Trending
Home / Information / भारताचे राष्ट्रीय प्रतिक – List of National Symbols of India in Marathi

भारताचे राष्ट्रीय प्रतिक – List of National Symbols of India in Marathi

List of National Symbols of India

भारताच्या लोकतांत्रीक शासनप्रणालीत अनेक राष्ट्रीय प्रतिके आहेत ज्यांमध्ये ऐतिहासिक लिखीत पूरावे ध्वज, प्रतिक चिन्ह, भजनं किंवा गीत, स्मारके, देशभक्त महान व्यक्ती यांचा समावेश आहे. या सर्व प्रतिकांचे भारतीय इतिहासात फार महत्व आहे. 22 जुलै 1997 रोजी भारतीय ध्वजास स्विकृती मिळाली आणि तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय प्रतिक म्हणून ओळखला जातो. याशिवाय भारताचे आणखी काही विशेष प्रतिक आहेत जसे राष्ट्रीय पशु, पक्षी, फुल, फळ, झाड इत्यादी.

भारताचे राष्ट्रीय प्रतिक – List of National Symbols of India in Marathi

List of National Symbols of India

चला तर मग भारताच्या विविध प्रतिकांबाबत माहिती जाणून घेउया –

 • राष्ट्रीय प्रतिक चिन्ह –

तीन वाघांच्या राष्ट्रीय प्रतिक चिन्हास महान सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरील बोध चिन्हावरून घेण्यात आले. हे चिन्ह अशोक सम्राटांच्या काळात सुमारे इ.स.पूर्व 272 ते 232 मध्ये या चिन्हास मान्य करून त्यास सम्राट अशोकने सारनाथ येथील स्तंभावर स्थापीत केले होते. या चिन्हावर मुख्यतः चार वाघांच्या मुखांना चहूबाजूस जोडले आहे.

आपणांस तीन मुख दिसतात. खाली अशोकचक्र व त्याच्या मागे पूढे घोडा, हत्ती, व बैल हे प्रतिक स्वरूप प्राणी आहेत. हे प्राणी देशाच्या प्रगतीचे, उत्कर्षाचे व संपन्नतेचे प्रतिक मानले जातात. या खाली सत्यमेव जयते असे अंकीत केले आहे. ज्याचा अर्थ नेहमी सत्याचा विजय असा आहे.
26 जाने 1950 रोजी भारत सरकारने यास आपले राष्ट्रीय प्रतिकचिन्ह म्हणून मान्य केले.

 • राष्ट्रीय पक्षी –

भारतात 1963 मध्ये मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषीत केला. मोरामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. मोराच्या सुंदरतेचे प्रतिक म्हणजे आपले समृध्द संविधान आहे. यासाठी मोरास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषीत केले गेले. याकारणाने ही मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

 • भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर –

22 मार्च 1957 साली राष्ट्रीय कॅलेंडर चा उपयोग होउ लागला होता जे सक ऐरा यावर आधारीत आहे. एका वर्षात 365 दिवस मानून याच्या तारखा ही ग्रेनेरियन कॅलेंडर सारख्याच होत्या. भारतीय हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र 21 किंवा 22 मार्च ला येतो भारतात सर्वत्र भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि गेग्रेरियन कॅलेंडर चा वापर केला जातो.

 • राष्ट्रीय नदी –

गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी मानली जाते ही भारतातील सर्वात मोठी आणि लांब नदी आहे. भारतीयांच्या मते ही सर्वात पवित्र नदी आहे.

 • भारतीय ध्वज –

तिरंगा हा भारतीय राष्ट्रीय ध्वज मानला जातो. केसरी, पांढरा आणि हिरवा आणि पांढ-या रंगाच्या पट्टयात निळे अशोक चक्र आहे. ध्वजात तीनही रंग समान आकाराचे असून केशरी सर्वात वर पांढरा मध्यम आणि हिरवा सर्वात खाली आहे हे तीनही रंग भारताच्या समृध्दीचे प्रतिक मानल्या जातात.

