जास्त मागणी वाढली आहे.  त्याकरिता आपल्याकडे एक उत्तम आणि यशस्वी डेटा विश्लेषक होण्यासाठी संगणक, गणित, संगणक प्रोग्राम, डेटा विश्लेषण आणि आकडेवारी या सर्व बाबतीत परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

मित्रांनो, डाटा एनालिसिस केल्यानंतरच कंपनीला आपल्या ग्राहकांबद्दल संपूर्ण माहिती मिळते. जसे की, त्यांना आपल्या कंपनीच्या उत्पादना बद्दल काय वाटते. तसच, आपल्या कंपनीत निर्मित मालाला ग्राहकांची असलेली पसंती या सारख्या अनेक बाबी आपणास डेटा एनालिसिस केल्यानंतर समजतात. त्याच प्रमाणे ग्राहकांच्या मागणीनुसार आपण आपल्या उत्पादनात बदल देखील करू शकतो.

मित्रांनो,  डाटा एनालिसिस या क्षेत्रांची वाढत असलेली मागणी पाहून देशांत या क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांमार्फत या कोर्सची शिकवणी दिल्या जाते.

5) ग्राफ़िक डिज़ाइनर – Graphic Designer

मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात बघितल्यास आपणास प्रत्येक बाबतीत विशिष्ट प्रकारची क्रियाशीलता आढळून येईल. अगदी, घालण्याच्या कपड्यांपासून तर शोभेच्या वस्तूंपर्यंत सर्वच बाबतीत क्रियशीलता ही दिसून येते. या सर्व बाबी जितक्या क्रिएटिव्ह असतील तितकीच त्यांची मागणी देखील वाढत जाते. दिवसंदिवस आपल्यासाठी एक ट्रेंड बनला आहे. यासर्व गोष्टी उत्तम प्रकारे साकारणारे व्यक्ती देखील एक प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर असतात.

त्यांनी साकारलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये त्यांची गुणवत्ता झळकत असते. आपणास सुद्धा अश्या प्रकारे ग्राफिक डिझाईनर बनायचं असेल आणि आपणास त्या क्षेत्राप्रती खूप आवड असेल तर तुम्ही या क्षेत्राशी संबंधित कोर्स पूर्ण करून आपली गुणवत्ता सिद्ध करून उत्तम पगाराची नोकरी मिळवू शकता किंवा स्वत:चा व्यवसाय थाटू शकता.

मित्रांनो, अनेक संस्थामध्ये अश्या प्रकारचे अनेक कोर्संस उपलब्ध आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळविणे सहज शक्य होईल. आपणास आवड असलेल्या कुठल्याही क्षेत्रांमध्ये आपण आपले नशीब आजमावू शकता.अश्याच प्रकारचे लेख वाचण्यासाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here