• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Tech Startup

पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप

 Waterless Car Wash Startup

बरेचदा आपली कार आजूबाजूला उडणाऱ्या धुळीने खराब होते. आणि खराब झाल्यानंतर आपण आपल्या कार ला वॉशिंग सेंटरमध्ये साफ करण्यासाठी घेऊन जातो किंवा आपल्या घरीच मोटार ला पाईप लावून गाडी स्वच्छ करतो, पण या सगळ्या गोष्टी मध्ये खूप पाणी जास्त वाया जात. आणि असेच पाणी वाया गेले जात राहिले तर आपल्याला भविष्यात पाण्याची कमतरता भासेल.

या सर्व गोष्टींवर विचार करून महाराष्ट्रातील व्यक्तीने असा स्टार्टअप सुरू केला की आपण पाण्याच्या एका थेंबाचा वापर न करता आपली कार स्वच्छ करू शकणार. तर आजच्या लेखात आपण या स्टार्टअप विषयी पाहणार आहोत की नेमका हा स्टार्टअप कश्या रीतीने काम करतो. तर चला पाहूया एक विशिष्ट स्टार्टअप.

पाण्याचा वापर न करता गाडीला स्वच्छ करण्याचा अनोखा स्टार्टअप – Go Waterless Car Wash: Stop Watching Your Car with Water

Waterless Car Wash Success Story
Waterless Car Wash Success Story

“गो वाटरलेस” या नावाचा स्टार्टअप महाराष्ट्रातील ३६ वर्षीय नितीन शर्मा यांनी सुरू केला आहे त्यांनी अश्या एका स्प्रे चे निर्माण केले आहे ज्याच्या मदतीने आपण आपली कार पूर्णपणे स्वच्छ करू शकता. तेही पाण्याचा वापर न करता. आपण जेव्हा घरी पाण्याचा वापर करून गाडीला स्वच्छ करतो तेव्हा ७० – ८० लिटर पाणी नष्ट होत असते.

जर आपण एखाद्या वॉशिंग सेंटर वर मध्ये गाडीला स्वच्छ करण्यासाठी घेऊन गेलो तर तेव्हा तेथे १५० – २०० लिटर पाणी खर्च होते आणि हे खर्च झालेलं पाणी गटारा मध्ये जाऊन वाया जाते. या स्टार्टअप ला सुरू करणारे नितीन म्हणतात की भारतात एकूण २३ करोड कार आहेत.

जर प्रत्येक कार ला स्वच्छ करण्यासाठी आपण ज्या पाण्याचा वापर करतो. तर ते पाणी वायाच जाते तर या पाण्याला वाचवून, आपण पाण्याने कार ला स्वच्छ न करता “गो वाटरलेस” च्या सर्व्हिस चा वापर करू शकता. या स्टार्टअप मध्ये सध्या २३ लोकांची टीम काम करते आहे. आणि त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या जवळ एकूण १००० ग्राहकांनी या सेवेला सुरू केले आहे.

या स्टार्टअप चे संथापक नितीन चे यांचे असे मत आहे की ह्या स्टार्टअप ला फ्रेंचायजी मॉडेल वर काम करून या कामाचा विस्तार करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. आणि लोकांना पाण्याविषयी जागरूक करण्यासाठी गो वाटरलेस हा स्टार्टअप उत्सुक आहे.

या स्टार्टअप ची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्यांच्या स्वतःच्या ऑटो मोबाईल वर्कशॉप मध्ये उन्हाळ्यामुळे बोअर चे पाणी पूर्णपणे संपले होते, ग्राहकांच्या कार धुण्यासाठी सुद्धा मिळत नव्हते, तेव्हा त्यांना ह्या गोष्टीमुळे मोठया समस्यांचा सामना करावा लागला ग्राहकांना परिस्थितीविषयी समजावून सांगून त्यांना ह्या संकटावर वर मात करायची होती.

त्यांनंतर २०१७ मध्ये त्यांनी नॅनोटेक्नॉलॉजी चा वापर करून प्लांट बेस्ड स्प्रे चे निर्माण काही केमिकल इंजिनिअर यांची मदत घेऊन केले. एका वर्षाच्या मेहनती नंतर हा स्प्रे विकसित झाला आणि ह्या स्प्रे ची विशेषता अशी होती की पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपण आपल्या गाडी वरील धुळीचे कण स्वच्छ करू शकणार होतो. तेही गाडीच्या रंगाला नुकसान न पोहचवता.

गो वाटरलेस स्टार्टअप गाडीला पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आपल्या ग्राहकांजवळून ४४९ रुपये घेते, तर फक्त बाहेरून स्वछ करण्यासाठी २४९ रुपये घेते. आणि सध्या “गो वाटरलेस” कडून आपल्या ग्राहकांसाठी काही डिस्काऊंट ऑफर सुध्दा सुरू आहेत.

पॉलिसी थिंक टॅंक नीती आयोगाच्या रिपोर्ट नुसार २०२० च्या अखेर-पर्यंत देशातील मोठ्या २१ शहरांमध्ये पाण्याची पातळी संपण्याची आशंका व्यक्त केल्या जात आहे. यामध्ये दिल्ली,चेन्नई, हैद्राबाद या शहरांचा समावेश आहे, देशात ६० करोड लोकांसमोर पाण्याची चिंता येऊन थांबली आहे. २०१८ पासून देशात प्रत्येक वर्षाला पाण्याच्या अभावामुळे २ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करणे खूप आवश्यक आहे, पाण्याची बचत करणारा हा स्टार्टअप लोकांची पसंत बनत आहे.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा स्टार्टअप आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा स्टार्टअप आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Kunwer Sachdev Sukam
Success Story

सु-काम कंपनीचे फाउंडर “कुंवर सचदेव” यांच्या यशाची कहाणी

मित्रहो आज आम्ही एका यशस्वी व्यावसायिकाच्या जीवन कथेवर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या कथेस वाचुन तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरून जाईल. तूम्हीही यशाची...

by Editorial team
October 26, 2020
Woman Start Salad Business
Business

लाखो रुपये कमविते हि महिला, पहा काय करते.

Woman Start Salad Business रोजच्या जेवणातील एक पदार्थ तो म्हणजे सलाद. वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचं मिश्रण करून त्यांना बारीक चिरून मीठ...

by Editorial team
October 15, 2020
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved