या गावात का कोणीही राहत नाही. श्राप आहे कि आणखी काही

Kuldhara Ghost Village

भारतात असे अनेक ठिकाणे आहेत, जेथे बरेचश्या अपशकून गोष्टी घडलेल्या आहेत. आणि भविष्यात या वाईट घडलेल्या गोष्टी इतिहासातील कथांमध्ये जुडल्या जातात. तसेच मागच्या एका लेखात आपण पाहिले कि एक गाव तर असे होते जेथे घराचा दुसरा मजला बांधला तर..

दुसरा मजला का त्या गावात लोक बांधत नव्हते, हे त्या लेखात आपण पाहिले होते. आणि आजच्या लेखात एका अजब गजब घडलेल्या घटनेने या गावात कोणीही रहिवासीच राहिले नाही आणि हे गाव सुद्धा श्राप ग्रस्त झाले आहे,

तर चला पाहूया कोणते आहे ते गाव आणि का त्या गावाला श्राप मिळाला. तर चला जाणून घेवूया.

या गावात का कोणीही राहत नाही. श्राप आहे कि आणखी काही – Kuldhara Ghost Village

Kuldhara Ghost Village
Kuldhara Ghost Village

राजस्थान च्या जैसलमेर जिल्ह्यातील कुलधरा या गावाचे नाव आहे,  हे गाव जवळ जवळ मागच्या २०० वर्षापासून सुनसान पडलेलं आहे या गावात कोणीही राहत नाही, या गावाच्या लोकांनी हे गाव एका रात्रीत सोडून दिले होते.

त्या दिवसापासून या गावात कोणीही राहत नाही, पण या मागे काय घडलं हे आजही कोणाला न समजण्या सारखं आहे, या गावाचे खाली होण्यामागे एक गोष्ट लपलेली आहे, हि गोष्ट आजपासून २०० वर्षाअगोदर ची आहे.

हे गाव सुरुवातीला पडकं नव्हत, या गावात प्रेम आणि आनंदाने लोक राहत होते,  या गावाच्या आजूबाजूला सुद्धा ८४ पालीवाल ब्राम्हण राहत होते, हे गाव पूर्णपणे समृद्ध होते, पण म्हणतात ना एखाद्या चांगल्या गोष्टीला कोणाची ना कोणाची नजर लागतेच,

त्याचप्रमाणे या राज्याचा दिवाण होता सालम सिंह. सालम सिंह एक नंबर चा अय्याशी करणारा व्यक्ती होता आणि त्याची वाईट नजर या गावाच्या एका सुंदर मुलीवर पडली होती.

त्या मुलीच्या मागे तो एवढा पागल झाला होता कि कोणत्याही पद्धतीने तो त्या मुलीला मिळविण्याचे प्रयत्न करत होता. त्याने हद्द तर तेव्हा पार केली जेव्हा त्याने गावातील लोकांना काही दिवसाची मुदत दिली कि मुलीला काही दिवसात माझ्या ताब्यात दिले नाही तर मी गावावर आक्रमण करून मुलीला पळवून घेऊन जाईल.

असा मिळाला गावाला श्राप Kuldhara Village Ghost Story

जेव्हा गावातील लोकांना हे माहिती झाले, तेव्हा लोकांना वाटले कि कोणीही स्वतःची अशी मनमानी करू शकत नाही, त्यांना स्वतःचा आणि त्या मुलीच्या आत्मसन्मानाला जपण्याची यापेक्षा चांगली वेळ भेटणार नव्हती.

त्याच रात्री सर्व गावकऱ्यांनी म्हणजेच ५ हजार पेक्षा जास्त परिवारांनी ते गाव सोडून द्यायचा निर्णय घेतला.

या ५ हजार परिवार ८४ वेगवेगळ्या गावचे होते, हे सर्व लोकं एका मंदिराच्या ठिकाणी जमा झाले आणि तेथे त्यांची बैठक भरवली आणि या बैठकीत त्या मुलीला दिवान ला दिल्या जाऊ नये हा विचार संमत झाला.

त्या सर्व व्यक्तींनी त्या राज्याला सोडून जायचा विचार संमत केला आणि त्या रात्रीच ते सर्व जण त्या राज्याला सोडून निघून गेले, आणि जाता जाता त्या लोकांमधील काही ब्राम्हणांनी त्या गावाला श्राप दिला, तेव्हापासून या गावात कोणीही राहत नाही.

या गावाच्या आजूबाजूचे ८२ गाव पुन्हा वसले पण या भागातील २ गाव खाभा आणि कुलधरा या गावांत आजही कोणती वस्ती नाही आहे. हे गाव आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे, या गावात फक्त दिवसा पाहायला आलेल्या व्यक्तींना जाऊ दिले जाते.

पुरातत्व विभागाच्या काही लोकांचे असे मत आहे कि या गावात काही अदृश्य शक्ती आहे ज्या डोळ्याने दिसत नाहीत. त्या शक्ती फक्त रात्री काम करतात,

दिल्लीच्या एका टीम ने जेव्हा या गावात एक रात्र मुक्काम केले तेव्हा त्यांनी गावच्या वर ड्रोन कॅमेरा लावला होता, पूर्ण गावावर ड्रोन फिरवत असताना जेव्हा ड्रोन तेथील एका विहिरीच्या ठिकाणी आला तेव्हा काही हालचाल होऊन तो खाली जमिनीवर पडला. जसा तो कॅमेरा कोणाला तरी मान्य नव्हता.

अश्या बरेचश्या गोष्टी आपल्याला या ठिकाणाविषयी ऐकायला मिळतात, पण हे पण सत्य आहे कि येथे सांगितल्या जाणाऱ्या ह्या भुतांच्या आणि आत्म्यांच्या गोष्टी फक्त अंधश्रध्दा आहे.

असे म्हटल्या जात कि या गावातून जे ब्राम्हण व्यक्ती गाव सोडून गेले होते, त्यांनी त्यांचे दागिने आणि सोन्याच्या गोष्टी येथील जमिनीत लपवून ठेवल्या आहेत, म्हणून या गावात जागोजागी आपल्याला जमिनीला खोदण्याचे निशाण दिसतात.

काही गोष्टींचे आजही ज्याप्रमाणे रहस्यच राहते हे गाव सुद्धा त्यापैकी एक आहे, या ठिकाणाविषयी किंवा येथे घडलेल्या घटनांविषयी आम्ही आपल्याला कोणताही निर्वाळा देत नाही.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here