कित्तुर ची राणी चेन्नम्मा

Kittur Chennamma

कित्तुर राणी चेन्नम्मा भारताच्या कर्नाटक राज्यातील कित्तुर या जागीरची राणी होती. 1824 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या विरूध्द सेना बनवुन लढणारी ती पहिली राणी होती. तिला अटक करण्यात आली.

कित्तुर राणी केलांदी चेन्नम्मा आणि ओबव्वा रामा यांच्या सोबत मिळुन ब्रिटिश सेने विरूध्द बंड पुकारले होते.

Kittur Rani Chennamma

कित्तुर ची राणी चेन्नम्मा – Kittur Rani Chennamma

चेन्नम्मा चा जन्म भारतातील कर्नाटक राज्याच्या बिलगाव जिल्हयातील काकटि या गावी झाला होता. ती अत्यंत सुंदर व शुर होती, लहानपणापासुन कयप्पुअट्टपू या देशी युध्द शैलीत ती पारंगत होती. तिला बघुन कित्तुर चे राजा मल्लासर्ज यांनी तिच्याशी विवाह केला होता.

ब्रिटिश अधिका.यांच्या मनमानी कारभाराविरूध्द तिने बंड पुकारला होता. ब्रिटिश अधिकारी कित्तुर घराण्याच्या खजान्यास व बहुमुल्य दागिन्यांच्या भंडारास हस्तगत करण्याची तयारी करीत होते त्यावेळी राणीच्या खजान्याची किंमत 150 कोटीच्या वर होती.

यासाठीच ब्रिटिश अधिकारी 20000 सैनिक व 400 बंदुकधारी सैनिकांसह राणीच्या राज्यावर चालुन आले. ऑक्टोबर 1824 रोजी युध्दाची पहिली झडप झाली राणीने आपले पुर्ण सामथ्र्य पणाला लावले होते. तीच्या युध्द कौशल्यामुळेच इंग्रजांचे बरेच नुकसान झाले होते. चेन्नम्माचे सोबती बलप्पा शुरवीराप्रमाणे लढले.

त्यांनी ब्रिटिशांचे तीन सेनाप्रमुखांना यमसदनी पाठविले. इंग्रज कुटनितीने लढु लागले. एकिकडे युध्दविराम करण्याची विनंती करू लागले आणि दुसरीकडे धोक्याने चिन्नम्माच्या साथीदारांना पकडुन मारू लागले. चिन्नम्मास एकटे पाडुन तीला सोलापुर जवळ लढाईत बंदी बनवुन बौग्होंगल किल्ल्यास बंदी बनवुन ठेवण्यात आले, तेथे 21 फेब्रुवारी 1829 रोजी मृत्यु झाला.

चिन्नम्माचे सर्व साथीदार एक एक करून इंग्रजांच्या धुर्तपणास बळी पडले.

राणीस बंदी बनविल्यानंतर संगोली रायन्नाने युध्द सुरू ठेवले होते. राणीच्या शोधात त्यांनी वेळ गमावला आणि इंग्रजांनी संधी साधुन रायन्ना चा पराभव करून त्यांची हत्या केली. राणीचा दत्तक पुत्र शिवलिंगप्पास गादीवरून उतरवून ब्रिटिश अधिका.यांनी कित्तूरची जागीर ब्रिटिश कंपनीस जोडली.

चेन्नम्माची महानता आज ही आपणांस कित्तुर येथे दिसुन येते तिच्या आठवणीत 22 मे ते 24 ऑक्टोबर ला दरवर्षी मे महिन्यात मोहोत्सव साजरा केला जातो.

नवी दिल्ली च्या संसदेच्या मुख्य सदनात कित्तुर राणीची प्रतिमा सुध्दा आहे.

11 सप्टेंबर 2007 रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राणीचा उल्लेख दोन्ही संसद सदनाच्या संयुक्त अधिवेशनात केला होता.

राणी चेन्नम्मा चा पुतळा बैंगलोर आणि कित्तुर मध्ये सुध्दा स्थापीत केला आहे.

युध्दात राणीने इंग्रजांविरूध्द अभूतपुर्व साहसाचा परिचय दिला होता. पुणे बैंगलुरू राष्ट्रीय राजमार्गावर परबेलगाम जवळ कित्तुर चा राजमहल व इतर इमारती राणी च्या शौर्याची आठवण करून देतात.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ राणी चेन्नम्मा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “कित्तुर ची राणी चेन्नम्मा – Kittur Rani Chennamma History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट:  Kittur Rani Chennamma – कित्तुर ची राणी चेन्नम्मा यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here