कोणार्क सुर्य मंदिराचा इतिहास

Konark Sun Temple Information

हिंदु धर्मात सुर्यदेवाच्या पुजेचे विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रात सुर्यदेवाला ग्रहांचा राजा मानण्यात आले आहे. वेदपुराणां मधे सांगितल्या नुसार सुर्य देवाची आराधना केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष दुर होतात.

सर्व देवतांमध्ये सुर्यच अशी देवता आहे जीचे प्रत्यक्ष रूपाने दर्शन घडते. त्याच्या प्रकाशामुळेच ह्या सृष्टीवर जीवन संभव आहे.

इतकेच नव्हें तर पृथ्वीवर सुर्यच हा उर्जेचा महत्वपुर्ण स्त्रोत आहे.

वैदिक काळा पासुन सुर्यदेवाची पुजा अर्चना केली जाते.

कित्येक मोठमोठया राजांनी सुर्यदेवाची आराधना प्रार्थना केलीये आणि आपली मनोकामना पुर्ण झाल्यानंतर सुर्याप्रती आपला अतुट विश्वास प्रदर्शित करण्याकरता कित्येक सुर्यमंदीर स्थापीत केले.

त्याच मंदिरांपैकी एक महत्वपुर्ण मंदिर आहे “कोणार्कचे सुर्य मंदिर”.

हे मंदिर आपल्या भव्यतेमुळे आणि अद्भूत निर्मीतीमुळे संपुर्ण देशात प्रसिध्द आहे आणि सर्वात प्राचीन ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणुन प्रसिध्द आहे.

चला तर माहिती करून घेऊया सुर्यदेवाला समर्पित सुर्य मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि त्यासंबंधीत काही महत्वपुर्ण माहिती.

Contents show

कोणार्क सुर्य मंदिराची माहिती मराठीमध्ये – Konark Surya Mandir Information in Marathi

Konark Sun Temple

कोणार्क सुर्य मंदिर कोठे स्थित आहे, आणि या मंदिराची निर्मीती कुणी केली? – Where is Konark Surya Mandir

भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिध्द असे सुर्य मंदिर ओडिसा राज्यातील पुरी जिल्हयात कोणार्क येथे स्थित आहे.

सुर्य देवाला समर्पित हे कोणार्क मंदिर ओडिसातील पुर्व किनाऱ्यावर स्थित आहे.

आपल्या भव्यतेमुळे आणि आश्चर्यकारक बांधकामामुळे हे मंदिर फार प्रसिध्द आहे.

या मंदिराचा आकार एका मोठया रथाप्रमाणे असल्यामुळे या मंदिराला परमेश्वराचे रथ मंदिर देखील संबोधण्यात येते.

कोण आणि अर्क या दोन शब्दांमुळे बनले कोणार्क. कोन या शब्दाचा अर्थ किनारा असा होतो तर अर्क हा शब्द सुर्याशी संबंधीत आहे.

अर्थात सुर्याचा किनारा ज्याला कोणार्क असे म्हंटल्या जातं. या अर्थानेच या सुर्य मंदिराला कोणार्क चे सुर्य मंदिर या नावाने ओळखले जाते.

अद्भुत सौंदर्यामुळे कोणार्क सुर्य मंदिराला भारताच्या ७ आश्चर्यांमधे स्थान मिळाले आहे. या प्राचीन मंदिराची निर्मीती इसवी सन १२५० मध्ये पुर्व गंगा राजवंशीय प्रसिध्द सम्राट नरसिम्हा देव यांनी केलीये.

कोणार्क सुर्य मंदिराची निर्मीती गंगा राजवंशाचे प्रसिध्द शासक राजा नरसिम्हादेव यांनी १२४३ – १२५५  दरम्यान १२०० मजुरांच्या मदतीने केली.

या अप्रतीम सौंदर्याचा नमुना असलेल्या मंदीराचे नक्षीकाम करण्यास जवळजवळ १२ वर्षांचा मोठा कालावधी लागला.

मंदिराच्या निर्मीती मागे अनेक पौराणिक आणि धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात.

कोणार्क सुर्य मंदिराचा इतिहास – Konark Sun Temple History

सुर्य देवाचे कोणार्क सुर्य मंदिर आपल्या अलौकिक कलाकृती आणि भव्यतेमुळे युनेस्को च्या वल्र्ड हेरिटेज साईट मध्ये देखील सहभागी करण्यात आले आहे.

