दिवसाला ३५ किलो जेवण आणि त्यासोबत विषाचा स्वाद घेणारा एका राजाची कहाणी

Mahmud Begada Sultan of Gujarat in Marathi 

शीर्षक वाचून आपण विचार करत असणार कि हे कस शक्य आहे? पण हो हे खरं आहे, इतिहासात अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्या घटनांवर विश्वास बसत नसला तरीही ठेवावा लागतो, आपण राक्षसां विषयी अश्या घटना ऐकलेल्या आहेत, मग तो बकासुर असो की कुंभकर्ण. सर्वाना पोट भरायला अमाप अन्न लागत होते.

त्याच प्रमाणे कलियुगात सुध्दा असा एक राजा होऊन गेलाय की तो दिवसाला ३५ किलो अन्न खात असे, एवढंच नाही तर लहानपणापासून तो राजा आपल्या शरिरात थोड्याश्या प्रमाणात विषाचे प्राशन करत होता. तर आजच्या लेखात आपण या राजाविषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार तर चला पाहूया.

असाही एक प्रराक्रम करणारा सुलतान – Sultan Mahmud Begada Information in Marathi 

Mahmud Begada
Mahmud Begada

आपणा सर्वाना माहिती आहे की बरेच लोक खाण्याचे शौकीन असतात, आणि असायलाही पाहिजे. पण आपण कधी ऐकले आहे का एखाद्या व्यक्तीने ३५ किलो चे जेवण केले, जास्त करून जे पहिलवान लोक असतात त्यांचा जेवणाचा खुराक हा जास्त असतो कारण त्यांची शरीरयष्टी बनण्यासाठी तो त्यांचा खुराक असतो. पण पहिलवान लोक सुध्दा एवढा खुराक घेत नाहीत.

पण एक राजा असाही होऊन गेला जो दिवसाला ३५ किलो अन्नाचे सेवनच करत नव्हता तर त्या ३५ किलो अन्नाला पचवत सुध्दा होता. त्या राजाचे नाव होते महमूद बेगड़ा जे गुजरात चे सहावे सुलतान होते. ते एवढे पराक्रमी राजा होते की ते वयाच्या फक्त १३ व्या वर्षी सिंहासनावर बसले होते. त्यांच्या वंशातील सर्वात पराक्रमी शासक म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांनी ५२ वर्ष (१४५९-१५११) गुजरात वर आपले राज्य करून राज्यकारभार सांभाळला.

महमूद बेगड़ा तेव्हाचे एक आकर्षक व्यक्तित्व म्हणून ओळखल्या जायचे. अस म्हटल्या जात की त्यांची दाढी एवढी लांब होती की त्यांच्या कमरेपर्यंत पोहचेल. दाढीच नाही तर त्यांच्या मिशा सुध्दा लांब होत्या, त्यांच्या मिशा एवढ्या लांब होत्या की त्या मिशांना ते डोक्यावर बांधत असत.

महमूद बेगड़ा यांच्याविषयी सर्वात जास्त ऐकल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्यांचे जेवण आपण वर पाहिलच की दिवसाला ३५ किलो अन्न खायचे. त्यासोबतच असेही म्हणतात की सकाळी नाश्त्याला त्यांना एक मोठी कटोरी मध, एक मोठी कटोरी लोणी, आणि १०० ते १५० केळी खात असत. एवढंच नाही तर ३५ किलो जेवणानंतर सुध्दा त्यांच्या उशीच्या आजूबाजूला जेवण ठेवून दिलेलं असे जर झोपेत भूक लागली तर लगेच खाऊ शकतील.

एवढं जेवण बापरे बाप हे तर काहीच नाही त्या राजाविषयी असेही म्हटले जाते की या राजाला लहानपणा पासून कोणत्या तरी विषाचे दररोज सेवन केल्या गेले होते, या सुलतान ला जेवणाच्या सोबत थोडेसे विष खायची सुध्दा सवय होती. त्यांच्या शरीरात एवढे विष झालेले होते, की त्यांच्या शरीरावर जर एखादी माशी सुध्दा बसली तर ती मरून जात होती.

एवढंच नाही तर त्यांनी घातलेल्या कपड्यांना कोणी हातही लावत नसे. त्यांच्या कपड्यांना एकवेळ घातल्या नंतर जाळून टाकल्या जात असत कारण सुलतान ने कपडे घातल्या नंतर ते विषारी होत असतं. या सुलतान चे असेच बरेच किस्से आहेत. दिवसाला ३५ किलो अन्नापासून तर विष प्राशन करेपर्यंत.

वरील लेखात आपण पाहिले की असाही एक राजा होऊन गेला जो दिवसाला अमाप जेवण करत होता, तर आशा करतो आपल्याला वरील लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top