कोथिंबीर ची संपूर्ण माहिती

कोथिंबीरची संपूर्ण माहिती – Kothimbir Information in Marathi

Kothimbir Information in Marathi
Kothimbir Information in Marathi
हिंदी नाव धनिया
इंग्रजी नाव Coriander

शेतकऱ्यांना परवडणारे व सतत मागणी असणारे कमी कालावधीतील पिक म्हणजे कोथिंबीर. आमटीत घातलेली कोथिंबीर, आमटीचा स्वाद वाढवते ओली कोथिंबीर पदार्थाला गोडी, सुवास व मनास आवड निर्माण करते तर वाळलेली कोथिबीर स्निग्ध व मधुर विपाकी (पचनकाळी गोड पाक होतो) तुरट, तिखट, व पचायला हलकी असते.

कोथिंबीरीची लागवड केल्यापासून अगदी ३५ ते ४० दिवसात कोथिंबीरीचे पिक येते. घरोघरी होणाऱ्या सकाळच्या न्याहारीत उदा. उपमा, पोहे, खमण किंवा जवळपास सर्वच भाज्यामध्ये याचा उपयोग केला जातो.

या भाजीत पांढरी फुले येतात नंतर हिरव्या रंगाच्या बिया येतात यालाच आपण इने म्हणतो. नाश्त्यात प्रथम कोथींबीरीचीच आठवण होते या भाजीत पण औषधी गणधर्म मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे कोथिंबीर खुप महत्वाची मानली जाते.

धन्याचा उपयोग अपचन पोटदुखी, मळमळ होणे याकरिता करतात धने कोथिंबरीच्या रसामुळे डोकेदुखी थांबते. कोथिंबीरीच्या रसामुळे झोप शांत लागते. त्वचा लाल झाल्यास धन्याचा रस लावतात. धने हे भूक वाढवण्यास मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here