गरीबीला चिरडून उप-जिल्हा अधिकारी बनण्याची छोटीशी स्टोरी

MPSC Topper Waseema Sheikh 

म्हणतात ना वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस दिसत नसतात. अश्याच प्रकारच्या अनेक उपमा आपण जीवनात नेहमी कुठे ना कुठे पाहत असतोच, जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणालाही त्याचे ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात अपयशाचा सामना केल्याशिवाय यशप्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून अपयश आणि संघर्ष या दोन गोष्टींचा सामना मनुष्याने आयुष्यात एक वेळ करावाच.

संघर्षाची झळ सोसावी लागतेच तेव्हाच यश पायाशी लोळण घालतं, याच वाक्याला सत्यात उतरविले महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या जोशी सांघवी गावातील एका मुलीने. वसीमा शेख ही एक गरीब परिवारातील मुलगी आहे. त्यांचा एकूण परिवार आठ जणांचा आहे. या परिवाराचे आर्थिक आधार असणारे वडील आजरपणाने अस्वस्थ राहायचे म्हणून या आठ जणांच्या परिवाराला पोसण्याची जबाबदारी वसीम च्या आई वर आणि भावावर येऊन पडली, आई आणि भाऊ संपूर्ण परिवाराला पोसण्यासाठी काम करत.

वसीमा शेख यांची अधिकारी बनण्याची कहाणी – Waseema Sheikh Success Story in Marathi 

Waseema Sheikh Success Story in Marathi
Waseema Sheikh Success Story in Marathi

आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत होती आणि भाऊ दिवसभर ऑटो रिक्षा चालवत असे आणि येणाऱ्या पैश्यांमधून संपूर्ण परिवाराची उपजीविका भागवत असतं. या दयनीय परिस्तिथी मध्ये वसीमा चे शिक्षण सुरू होते, पण नातेवाईकांच्या कुंचित विचार प्रवृत्ती मुळे नातेवाईकांना असे वाटायचे की मुलीला शिकवून काहीही फायदा होत नाही, शेवटी ती दुसऱ्याच धन असते. पण या प्रकारच्या विचारांचा सामना करून सुध्दा वसीमा ने आपले प्रयत्न सोडले नाहीत.

वसीमा ही सुरुवाती पासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती, ती दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम आली होती, यानंतर तिने पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून केले. तिने पदवीचे शिक्षण कला शाखेतून केले होते,पण आता पुढे तिला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ट्युशन क्लास जॉईन करावे लागणार होते, ट्युशन क्लास साठी अधिक पैश्यांची आवश्यकता होती. मग या सर्व गोष्टी पाहता पदवीचे शिक्षण घेणाऱ्या वसीमा च्या भावाने त्याचे शिक्षण मधे सोडून वसीमा ला पैशांची मदत करण्याचे ठरविले. बीएससी च्या दुसऱ्या वर्षाला असताना वसीमा च्या भावाने शिक्षण सोडले आणि ऑटो चालक बनून बहिणीला मदत करण्याचे ठरविले. घरच्या परिस्थिती ची जाणीव असणाऱ्या वसीमा ने सहा महिने ट्युशन क्लास केल्यानंतर सेल्फ स्टडी करण्याचे ठरविले. वसीमा ने सेल्फ स्टडी मध्ये खूप मेहनत घेतली.

वसीमा चे म्हणणे क्लियर असायचे ती म्हणायची की पूर्व परीक्षेला जाण्यापूर्वी पूर्ण तयारी करून जायचे कारण त्यांनंतर फक्त तुम्हाला रिविजन करणे गरजेचे असते. आणि याच गोष्टीची पूर्तता करत ती पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. पण त्यांनंतर ती इंटरव्ह्यू मध्ये फक्त दोन मार्कांनी मागे पडली.

परंतु तरीही तीची निवड नागपूर येथे सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये अधिकारी म्हणून निवड झाली. तेव्हा तिने या पोस्ट ला जॉईन केले आणि स्वतःच्या भावाचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. त्यानंतर वसीमा ने अजून कसून मेहनत घेतली, सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षा दिल्या आणि उपजिल्हा अधिकारी बनली.

वसीमा या सर्व गोष्टींचे श्रेय आपल्या आईला देते. वसीमा च्या आई जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाही परंतु त्यांनी त्यांच्या मुलीला शिकविले आणि वसीमा ने सुध्दा या गोष्टीला समजून घरच्यांच्या विश्वासावर उतरून घरच्यांचे नाव मोठे केलं. आपल्या ध्येयाविषयी जर मनात जिद्द असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश आपल्याला शोधत येतं यात शंकाच नाही. या स्टोरीतून आपल्याला एवढी शिकवण मिळते की आपली परिस्थिती आपल्याला दर्शवत नाही तर आपल्यात असलेली जिद्द, कला, कौशल्य, ह्या गोष्टी जगाला आपले दर्शन घडवतात.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top