एका गृहिणीने ५० हजार रुपयांपासून केली स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात आज कमवत आहे, करोडो रुपये

Jyoti Wadhwa Success Story 

जुन्या काळात महिलांना घराच्या बाहेर पडण्याची सुध्दा अनुमती नव्हती, महिलांच आयुष्य फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच सीमित ठेवलेलं असे, परंतु आता तसे नाही आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात पुढे जात आहे, आज जवळजवळ असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नसतील, प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसरच आहेत. ते विमानाला उडविण्याची गोष्ट असो की आणखी काही.

अशीच एक स्टार्टअप स्टोरी आहे एका गृहिणीची, जिने आपल्या परिवाराला सांभाळून स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्यात भरगोच उत्पन्न कमवत आहे. आजच्या लेखात आपण अश्याच एका महिलेची स्टोरी पाहणार आहोत ज्या महिलेने ५० हजार रुपयांनी सुरुवात करून आज स्वतःच्या व्यवसायला करोडो रुपयांची उलाढाल आणि कमाई करणारा बनविला आहे. आशा करतो आपल्याला लिहिलेली स्टोरी जीवनात प्रेरणा देईल. तर चला पाहूया.

ज्योती वाधवा यांनी ५० हजार रुपयांपासून सुरुवात करून उभी केली करोडोंची कंपनी – Jyoti Wadhwa Start up Story

Jyoti Wadhwa
Jyoti Wadhwa

ही स्टोरी आहे दिल्लीच्या एका गृहिणीची ज्यांचे नाव आहे ज्योती वाधवा. २०१० मध्ये जेव्हा त्यांचे पती अंशुल बंसल यांनी आपल्या बँकेतील नोकरीला सोडण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून काही तरी करायचं ठरवलं होतं, तेव्हा ज्योतीला समजल होत की आपले पती काही तरी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. पण तेव्हा त्यांच्या घरात कर्ता पुरुष फक्त त्यांचे पती होते, पण त्यांनी त्यांची साथ देण्याची ठरविले.

ज्योती जवळ सुध्दा कामाचा अनुभव होता, लग्नाच्या अगोदर २००६ च्या दरम्यान ज्योतीने सुध्दा एका कंपनीत एचआर ची नोकरी केलेली होती, पण अश्या वेळी त्यांना कोणतीही कल्पना येत नव्हती. त्यांनी आपल्या नातेवाईकां जवळून ऐकलेलं होत की ऑनलाईन व्यवसायात बरीच कमाई होते. सोबतच त्यांना हे सुध्दा सांगण्यात आलेलं होते की जुन्या साड्यांना ऑनलाईन विकून सुध्दा व्यवसाय सुरू केल्या जाऊ शकतो. ह्या सर्व गोष्टींना त्यांनी ऐकल्यानंतर बाजारा विषयी त्यांनी अभ्यास करणे सुरू केला, एक दिवस पाच – सहा तास रिसर्च करून त्यांनी पाहिले की मार्केट मध्ये काही विशिष्ट कपड्यांची चांगली मागणी आहे.

हे सर्व त्यांना यासाठी करावे लागले कारण त्यांच्या कडे फक्त १ लाख रुपये होते, त्यापैकी ५० हजार त्यांनी गुंतवणूक करण्यासाठी घेतले आणि ५० हजार घेऊन त्यांच्या पतीने आयटी सर्व्हिस ला स्थापित करण्यात लक्ष घातले. आणि ज्योती ने जुन्या साड्यांना ऑनलाईन विकण्याच्या व्यवसायाला सुरू करण्यावर भर दिला. रिसर्च करताना त्यांना लक्षात आले की, बाजारात मोठ्या प्रमाणात प्युवर सिल्क प्रिंटेड केलेल्या साड्यांना मागणी आहे. यानंतर त्यांनी अश्या साड्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या हाताखालून अश्या बरेचश्या साड्या गेल्या. तेव्हा त्यांना आणखी आत्मविश्वास आला की या साड्यांना त्या खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवू शकतात.

