“पाहिजे ते मिळवायचे का? मग जाणून घ्या निसर्गाचा हा नियम”

Law Of  Attraction

अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो तो

 पुरी कायनात उसे मिलाने मै लग जाती है!”

हा डायलॉग आपण शाहरुख खान च्या “ओम शांती ओम” या हिंदी चित्रपटात पाहिला असेलच, यालाच आपण “Law Of  Attraction” म्हणू शकतो. कारण जगातील सगळ्यात शक्तिशाली काही असेल तर ते आहेत माणसाचे विचार!

Law of Attraction in Marathi

“पाहिजे ते मिळवायचे का?  मग जाणून घ्या निसर्गाचा हा नियम” – Law of Attraction in Marathi

एक विचारू!

ताज महल सर्वात पहिले कुठं बनला असेल बरं ?

तर आपल उत्तर येईल कि आग्र्याला, यात काय कठीण आहे!

नाही आग्र्याला नाही!

ताजमहाल हा सर्वात पहिले आग्र्याला बनला नसून तो बनला होता, शहाजहा च्या विचारांमध्ये त्यानंतर कुठे त्याने त्या महालाला जमिनीवर वास्तवात आणण्याचा विचार केला आणि त्यानंतर कुठं वास्तवात आणला. तेही आपल्या मजुरांच्या सहाय्याने.

मला तुम्हाला एवढचं सांगायचे आहे कि माणसाच्या विचारांमुळे माणूस या जगात काहीही करू शकतो.

फक्त आवश्यकता आहे ते योग्य विचार करण्याची!

आपले विचारच आपले भविष्य घडवू शकतात. ते आपल्यावर अवलंबून आहे कि आपण काय बनू इच्छिता!

Law of Attraction Techniques

(उदा. आपण असा विचार कराल कि माझ्याजवळ खूप पैसा आहे तर आपण पाहासाल कि आपल्याजवळ खरच बऱ्यापैकी पैसा येईल. पण आपण नेहमी हाच विचार करत असाल कि मी गरीब आहे, माझ तर नशिबच फुटलेलं आहे. तर आपण आणखी गरीब होत जाणार.)

वरील उदाहरण वाचून आपल्याला थोडस वेगळ वाटेल. पण हेच सत्य आहे. आणि हे फक्त सत्य नाही, तर हे सार्वत्रिक सत्य आहे.

तुम्हाला हे तर माहित आहे कि कोणताही नियम हा जगाच्या कोणत्याही कोपर्यात जा, तो जसा आहे तसाच राहतो.

(उदा. पृथ्वीवर कुठेही गेले तरीही गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा आहे तसाच राहतो त्यामध्ये कोणताही बदल होत नसतो.)

याचा अर्थ असा कि हा नियम आपण कुठेही गेलो तर लागू होईलच यात शंकाच नाही.

आपण आपल्या विचारांच्या जोरावर या जगात काहीही करून दाखवू शकतो.

आपण जसे विचार करणार तसेच आपण बनणार, आज आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच.

आणि हे काही नवीन नाही आहे, भगवान गौतम बौद्धांनी हजारो वर्षापूर्वीच हि संकल्पना मांडली होती,

कि आपले विचारच सर्व काही आहे, तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करता.

सोबतच स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा हिच गोष्ट थोड्या वेगळ्या प्रकारे मांडली. ते अशी कि “आपण तेच बनतो जे आपण विचार करतो.

पण एवढ्या मोठ्या गोष्टीला सहज मान्य करने खूप कठीण आहे.

काही वाचक वर्ग तर या गोष्टीशी त्यांची असहमती दाखवतील, आणि त्यांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहत असतील. कि असे होणे कठीण आहे.

तर आपण काळजी करू नका,

law of attraction cha niyam

मी आपल्याला या विषयी पूर्ण माहिती देण्याचे प्रयत्न करणार,

“Law Of Attraction” किंवा आकर्षणाचा नियम हे सांगतो, कि तुम्ही तुमच्या जीवनात त्याच गोष्टींना आकर्षित करता ज्याविषयी तुम्ही नेहमी विचार करता.

तुमचे प्रबळ विचार हे सत्यात उतरायचा कोणता न कोणता रस्ता शोधून काढतच असतात.

आपण लहानपणी अलादिन आणि जीन ची गोष्ट तर ऐकलीच असेल, ज्यामध्ये अलादिन ला एक चिराग सापडतो त्यांनतर त्या चिराग ला तो आपल्या हाताने रगळतो आणि त्यांनतर त्यामधून एक मोठा जीन बाहेर पडतो, आणि अलादिन ला म्हणतो.

आका मै आपके लिये क्या कर सकता हु!

आणि पुढे काय होते हे प्रत्येकाला माहीतच आहे.

हि सृष्टीहि आपल्या जीवनात त्या जीन सारखीच आहे, हि सृष्टी आपल्याला सुद्धा तेच म्हणते कि सांगा तुम्हाला पाहिजे काय ?

आपल्याला फक्त गरज असते ते आदेश देण्याची. आपण जर आपल्या जीवनात भांडण, तंटे, गरिबी, बिमारी या विषयी विचार केला तर आपण पाहाल कि आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतील.

तेच त्याविरुध्द आपण जर प्रेम, शांती, आनंद या सर्व गोष्टींविषयी विचार केला तर आपण आश्यर्यचकीत होऊन जाल कि ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात खरोखरच येत आहेत. आणि आपले जीवन सुंदर बनत आहे.

जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीविषयी विचार करत असता तेव्हा आपण या सृष्टीला त्या गोष्टीसाठी आवाहन करत असतो. ते गोष्ट चांगली कि वाईट हे या सृष्टीला कळत नाही.

तुम्ही ज्याविषयी विचार करता त्या गोष्टी तुमच्या जीवनात आपोआप होऊनच जातात. त्यासाठी विचार करायचाच आहे तर चांगला का नाही मग.

ज्यामुळे आपले जीवन सुंदर बनायला मदत होईल.

तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का?

आपण विचार करतो कि आज आपल्याला ऑफिस ला उशीर होऊ नये आणि बरोबर त्याच दिवशी आपल्याला ऑफिस साठी उशीर होतो.

सोबतच आपण पाहतो कि बरोबर त्याच दिवशी ट्राफिक मध्ये आपल्या समोर गाड्यांची रांगची-रांग लागलेली असते, आणि अस वाटतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्याला ऑफिसला उशिर करण्यासाठी कोणीतरी घडवून आणतय.

असं का होत असेल बरं?  कधी याचा विचार केला का?

Law of Attraction Meaning in Marathi

आपल्याला मी अगोदरच सांगितले कि हि सृष्टी आपल्यासाठी जीन सारखी आहे तिला कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे आणि कोणती गोष्ट वाईट हे मुळीच कळत नाही,

ते फक्त तुमच्या विचारांना स्विकारते आणि त्यावर प्रतिक्रिया देते.

आपण ऑफिस ला उशीर होण्याचा विचार केलाच नसता तर शक्यता असती कि आपण ऑफिस वर वेळेवर पोहचले असते.

त्याचप्रमाणे जीवनात आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक गोष्टींवर नाही!

तुम्हाला मी माझ्या आणि माझ्या मित्रामधील एक रोचक संवाद सांगू इच्छितो,

माझ्या मित्राला जेव्हा मी या अनोख्या नियमा विषयी सांगितले तेव्हा त्याने मला विचारले कि,

मग माझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या का बरं? त्या काय मी बोलावतो ?

तर माझे त्याला उत्तर होते हो! याचे कारण तूच आहेस.

तो बोलला ते कसे काय?

त्याला सांगताना मी सांगितले कि, तू तुझ्या जीवनात सतत हा विचार करतो कि मला कोणतीही समस्या येता कामा नये.

आणि त्या सततच्या विचारांमुळे तू समस्यांना अप्रत्यक्ष रित्या तुझ्या जीवनात आमंत्रण देत आहेस.

law of attraction quotes

त्यावर तो म्हणाला हो, मी हाच विचार करत असतो कि माझ्या सोबत असं झाल तर काय होईल. तसं झाल तर काय होईल.

मग तो पुढे म्हणाला यावर मी करू काय कि माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून येतील,

त्यावर मी त्याला उपाय सांगताना बोललो कि तू समस्यांविषयी विचार करण्यापेक्षा तुझ्या जीवनात आनंद, प्रेम,सुख, शांती या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष दे. तुला पाहायला मिळेल कि अचानकरित्या तुझ्या जीवनात एक वेगळा बदल घडत आहे. आणि तुझ्या जीवनातील समस्याही कमी होत आहेत.

त्यानंतर कुठे जाऊन तो माझ्या या गोष्टीला सहमत झाला, कि खरच असेही काही असते.

आपलेहि असेच आहे आपण आपल्या जीवनात नको असलेल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, त्यामुळे आपल्या जीवनात त्याच गोष्टी सतत घडतात आणि त्यांनतर आपण नशिबाला दोष देत बसतो.

पण आपण जर या नियमाला चांगल्या प्रकारे समजून घेतले तर आपले जीवन आणखी चांगल्या प्रकारे सुंदर होऊ शकते.

You Are The Creator Of Your Own Destiny”!

                                    –स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा म्हटल आहे कि, तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात.

आपले नशीब बदलायचे कि बिघडवायचे हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.

त्यामुळे जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि आजपासून ठरवून घ्या कि मी माझ्या जीवनाला आणखी सुंदर बनविण्याचा प्रयत्न करणार.

आशा करतो कि आजचा लेख आपल्याला आवडला असेल,

जर आपल्याला आमचा हा “Law Of  Attraction” वर लिहिलेला लेख आवडला असेल,

तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका. आणि आपल्याला हा लेख कसा वाटला हे कळवायला सुद्धा विसरू नका.

आपल्याला हा लेख जर आवडला असेल तर

आम्ही लवकरच आणखी एक लेख घेऊन येऊ ज्यामध्ये “Law Of  Attraction” ला आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींचे पालन करून लागू करू शकता.

त्यासाठी आपण आपला अभिप्राय नोंदवा.

Thank You So Much All Of You!

Keep Loving us!

2 COMMENTS

  1. Kharch khup mahatvachi mahiti dili aahe hya lekhat .me manifest try karat hote pan nakki tyachya arth Aaj samjal ……..thanks a lot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here