इतिहासकारांच्या मते १३ व्या शतकात अफगाण शासक मोहम्मद शौरी च्या शासनकाळात ज्यावेळी मुस्लिम शासकांनी भारताच्या पुर्वेकडील राज्यांवर व बंगाल प्रांता सहीत कित्येक राज्यांवर ताबा मिळवला होता त्या वेळेपर्यंत कोणताही शासक या बलाढय मुस्लिम शासकांविरूध्द युध्द करण्याकरता पुढे आला नाही त्यावेळी हिंदु शासन नष्ट होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचले होते आणि ओडीसा येथील हिंदु साम्राज्य देखील नष्ट होईल अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.

अश्या परिस्थीतीत गंगा राजवंशाचे शासक नरसिम्हादेव यांनी आपल्या सैन्यांमध्ये मुस्लिमांविरूध्द बंड पुकारण्याचे साहस भरले आणि त्यांना अद्दल घडविण्याकरता आपल्या चतुर निती च्या सहाय्याने मुस्लिम शासकांविरूध्द युध्द पुकारले.

त्या दरम्यान दिल्ली च्या गादीवर सुल्तान इल्तुतमिश याचे राज्य होते. त्याच्या मृत्युनंतर नसीरूद्दीन मोहम्मद ला उत्तराधिकारी बनविण्यात आले व तुगान खान ला बंगाल चा राज्यपाल म्हणुन नियुक्त करण्यात आले.

त्यानंतर ईसवीसन १२४३ मध्ये नरसिम्हा देव प्रथम आणि तुगान खान यांच्यात मोठे युध्द झाले.

या युध्दात नरसिम्हा देव यांनी मुस्लिम सेनेला नामोहरम करत मोठे यश संपादन केले.

नरसिम्हा देव सुर्यदेवाचे मोठे उपासक होते, म्हणुन आपल्या विजयाच्या आनंदात त्यांनी सुर्य देवाला समर्पित असे कोणार्क सुर्य मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला.

या विश्व प्रसिध्द कोणार्क सुर्य मंदिराचा आकार परमेश्वराच्या भव्य आणि विशाल रथा सारखा आहे.

या रथात २४ चाकं असुन ६ घोडे नेतृत्व करतांना दिसुन येतात.

ओडिसातील हे सुर्य मंदिर पाहातांना अतिशय सुंदर आणि भव्य दिसुन येते.

कोणार्क सुर्य मंदिराशी संबंधीत पौराणिक आणि धार्मिक कथा – Konark Sun Temple Story

ओडीसा येथील मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या कोणार्क सुर्य मंदिराशी संबंधीत अनेक पौराणिक आणि धार्मिक कथा प्रसिध्द आहेत…

एका कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांबा याने नारदमुनिं समवेत अभद्र व्यवहार केला त्यामुळे क्रोधीत होउन नारद मुनींनी सांबा ला कुष्ठ रोग (कोड) होण्याचा श्राप दिला

या श्रापा पासुन वाचण्याकरता ऋषी कटक यांनी सांबाला सुर्यदेवाची कठोर तपस्या आणि आराधना करण्यास सांगीतले.

भगवान श्रीकृष्णाच्या या पुत्राने शापा पासुन मुक्तता मिळविण्याकरता चंद्रभागा नदीच्या तिरावर मित्रवना शेजारी १२ वर्षांपर्यंत कष्ट निवारण सुर्य देवाचे कठोर तप केले.

त्यानंतर एक दिवस सांबा चंद्रभागा नदीत स्नान करत असतांना पाण्यात त्याला सुर्यदेवाची मुर्ती मिळाली त्याने त्या मुर्तीला त्याच ठिकाणी स्थापीत केले जेथे आज हे विश्वप्रसिध्द कोणार्क सुर्य मंदिर स्थापीत आहे.

अश्या तऱ्हेने सुर्यदेवाची कठोर आराधना केल्याने सांबाची नारदमुनींनी दिलेल्या शापातुन मुक्तता झाली आणि त्याचा रोग नाहीसा झाला म्हणुन देखील या मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे.

करोडो भाविकांची या मंदिराप्रती आस्था जोडली गेली आहे त्यामुळे खुप लांबुन भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.

कोणार्क सुर्य मंदिराची अद्भुत वास्तुकला – Konark Sun Temple Architecture

कोणार्क चे सुर्य मंदिर ओडीसातील मध्ययुगीन वास्तुकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला कलिंग वास्तुकलेचा सर्वोच्च बिंदु मानण्यात येतो. कारण कोणार्क सुर्य मंदिराची वास्तुकला बऱ्याच प्रमाणात कलिंगा मंदिराच्या वास्तुकलेशी मिळती जुळती आहे.