सुरुवातीला त्यांनी काही प्रोडक्ट्सना e-bay वर अपलोड केले. आणि त्यांचे असे म्हणणे आहे की येथूनच संस्कृति विंटेज ची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांना आपल्या प्रोडक्ट् ला ई-कॉमर्स साईट वर लिस्ट कसे करतात, त्यानंतर स्वतःचे प्रॉडक्ट्चे विवरण कश्या प्रकारे करतात. हे त्यांना माहिती नव्हत परंतु त्यांनी ह्या गोष्टी खूप लवकर शिकल्या आणि आपल्या प्रॉडक्ट्स ला ऑनलाईन विक्री साठी ई- कॉमर्स वर घेऊन आल्या.

पण सुरुवातीला त्यांच्या जवळ कोणीही स्टाफ उपलब्ध नव्हता, त्यांना सुरुवातीला स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन शिपिंग करावी लागत होती, तेही दोन वर्षांच्या स्वतःच्या बाळाला रांगेत उभे राहून. त्या सांगतात की तेव्हा बाजारात हस्तनिर्मित म्हणजेच हँड क्राफ्टेड साड्या बाजारात कोणीही विकत नव्हते. आणि ही गोष्ट त्यांच्या साठी एक खुप चांगली गोष्ट बनून आली.

तेव्हा लोक जुन्या रेशीमच्या साड्यांना विकत घ्यायचे आणि विकून टाकायचे, जसे ४०० रुपयांना साडी घेतली, आणि ६०० रुपयांना विकली. यावर २०० रुपये बाकी लोक मार्जिन कमवत होते. पण आम्ही असे करायचे ठरवले नाही, कारण काही लोक फक्त प्राईस गेम खेळत होते, परंतु आम्हाला प्रीमियम गेम खेळायचा होता असे त्या सांगतात. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रोडक्ट ला ग्राहकाला योग्य रित्या दर्शविण्याचे ठरविले आणि डीएसएलआर सारख्या कॅमेराच्या मदतीने व्यवस्तीत रित्या फोटो काढून ग्राहकांपर्यंत पोहचवले, आणि त्यावेळेस बाकीचे सेलर २ मेगापिक्सल च्या कॅमेराने फोटो काढून विकत होते.

एका दिवसाला त्या २०-४० डॉलर च्या रेंजमधील ४००-६०० साड्या विकायला लागल्या. त्यांनंतर त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागला. परंतु तीन चार वर्षानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात मंदी आलेली होती, त्यानंतर त्यांनी आपल्या प्रोडक्ट ची एक नवी रेंज काढली, जे की काही दागिन्यांच्या रुपात होती, हस्तनिर्मित साड्यांच्या विक्रीपासून आलेल्या पैशांमधून त्यांनी नवीन प्रोडक्ट रेंज ला बाजारात आणले. आणि एक नव्या नावाने त्याची सुरुवात केली. त्याचे नाव होते झिपर (Zephyrr). आणि लवकरच या नवीन दागिन्यांच्या रेंज ने बाजारात आपली ओळख निर्माण केली आणि त्यासोबत विक्री सुध्दा वाढली.

ज्योती यांनी ह्या व्यवसायाला फक्त ५० हजार रुपयांपासून सुरुवात केली होती, परंतु आज त्यांच्या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न १० कोटींपेक्षा जास्त आहे. एक वेळ अशी होती की स्वतः त्यांना पोस्ट ऑफिस च्या लाईन मध्ये उभे राहुन आपले प्रोडक्ट शिपींग करावे लागत असे, पण आज त्यांची ३०-४० व्यक्तींची टीम आहे. एवढेच नाही तर त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपतींच्या हातून “निर्यात श्री” पुरस्काराने सन्मानित सुध्दा करण्यात आले आहे. आज एक सशक्त नारीचे उदाहरण ज्योती वाधवा यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here