कर्पूर गौरम करूणावतारम

– Karpur Gauram Karunavtaram Sansar Saram (Kapoor Aarti)

आज आपण या लेखाच्या माध्यमातून मंदिरात किंवा आपल्या घरी देवांची पूजा अर्चना केल्यानंतर आरतीचे पठन केल्यानंतर म्हटल्या जाणाऱ्या कापूर आरतीचे लिखाण करणार आहोत. तसचं,या कापूर आरतीचे महत्व समजून घेणार आहोत. भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी ही आरती अत्यंत महत्वाची असून आपण या आरतीचे नियमित पठन केलं पाहिजे.

कर्पूर गौरम करूणावतारम – Karpur Gauram Karunavtaram Sansar Saram (Kapoor Aarti)

Kapoor Aarti
Kapoor Aarti

करपूर गौरम करूणावतारम

संसार सारम भुजगेन्द्र हारम|

सदा वसंतम हृदयारविंदे

भवम भवानी सहितं नमामि||

मंगलम भगवान् विष्णु

मंगलम गरुड़ध्वज|

मंगलम पुन्डरी काक्षो

मंगलायतनो हरि||

सर्व मंगल मांग्लयै

शिवे सर्वार्थ साधिके|

शरण्ये त्रयम्बके गौरी

नारायणी नमोस्तुते||

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बंधू च सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देव देव

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा

बुध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात

करोमि यध्य्त सकलं परस्मै

नारायणायेति समर्पयामि||

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारे

हे नाथ नारायण वासुदेव|

जिब्हे पिबस्व अमृतं एत देव

गोविन्द दामोदर माधवेती||

हिंदू धार्मिक वेद ग्रंथांमध्ये मंत्र उच्चारण करण्यास विशेष महत्व दिल गेल आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णिल्याप्रमाणे प्रत्येक देवी देवतांसाठी विशेष अश्या मंत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीस पडते की, पुजारी मंत्र उच्चारण करीत देवाची पूजा अर्चना करीत असतात.

प्रत्येक मंदिरात मंत्र उच्चारण हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जाते. जसे, गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती यांच्याच मंत्रांचे उच्चारण करण्यात येते तर महादेवाच्या मंदिरात महादेव मंत्राचे उच्चारण केलं जाते. मंत्र उच्चारण म्हणजे काय तर एकाप्रकारे देवाची केलेली स्तुती होय. या मंत्रांप्रमाणे देवांची पूजा केल्यानंतर म्हटल्या जाणाऱ्या आरतीला देखील विशेष महत्व आहे.

आपण पाहतो की, पुजारी कुठल्याही पूजेला सुरुवात करण्याआधी भगवान गणेश यांची आराधना करतात त्यासाठी ते गणपती मंत्रांचे उच्चारण करतात. तसचं, आरती करतांना देखील प्रथम श्री गणेशाला वंदुनच आरती म्हटली जाते आणि शेवटी भगवान महादेव यांना अनुसरून ‘कर्पूरगौर’ या आरतीचे पठन करण्यात येते. असे करण्यामागे देखील लोकांच्या विविध धारणा आहेत.

‘कर्पूरगौर’ या आरतीचे महत्व पुराणांमध्ये देखील सांगण्यात आलं आहे. भगवान शिव- पार्वती यांच्या विवाहा प्रसंगी भगवान विष्णू यांनी देवाधिदेव महादेव यांची स्तुती करण्यासाठी  कर्पूरगौर आरतीचे पठन केले होते असे म्हटले जाते. त्याबाबत एक दंत कथा देखील प्रसिद्ध आहे. भगवान शिव हे वैरागी असल्याने ते सर्व प्राणीमात्रांपासून अलिप्त राहून दूर कैलाश पर्वतावर ध्यानिस्त राहतात किंवा स्मशानभूमीत एकांत तप करीत राहतात.

त्यामुळे त्यांना समाजातील लोकांमध्ये वावरावे कसे हे कळत नाही. भगवान शिव यांची वेशभूषा ही खूप भयंकर असून त्यांनी आपल्या अंगाला राख लावली आहे. शिवाय अंगात वस्त्र रुपी वाघाचे कातडे गुंडाळले असून गळ्यात साप गुंडाळला आहे. तसचं, आपल्या जटा मोकळ्या सोडून डोक्यावर चंद्राची कोर धारण केली आहे.

शिवाय, एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हाती डमरू घेऊन नंदीवर स्वार होत भगवान शिव भूतांना आपले वराती म्हणून सोबत घेऊन वाजत गाजत देवी पार्वती यांच्या घरी आपल्या लग्नाला जमले होते. भगवान शिव यांचे ते रूप पाहून सर्व लोक घाबरले होते. तेंव्हा भगवान विष्णू यांनी महादेवाची स्तुती करतांना ही कर्पूरगौर आरती म्हटली होती.

भगवान विष्णू यांनी महादेवाची स्तुती करताच देवी पार्वती यांना भगवान शंकर यांचे रूप खूपच दिव्य आणि सुंदर दिसू लगले. भगवान शिव यांना समस्थ सृष्टीचे अधिपती म्हटल जाते. त्यांना मृत्युलोकाचे देवता म्हटलं जाते, त्याचप्रमाणे पशुपतिनाथ देखील म्हटलं जाते. पशुपती म्हणजे सृष्टीतील संपूर्ण प्राणीमात्रांचे ते अधिपती आहेत.

त्यामुळे समस्थ प्राणीमात्रांचे अधिपती असलेल्या आणि स्मशान वासी असलेल्या भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी राहावी, तसचं, आपला सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून बचाव व्हावा याकरिता भक्त नेहमीच आरतीच्या शेवटी कापूर लावून ‘कर्पूरगौर’ आरती म्हणत असतात.   मित्रांनो, कर्पूरगौर या आरतीचे अनन्य साधारण महत्व असल्याने आपण नियमाती या आरतीचे पठन करायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here