ओडीसाच्या पर्वेकडील समुद्र किनारी पुरी नजिक स्थित या कोणार्क सुर्य मंदिराची संरचना आणि येथील दगडांपासुन बनविलेल्या मुर्त्या कामोत्तेजक मुद्रांमध्ये पहायला मिळतात ज्या या मंदिराच्या वैशिष्टयामधे अधिकच भर घालतात.

एक विशाल रथा सारखे प्रतित होणारे कोणार्क च्या सुर्य मंदिराला चाकांच्या १२ जोडया लागलेल्या आहेत या भव्य रथाला ७ धष्टपुष्ट घोडे ओढत असल्याचे आपल्याला दिसते. रथाला लागलेली ही चाकं घडयाळाचे देखील कार्य करतात. यावर पडणाऱ्या सावलीवरून वेळेचा अंदाज सहज लावल्या जाऊ शकतो.

मंदिराला असलेले ७ घोडे आठवडयाच्या ७ दिवसांचे प्रतिक आहेत तर चाकांच्या १२ जोडया दिवसातील २४ तासांना दर्शवितात चाकांमधल्या ८ काडया दिवसातील ८ प्रहरांना दर्शवितात.

काळया ग्रॅनाईटने आणि लाल दगडांनी बनलेले हे एकमेव सुर्यमंदिर आहे जे आपल्या बांधकामाच्या खास पध्दतीमुळे आणि भव्यदिव्यतेमुळे पुर्ण जगात ओळखले जाते.

या अद्भुत मंदिराच्या निर्माण कार्यात कित्येक मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आला आहे.

या सुर्य मंदिरात सुर्य देवतेची बाल्यावस्था, युवावस्था, आणि वृध्दावस्था दर्शवणाऱ्या वेगवेगळया तीन मुर्ती पहायला मिळतात त्यांना उदित सूर्य, मध्यान्ह सूर्य आणि अस्त सूर्य देखील संबोधण्यात येते.

मंदिराला त्याच्या अप्रतीम सौंदर्यामुळे आणि अलौकिक वास्तुशिल्पामुळे युनेस्को च्या वल्र्ड हेरिटेज च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

कोणार्क सुर्य मंदिराच्या प्रवेश व्दारावर वाघ हत्तींचा विनाश करत असल्याचे शिल्प पहावयास मिळते.

येथे वाघ गर्व अहंकाराचे प्रतिक तर हत्ती धनाचे प्रतिक मानले गेले आहे.

लाखो भाविक ओडीसा मधे स्थित असलेल्या या सुर्य मंदीराशी श्रध्देने जोडले गेले आहेत.

या मंदिरात दर्शन घेतल्याने आपली सर्व दुःख नाहीशी होतात आणि सर्व मनोकामना देखील पुर्ण होतात अशी भाविकांची मान्यता आहे.

या भव्य सुर्य मंदिराची अद्भुत कलाकृती आणि वास्तुशिल्पाला पहाण्याकरता देश विदेशातुन पर्यटक येथे येत असतात.

ब्लॅक पॅगोडा नावाने देखील या मंदिराला ओळखले जाते. या मंदिरात असलेले उंच टॉवर काळे दिसत असल्याने हे नाव पडले असावे.

कोणार्क सुर्य मंदिरापर्यंत कसे पोहोचाल? – How To Reach Konark Sun Temple?

ओडीसातील या सुर्य मंदिराला बघण्याकरता फेब्रुवारी ते ऑक्टोबर हा काळ सर्वात चांगला काळ समजला जातो.

या काळात वातावरण देखील आल्हाददायक असतं. ट्रेन, बस, आणि विमानाने देखील या मंदिरापर्यंत पोहोचता येतं.

भुवनेश्वर हे कोणार्क च्या नजिकचे विमानतळ आहे. येथुन दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता सहीत देशातील मोठमोठया शहरांपर्यंत नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. विमानतळापासुन कोणार्क पर्यंत टॅक्सी किंवा बस ने सहज पोहाचता येतं.

रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास भुवनेश्वर आणि पुरी ही दोन रेल्वेस्थानकं कोणार्कच्या जवळची आहेत.

भुवनेश्वर रेल्वे स्टेशन पासुन कोणार्क चे अंतर ६५ कि.मी एवढे असुन पुरी ते कोणार्क हे अंतर ३५ कि.मी. इतके आहे.

येथे टॅक्सी किंवा बस च्या माध्यमाने पोहोचणे सोयीचे आहे.

कोणार्क करता पुरी आणि भुवनेश्वर येथुन नियमित डिलक्स आणि चांगल्या बसेस ये जा करतात या व्यतिरीक्त खाजगी बसेस आणि टॅक्सी देखील धावतात.

या मंदिराचे धार्मिक महत्व आणि याचे अलौकिक आणि विस्मयकारक सौंदर्य पाहाण्याकरता केवळ देशातीलच नव्हें तर विदेशातील पर्यटक देखील लाखोंच्या संख्येने येथे येतात.

येथील भव्य कलाकृतीचा आनंद घेतात आपल्या दुःखांचं आणि कष्टांचं निवारण प्राप्त करतात.

कोणार्क मंदिराविषयी विशेष माहिती – Konark Sun Temple Special Information

  • रथाच्या आकारातील निर्माण कार्य – Chariot Wheel

या मंदिराची निर्मीती रथाच्या आकारात करण्यात आली आहे.

या रथाला एकुण २४ चाकं आहेत रथाच्या प्रत्येक चाकाचे डायमीटर १० फुट इतके असुन रथाला ७ घोडे देखील आहेत.

  • युनेस्को वल्र्ड हेरिटेज साईट – UNESCO World Heritage Site

आश्चर्यचकित करणारे प्राचीन निर्माण कलेचे अद्भुत कोणार्क मंदिर युनेस्को वल्र्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे.

हा सन्मान मिळविणारे ओडिसा राज्यातील हे एकमेव मंदिर आहे.

  • नश्वरतेची शिक्षा – The Punishment Of Racism

कोणार्क मंदिराच्या प्रवेश व्दारावरच दोन मोठे वाघ बनविण्यात आले आहेत.

या वाघांना हत्तीचा विनाश करतांना दाखविण्यात आले आहे.

मनुष्याच्या आत देखील एक हत्ती असतो.

या दृश्यात वाघ गर्वाचे आणि अहंकाराचे तर हत्ती धनाचे पैश्याचे प्रतिनिधीत्व करतो आहे.

मनुष्याच्या अनेक समस्यांना या एका दृष्यातच चित्रीत करण्यात आले आहे.

  • सुर्य देवाला समर्पित – Dedicated To Sun God

मंदिरात सुर्य देवाची पुजाअर्चना करण्यात येते मंदिराचा आकार एका विशाल रथासारखा आहे.

हे मंदिर आपल्या विशाल कलाकृतीमुळे व मंदिर निर्माण कार्यात लागलेल्या मुल्यवान धातुंच्या उपयोगामुळे प्रसिध्द झाले आहे.

  • मंदिराची चाकं उन्हात घडयाळाचे कार्य करतात आणि अचुक वेळ सांगतात – The wheels of the temple work clockwise in the summer and tell the exact time

मंदिराच्या मुख्य आकर्षणात मंदिराच्या रथाला लागलेल्या चाकांच्या १२ जोडया देखील आहेत.

ही चाकं साधारण चाकं नसुन योग्य वेळ दाखवणारी घडयाळं आहेत.

या चाकांच्या पडणाऱ्या सावलीवरून कुणालाही किती वाजलेत याचा अचुक अंदाज लक्षात येतो.

  • निर्माण कार्यातील विज्ञान – Science In Develop Temple

मंदिराच्या वर एक मोठे चुंबक लावण्यात आले आहे आणि मंदिराच्या प्रत्येक दोन दगडांमध्ये लोखंडाची प्लेट लावण्यात आली आहे.

चुंबकाला अश्या तऱ्हेने मंदिरात लावण्यात आले आहे की ते हवेतच फिरत राहाते.

हे असे निर्माणकार्य देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरले आहे.

दुर दुरून हे पाहाण्याकरता पर्यटक गर्दी करतात.

  • काला पॅगोडा – Black Pagoda (Kala Pagoda)

या मंदिराच्या गडद रंगामुळे त्याला काला पॅगोडा देखील म्हंटल्या जाते.

नकारात्मक उर्जेला कमी करण्याकरता ओडिसा येथे याचा प्रयोग करण्यात येतो.

  • वास्तुशिल्पीय आश्चर्य – Architectural wonder

कोणार्क मंदिराचा प्रत्येक भाग विशेष आहे आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो.

आणि म्हणुन कोणार्क सुर्य मंदिर भारतातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

  • किनाऱ्यावर देण्यात आलेत निर्देश – Konark Sun Temple Magnet

दररोज सकाळी सुर्याची पहिली किरणं नाटय मंदिरातुन मंदिराच्या मध्यभागावर पडतात. उपनिवेशा वेळी ब्रिटीशांनी चुंबकीय धातु मिळवीण्याकरता चुंबक काढुन टाकले होते.

तर असा आहे कोणार्क च्या मंदिराचा इतिहास आशा करतो आपल्याला आजच्या लेखामुळे नवीन माहिती मिळाली असेल, अश्याच नवीन नवीन लेखांसाठी आमच्याशी जुळलेले राहा माझी मराठी वर.

आणि हा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top