केशरी शौर्याचे प्रतिक तर पांढरा शांती आणि सदाचाराचे प्रतिक, अशोक चक्र आपल्या विकासाच्या गतीचे प्रतिक आहे. हिरवा हरितक्रांती आणि भरभराटीचे प्रतिक मानल्या जाते. अशोक चक्रात 24 आरे आहेत. या चक्रास धर्मचक्र ही म्हणतात.

 • राष्ट्रीय मुद्रा –

रूपया हा भारतीय राष्ट्रीय मुद्रा म्हणुन मान्य केले आहे. राष्ट्रीय रिजर्व बॅंक आॅफ इंडिया चे यावर नियंत्रण असते.

 • राष्ट्रीय फूल –

भारतात प्रत्येक मोसमात फूले येतात. काही सुगंधीत तर काही दिसायला आकर्षक आहेत. भारताचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आहे. प्राचीन काळापासुन कमळ भारतीय संस्कृतीचा एक घटक आहे. हे सर्वप्रीय फूल आहे. कमळास फलदायकता समृध्दी, ज्ञान, कोमलता आणि पवित्रता चे प्रतिक मानले जाते. पांढरे कमळ शांतीचे प्रतिक मानले जाते.

 • भारतीय राष्ट्रीय वृक्ष –

वड हे भारताचे राष्ट्रीय प्रतिक मानले जाते. वडाच्या विविध गुणांमूळेच त्याची निवड झाली. वड शेकडो वर्षे जिवंत राहाते, त्याची सावली शांती आणि पवित्रतेची निर्मीती करते. वडाच्या झाडाखाली समाधान मिळते. भारतीय हिन्दू यांस पुजनिय मानतात. याच्या सांस्कृतिक महत्वामुळेच यास राष्ट्रीय वृक्ष मानले जाते.

 • भारताचा राष्ट्रीय खेळ –

भारतात क्रिकेटचे वेड लागले असले तरी हाॅकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. भारतातच हाॅकीचा जन्म झाला. 1928 ते 1956 पर्यंत जगात भारतीयच हाॅकीत श्रेष्ठ मानल्या जातात. जगाने या खेळाचा स्विकार केला. सुरवातीला भारताने हाॅकीचे 6 सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. हाॅकीमुळे भारत जगात आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरू शकला.

 • राष्ट्रगीत – 

“जन गण मन” हे आपले राष्ट्रगीत आहे. याची निर्मीती रवींद्रनाथ टैगोर यांनी केली. 26 जानेवारी 1950 रोजी यास भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. या गीतात सर्व धर्मियांची मान्यता मिळाली. या गीतात समृध्द भारताची स्तूती केली आहे.

 • राष्ट्रीय फळ –

आंबा त्याच्या विविध गुणांमुळे आणि त्याच्या सांस्कृतिक महत्वामुळे भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून घोषीत केले गेले. याच्या विविध पध्दतीने वापरामुळे हे लोकप्रिय व निर्वीवाद सर्वांच्या आवडीचे फळ आहे. जे सर्व वर्गीय लोकांपर्यंत पाहोचते याचे ऐतिहासीक महत्व सूध्दा आहे. अकबर बादशहाने 100000 पेक्षा जास्त आंब्याची झाडे लावली होती. आंब्याचे असंख्य खादयपदार्थ तयार करता येतात.

 • राष्ट्रीय प्राणी –

बंगाली वाघ याला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता आहे. त्याची समृध्द शरीरयष्टी आणि जीवनमान यामुळे आणि प्राण्यांमध्ये सर्वात सुंदरते मुळे त्याची निवड झाली होती.

राष्ट्रीय प्रतिक राष्ट्राच्या समृध्दीचे त्याच्या ओळखीचे प्रतिक मानले जाते त्यामुळे निवडकत्र्यानी सर्व बाजु तपासुनच याची निवड केली आहे.

आणखी वाचा:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ भारताचे राष्ट्रीय प्रतिकाबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा भारताचे राष्ट्रीय प्रतिकाची संपूर्ण माहिती – National Symbols of India Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा.

नोट: National Symbols of India – भारताचे राष्ट्रीय प्रतिकाची संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Jana Gana Mana in Marathi

जन गण मन भारताचे राष्ट्रगीत – Jana Gana Mana in Marathi

Jana Gana Mana जन गण मन आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे. हे बंगाली भाषेत लिहीले गेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *