कौरव आणि पांडवांचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का झाले? शापित होती का कुरुक्षेत्राची जमीन?

Kurukshetra War

महाभारत कुठे आणि कश्यामुळे घडले हे आपल्याला माहितीच आहे, पण महाभारत कुरुक्षेत्राच्या जमिनीवरच का घडले, याविषयी आपल्याला माहिती आहे का? ज्या कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, या भूमीवरच युद्ध का करण्यात आले, बाकी ठिकाणांवर युद्ध का केल्या गेले नाही.

असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का? जर कधी आपल्याला असा प्रश्न पडला असेल तर आपण या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? आपण आजच्या लेखात आपण या विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया त्या विषयी थोडीशी माहिती.

कौरव आणि पांडवांचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का झाले? शापित होती का कुरुक्षेत्राची जमीन? – Kurukshetra War

Kurukshetra War
Kurukshetra War

महाभारताचे युद्ध – Mahabharat War Story

महाभारताचे युद्ध जगातील सर्वात मोठ्या महायुद्धांपैकी एक आहे. कारण या युद्धात दोन्ही पक्षांमधील करोडो लोकांचा जीव गेला होता. हे युद्ध जगातील भीषण युद्धांमधील एक होते, असे युद्ध भूतकाळात कधी झाले नाही आणि भविष्यात कधी होणारही नाही.

युद्धाच्या या भूमीमध्ये असे काय असणार जिने एवढ्या लोकांचा जीव घेतला. भगवान श्रीकृष्णानेच या ठिकाणाला युद्धासाठी निवडले होते. आणि यामागे सुद्धा एक रहस्य लपलेलं आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा महाभारताचे युद्ध ठरले होते तेव्हा युद्धाचे ठिकाण कोणते राहणार याविषयी चर्चा होत होती.

त्यांनतर भगवान श्रीकृष्णांनी युद्धाची भूमी शोधण्याचे काम आपल्या हाती घेतले आणि त्यांनतर त्यांनी त्यांचे काही दूत या कामाला लावले. भगवान श्रीकृष्ण या युद्धाच्या माध्यमातून पृथ्वीवरील पाप मिटवून नव्याने धर्माची स्थापना करण्याचे ठरवीत होते म्हणून युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी अशी जागा शोधायचे ठरविले होते जेथे अधर्म आणि अधर्माचा साथ देणारे सर्वच नष्ट होतील.

जेव्हा सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले कि युद्धाच्या दोन्ही बाजूला भाऊ-भाऊ आणि गुरु-शिष्य युद्ध करतील तेव्हा यांच्यात झालेल्या युद्धात स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना मरताना पाहून सुरु असलेल्या युद्धाला कौरव आणि पांडव पूर्णविराम देतील आणि पुन्हा चांगले संबंध स्थापित करतील.

म्हणून कृष्णाने त्यांच्या दूतांना अशी जागा शोधण्यासाठी पाठविले ज्या जागेवर क्रोध आणि द्वेष पूर्ण प्रमाणात भरलेला असणार. चहूकडे अशी जमीन शोधण्यासाठी दूत प्रवास करत होते. खूप वेळानंतर अशी एक जागा सापडली जी या युद्धासाठी उत्तम होती. आणि ती जागा होती कुरुक्षेत्र.

जेव्हा श्रीकृष्णाने चहूकडे त्यांचे दूत पाठवले होते, तेव्हा त्या पैकी एका दूताने कुरुक्षेत्राची जमीन युद्धासाठी योग्य असल्याचे  सांगितले तेव्हा कृष्णाने त्याला विचारले कि हीच जागा का निवडावी तेव्हा त्या दूताने कृष्णाला सांगताना सांगितले कि,

हि जमीन अशी आहे कि या जमिनीवर दोन भावंडांमध्ये भांडण झाले होते, जोराच्या पावसामुळे लहान भावाच्या शेताचा बांध फुटून मोठ्या भावाच्या शेतात पाणी गेले असता त्याने लहान भावाला बांध ठीक करायचे सांगितले पण लहान भावाने त्यासाठी नकार दिला, तेव्हा ते भांडण एवढ्या मोठ्या स्तरावर गेले कि मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात सुरा खुपसून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ओढून आणत पाणी वाहणाऱ्या बांधावर आणून टाकला.

त्या जागी झालेली सत्य घटना ऐकल्या नंतर भगवान श्री कृष्णाला कळले कि हि जमीन युद्धासाठी योग्य राहील, त्यांना समजले कि हि जमीन भावा- भावांमध्ये सगे-सोयर्यांमध्ये  युद्धासाठी पूर्णपणे योग्य आहे.

हि जमीन युद्धाच्या दरम्यान भावा भावांमध्ये जिव्हाळा उत्पन्न होऊच देणार नाही, मग युद्ध थांबण्याची कोणती आशांकाच राहणार नाही. यामुळे कृष्णाने कुरुक्षेत्राला युद्धाची जागा निवडली.

यावरून आपल्याला एक गोष्ट कळते कि एखाद्या चांगल्या किंवा वाईट घडलेल्या घटनांचा प्रभाव बराच काळ त्या जमिनीवर राहत असतो.

आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top