Sunday, October 1, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची कहाणी

मित्रांनो अशी उदाहरणं आपण किती पाहीली आहेत की ज्याला सगळं सेट,  अर्थात आयतं, काहीही कष्ट न करता मिळालं आणि तो त्याच्या आयुष्यात खुप यशस्वी ठरला? लोक त्यांच अनुकरण करायला लागले, त्याचं उदाहरण द्यायला लागले? नाह! अशी उदाहरणं तुम्हाला सहसा कधीच मिळणार नाहीत.

पण जर मी असा प्रश्न विचारला की एखादं असं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का की ती व्यक्ती त्याच्या एकुण आयुष्यात बरेचदा अपयशी ठरली पण पुढे प्रचंड यश त्याच्या वाटयाला आलं? हो! अशी उदाहरणं तुम्हाला बरीच मिळतील.

त्याचं महत्वाचं कारण हे की चुका करताय म्हणजे काहीतरी शिकताय हे नक्की! चुका होतील या भितीने काही करायचच नाही यापेक्षा चुका करत करत काहीतरी चांगल करण्याचा प्रयत्न करण नक्कीच यशाकडे जाण्याचा एक सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.

तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी? खरतर हा आपल्या लिखाणाचा मुद्दाच नाही पण जो मुद्दा अर्थात ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो मात्र “नॉनव्हेज किंग” आहे, संपुर्ण जगात KFC हा त्याचा ब्रांड नॉनव्हेजीटेरियन लोकांमधे इतका फेमस आहे की विचारू नका. “कर्नल” हरलैंड डेविड सैंडर्स हे त्यांचं नाव!

KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची कहाणी – KFC Colonel Sanders Story

KFC Colonel Sanders Story
KFC Colonel Sanders Story

जीवनात अनेक टप्प्यांवर अपयश मिळत असतांना स्वतःच्या आंतरीक उर्जेचा आवाज ऐकला आणि हा व्यक्ती न भुतो न भविष्यती इतका यशस्वी झाला. त्यांच्या आयुष्यातील ठळक चढउतारांवर बोलायचे झाल्यास काही ठळक मुद्दे लक्षात येतात ते असे

  • वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी वडीलांच छत्र हरवलं.
  • वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला.
  • 17 वं वर्ष होईपर्यंत जवळजवळ 4 जॉब हातचे गेले होते.
  • 18व्या वर्षी विवाह आणि 19 व्या वर्षी एका मुलीचे पिता.
  • एका रेस्टॉरंट मधे कुक आणि प्लेट वॉश करण्याचे काम केले.

त्यांनी स्वतःचे क्रीयेशन असलेली नॉनव्हेज मधे own recipie बनवुन एक रोडसाईड रेस्टॉरंट सुरू केले. खरंतर निराशेच्या खोल दरीत अडकले असतांना त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केले.

पाहता पाहता त्यांच्या हातची चव लोकांना आवडु लागली आणि त्याची चर्चा सर्वत्र होउ लागली. हळुहळु बिजनेस मधले गमक त्यांना उकलु लागले आणि फ्रंचायसी चे वारे डोक्यात घुमु लागले आणि आयुष्य बदलवणारी KFC ची सुरूवात 1952 साली झाली. त्यानंतर मात्र कर्नल साहेबांनी स्वतः सुरू केलेले रोडसाईड रेस्टॉरंट बंद केले आणि संपुर्णपणे KFC ची सुत्र आपल्या हातात घेतली आणि नंतर पुन्हा मागे वळुन बघीतलं नाही.

हळुहळु राज्याबाहेर आणि नंतर देशाबाहेर KFC च्या फ्रंचायसी दिल्या गेल्या आणि हा ब्रांड नॉनव्हेजीटेरियन लोकांचा सगळयात आवडता ब्रांड झाला.

अशी उदाहरणं जेव्हां आपल्या बघण्यात आणि वाचण्यात येतात तेव्हां खरच “NOTHING IS IMPOSSIBLE” हे पटतं नां? म्हणुन मित्रांनो आयुष्यात कुणीतरी येउन बदल घडवेल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा.या बदलाचा भाग व्हा!

आयुष्य खुप सुंदर आहे! फक्त गरज आहे ती आपला दृष्टीकोन बदलण्याची . . . . .

कर्नल हरनैल सैंडर्स यांच्याबद्दल काही महत्वपुर्ण माहिती – Colonel Sanders Information

  • जन्म: 9 सप्टेंबर 1890
  • मृत्यु: 16 डिसेंबर 1980
  • व्यवसाय: रेस्टॉरंट बिजनेसमन
Previous Post

जाणून घ्या 3 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जाणून घ्या 4 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

Kunwer Sachdev Sukam
Success Story

सु-काम कंपनीचे फाउंडर “कुंवर सचदेव” यांच्या यशाची कहाणी

मित्रहो आज आम्ही एका यशस्वी व्यावसायिकाच्या जीवन कथेवर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या कथेस वाचुन तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरून जाईल. तूम्हीही यशाची...

by Editorial team
October 26, 2020
McDonald's Story
Startup

McDonald’s च्या यशाची कहाणी

बरेचदा आयुष्यात आपण एखादे काम किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हां आपल्याला पुसटशी देखील कल्पना नसते की भविष्यात या...

by Editorial team
October 11, 2022
Next Post
4 November History Information in Marathi

जाणून घ्या 4 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Taj Mahal Information in Marathi

“ताजमहाल” भारताची शान आणि प्रेमाचे प्रतिक

5 November History Information in Marathi

जाणून घ्या 5 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Rani Durgavati Information in Marathi

"राणी दुर्गावती" मुघल शासनाला हादरवणारी एक शूरवीर वीरांगना

6 November History Information in Marathi

जाणून घ्या 6 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved