Wednesday, August 27, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

सिंहाची माहिती

Lion chi Mahiti

जंगली प्राणी पुष्कळ आहेत; त्यांतील एक प्राणी म्हणजे सिंह होय. सिंह याला जंगलाचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. सिंह हा सुद्धा मांजरीच्या कुळातील वाघानंतर दुसरा सर्वात मोठा प्राणी आहे. याच्या एका डरकाळीच्या प्रचंड आवाजाने जंगल दणाणून जाते.

सिंहाची माहिती – Lion Information in Marathi

Lion Information in Marathi
Lion Information in Marathi
हिंदी नाव :शेर
इंग्रजी नाव : LION

सिंहाला चार पाय, दोन डोळे, दोन कान आणि एक शेपटी असते. सिंहाचे अंग पिवळसर, मजबूत, पीळदार आणि तुकतुकीत असते. त्याचे डोळे लालसर आणि चमकदार असतात. सिंहाचे दात करवतीसारखे असतात. सिंहाच्या पायाला पंजे म्हणतात. पंजाला धारदार नखे असतात.

सिंहाचे खाद्य – Lion Food

सिंह हा प्राणी पूर्णपणे मांसाहारी आहे. शेळी, बकरी, छोटे प्राणी यांचे मांस हे सिंहाचे अन्न होय,

सिंहाला मानेभोवती आयाळ असते. सिंहाचे शरीर लांब असते. त्यामुळे तो लांबवर उडी (झेप) मारू शकतो. सिंहाने आपल्या जबड्यात एखादा प्राणी पकडला तर तो प्राणी कितीही धडपड केली तरी सुटत नाही. सिंहाची लांबी जास्तीत जास्त ११ फूट ५ इंच असू शकते.

सिंहाचे वजन – Lion Weight

सिंहाचे वजन किमान ४०० ते ५०० पौंड असू शकते. सिंह हा प्राणी जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. सिंहाची राणी सिंहीणसद्धा रुबाबदार दिसते, ती ताकदवान असते. तिची अंगकांती चमकदार असते. सिंहाला आयाळ असते, सिंहिणीला आयाळ नसते. सिंह हा दिवसाला २० तास झोप घेतो. जंगलातील सिंह हे १० ते १२ वर्ष जगू शकतात.

सिंहिणीला एका वेळी तीन-चार पिले होतात; त्यांना ‘छावे’ असे म्हणतात. सिंहीण आपल्या छाव्यांचे पालनपोषण करते, त्यांना शिकार कशी करायची, तिचा पाठलाग कसा करायचा, हे शिकवते.

सिंहाचे छावे हे साहसी, पराक्रमी, धाडसी व निर्भय असतात.

सिंह इतर प्राण्यांनी मारलेली शिकार कधीच खात नाही. सिंह आपली शिकार आपणच करतो. जंगलच्या या राजा-राणीचे वागणेसुद्धा रुबाबदार व राजेशाही थाटाचे असते.

हा प्राणी आपणहुन कुणालाही त्रास देत नाही. हा प्राणी शत्रूशी समोरासमोर सामना करतो.

इतर माहिती : सिंहाचा पंजा हा वजनदार असतो. पंजाची नखे चार-पाच इंच लांबीची असतात. सिंहाचे दात इतके बळकट असतात की भली मोठी शेळी, बकरी दातात धरून कुपणावरून तो उडी मारू शकतो. हा प्राणी रुबाबदार दिसतो. त्याची चाल ऐटबाज असते.  तो चालताना जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा त्यात एक मोठा आत्मविश्वास दिसतो, त्यालाच ‘सिंहावलोकन’ म्हणतात.

सिह या प्राण्याच्या अंगी जे गुण आहेत ते गुण ज्या मानवाच्या अंगी असतील, त्याला ‘सिंह’ हा किताब दिला जातो.

उदा. : क्रांतिसिंह, पंजाबचा सिंह इत्यादी.

सिंह हा आपल्या भारत देशाचे भूषण आहे. दुर्गा देवीचे वाहन म्हणून तो पूजनीय आहे.

हा प्राणी कळपाने राहतो. एकेका कळपात ८ ते १० सिंह-सिंहिणी राहतात.

सिंह हा प्राणी डरकाळी फोडतो त्या वेळी १-२ वेळा घशातून गुरगुरल्यासारखा आवाज काढतो. गुजरात राज्यातील गीरचे जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे.

अलीकडच्या काळात सिंहाची संख्या घटत आहे. अशा या तडफदार वनराजाचे संरक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved