नांदेड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Nanded Jilha Mahiti

गोदावरीच्या खो.यात आग्नेय महाराष्ट्रात वसलेला नांदेड जिल्हा!

मराठवाडा भागात वसलेल्या या जिल्हयाला ऐतिहासिक असे महत्व असुन या ठिकाणी शीखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरूव्दारा आहे.

आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरू श्री गुरू गोविंद सिंघजी महाराज यांनी सन् 1705 मधे या ठिकाणी आपला देह ठेवला.

Nanded District Information in Marathi

नांदेड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nanded District Information in Marathi

नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण पुर्वेला वसलेला जिल्हा असुन याला लागुन आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सिमा आहेत. महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे.

’’नांदेड’’ या नावाचा उगम ’’नंदी-तट’’ या शब्दामधुन झालेला असुन ’नंदी’ म्हणजे श्री शंकराचे वाहन आणि ’तट’ म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ!

नंदीने गोदावरी नदीच्या तिरावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे.

नांदेड हे सन् 1725 मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजाम संस्थानने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनुन राहीले पण भारत सरकारच्या पोलीस कारवाई नंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.

आताचा नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला!

अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सल्तनीतले नांदेड आता झपाटयाने बदलु लागले आहे. नंदीतटाचे नांदेड आता लहान गावठाण राहिले नाही तर शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड महानगरपालिका अस्तित्वात आली.

या नांदेड मधे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ स्थापन झाले! अनेक महाविद्यालयं, मेडीकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी अशा विविध शाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत.

या नांदेड जिल्हयाने मध्ययुगीन मागासलेपणाची कात टाकुन 21 व्या शतकाकडे वाटचाल सुरू केल्याचे आज नांदेड शहराकडे पाहुन लक्षात येते.

नांदेड जिल्हयातील तालुके – Nanded District Taluka List

याजिल्हयात एकुण 16 तालुके आहेत

 1. नांदेड
 2. अर्धापूर
 3. भोकर
 4. बिलोली
 5. देगलूर
 6. धर्माबाद
 7. हदगाव
 8. हिमायतनगर
 9. कंधार
 10. किनवट
 11. लोहा
 12. माहुर
 13. मुदखेड
 14. मुखेड
 15. नायगांव
 16. उमरी

नांदेड जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nanded Jilha Chi Mahiti

 • लोकसंख्या 33,61,292
 • क्षेत्रफळ 10,422 वर्ग कि.मी.
 • साक्षरतेचे प्रमाण 45%
 • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 943
 • राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 आणि क्र. 204 या जिल्हयातुन गेला आहे.
 • जिल्हयाचा उत्तर आणि ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकडयांनी व्यापलेला असुन जिल्हयाच्या दक्षिण.नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत.
 • गोदावरी, मांजरा, आसना, मान्याद आणि पैनगंगा या येथील प्रमुख नद्या
 • सरासरी पर्जन्यमान 8 मि.मी.
 • नांदेड संतकवी विष्णुपंत, रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.
 • येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्वाच्या शैक्षणिक संस्था आहे.
 • श्री गुरूगोविंदसिंह यांचा गरूव्दारा, माहुरची रेणुकादेवी, बिलोली मशिद, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, देगलुर तालुक्यातील सिध्देश्वर मंदीर, मुखेड येथील शिवमंदीर ही तिर्थस्थळ पाहावी आणि अनुभवावी अशीच
 • या शिवाय कंधारचा किल्ला, सहस्त्रकुंड धबधबा (किनवट तालुका), नांदेडचा किल्ला ही पर्यटन स्थळ देखील याच जिल्हयातली.
 • जिल्हयातील किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने सागाची आणि बांबुची वने आढळतात.
 • जिल्हयाच्या आजुबाजुला तेलंगणा कर्नाटन राज्याच्या सिमा असुन येथील लोक मराठी, तेलगु, तामीळ, आणि हिंदी भाषा बोलतांना आपल्याला आढळतात.

नांदेड जिल्हयातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit In Nanded

 • श्री गुरूगोविंदसिंह गुरूव्दारा – Shri Guru Gobind Singh Ji Museum

हुजूर साहेब हा श्री गुरू गोविंदसिंहांचा गुरूव्दारा या ठिकाणी असुन येथील वातावरण अत्यंत पवित्र, शांतीपुर्ण असं असतं. भारतातील मुख्य 5 गुरूव्दारांपैकी हा एक गुरूव्दारा असुन हा गुरूव्दारा गोदावरी नदीच्या तिरावर वसलेला आहे.

या व्यतिरीक्त इतर 4 गुरूव्दारांमधे अमृतसर चे अकाल तख्त, आनंदपुर चे तख्त केशगढ साहिब, बिहार चे तख्त पटना साहिब आणि पंजाब के भटिंडा सालो आणि तलवंडी साबो चे तख्त दमदामा साहिब यांचा समावेश होतो.

येथील वातावरण अत्यंत पवित्र असुन या ठिकाणी शिख बांधवांसोबतच इतर धर्माचे लोक देखील दर्शन घेण्याकरता लांब लांबुन येत असतात.

2008 ला गुरू गोविंद सिंहांची 300 वी जयंती समारोह अत्यंत दिमाखात आणि देखण्या वातावरणात भव्य स्तरावर साजरा करण्यात आला त्यावेळचे प्रधानमंत्री श्री मनमोहन सिंह या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते.

येथील हा गुरूव्दारा श्री पटना साहिब यांच्या पध्दतीचा अवलंब करतं.

हा गुरूव्दारा इतर स्थानांपेक्षा वेगळा असुन येथे आजही गुरूंच्या काळातील प्राचीन परंपरांचा अभ्यास केला जातो उदा. येथे आजही येथील पुजा.यांच्या आणि स्थानिक भक्तांच्या कपाळावर चंदनाचा तिलक माथ्यावर लावला जातो.

नुकतच मुख्य गुरूव्दारा जवळ गोबिंद बागेत एक लेजर शो सुरू केला आहे या लेजर शो मधे 10 गुरूंचा जीवनपट संक्षिप्त रूपात दाखवण्यात आला आहे. या शो ला शिख समुदाया व्यतिरीक्त इतर धर्माचे लोक देखील मोठया संख्येने पहायला येतात.   एशियातील हा दुसरा सवार्त मोठा लेजर शो असल्याचे सांगितले जाते.

 • माहुरची रेणुकामाऊली – Renuka Devi Temple

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी हे एक संपुर्ण शक्तीपीठ!

नांदेड जिल्हयातल्या किनवट तालुक्यात माहुरच्या रेणुका देवीचं हे स्थान आहे.

रेणुका म्हणजे जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई!

या देवी बद्दल अशी आख्यायीका सांगितली जाते की ज्यावेळेस परशुरामाची आई सती गेली त्यावेळेस परशुरामाला शोक अनावर झाला त्याचा तो शोक पाहुन आकाशवाणी झाली की तु तुझ्या मातेचं मनापासुन स्मरण कर ती पुन्हा प्रकट होईल पण हे करत असतांना डोळे उघडुन पाहायचे नाही

परशुराम मातेचे स्मरण करू लागले, मागुन पर्वत फुटण्याचा आवाज होउ लागला परशुराम मातेच्या दर्शनाला आतुर झाल्यामुळे त्याने न राहवुन अनावधानाने डोळे उघडुन पाहिले असता गडातुन मातेचे फक्त शिर बाहेर आले होते आणि त्या क्षणी देवी तांदळा रूपात त्या ठिकाणी स्थिर झाली.

आजही माहुर ला आई रेणुकेच्या त्या तांदळा रूपाचीच पुजा केली जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे, देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हंटले जाते.

माहुर गडावर रेणुकादेवी सोबतच भगवान दत्तात्रय, अनुसुया, परशुरामाचे देखील प्राचीन मंदीर आहे, माहुरगडावरच दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रध्दा आहे. या मंदीरासमोरच एक किल्ला आहे या किल्ल्यामधे वन्यजीव आढळुन येतात. या मंदिरांमधे देखील खुप माकडं चैफेर फिरत असतात.

या गावात एक पुराणवस्तुसंग्रहालय देखील आहे त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तु आणि पुरातन शिल्पे ठेवली आहेत त्यातील अंगठयाऐवढी बालाजीची मूर्ती पाहाण्यासारखी आहे.

नांदेड पासुन माहुरगडाचे अंतर साधारण 130 कि.मी. एवढे आहे.

 • माळेगांव यात्रा – Malegaon Yatra

लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबाची यात्रा फार प्राचीन आणि खुप प्रसिध्द अशी यात्रा आहे. मार्गशिर्ष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) ही यात्रा साजरी केली जाते.

संपुर्ण जिल्हयातुन आणि बाहेर गावावरून देखील भाविक या यात्रेत सहभागी होण्याकरता येथे येत असतात.

नांदेड पासुन सुमारे 57 कि.मी. वर ही यात्रा आयोजित केली जाते.

येथे येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व्यतिरीक्त खाजगी वाहनाने देखील भाविक येथे येतात.

या यात्रेत जो गुरांचा खरेदी विक्रीचा बाजार भरतो तो फार लोकप्रीय आहे, या गुरांच्या बाजारात घोडा, उंट, गाढवं आणि तत्सम प्राणी विक्रीला उपलब्ध असतात.

 • सहस्त्रकुंड धबधबा –  Sahasrakund Waterfall

सहस्त्र धारा तब्बल 40 फुटावरून खाली पडत असतांनाचे विहंगम दृष्य तुम्हाला तुमच्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्ही या धबधब्याची सैर एकदा करायलाच हवी.

यवतमाळ पासुन साधारणतः 150 कि.मी. वर असलेले हे ठिकाण डोळयाचे पारणे फेडणारे आहे.  मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर असलेले हे ठिकाण!

याची आणखीन एक गंमत म्हणजे या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग यवतमाळ जिल्हयातल्या उमरखेड तालुक्यात आहे.

धबधब्याच्या काठावर पंचमुखी महादेवाचे मंदीर आहे भाविकांचे हे श्रध्दास्थान असल्याने याकरता देखील इथे गर्दी असते.

धबधब्यावर सैर करून आल्यानंतर लागुन असलेल्या बगीच्यात निवांत बसुन धबधब्याला पाहात राहाणे अतिशय नयनरम्य वाटते.

बगीच्यात अनेक रंगाची फुलपाखरं या ठिकाणी पहायला मिळु शकतात.

तेव्हां पाण्याचा अद्भुत नजारा बघण्याकरता एकदा सहस्त्रकुंड धबधब्याला भेट द्यायला नक्की जा!

लक्ष्य दया: तुमच्या जवळ नांदेड जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया नांदेड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nanded District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: Nanded District – नांदेड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top