या व्यक्तीकडे नऊ वर्षांपासून दररोज पिझ्झा डिलिव्हरी होते, कोणत्याही प्रकारची ऑर्डर न देता

Strange Pizza Delivery Story in Marathi

आपल्या मित्रांसोबत पार्टी करायचे मन झाले तर आपण लगेच पिझ्झा ची ऑर्डर देतो आणि काही वेळेनंतर आपल्या घरी पिझ्झा येऊन पोहोचतो सुध्दा. आणि आलेला पिझ्झा मोठ्या पसंतीने खातो सुध्दा. पण तेच जर आपल्या घरी दररोज पिझ्झा आला, तेही ऑर्डर न करता तर आपल्याला आश्चर्य होणार ना, तसेच बेल्जियम च्या एंटवर्प शहराच्या एका व्यक्तीसोबत अशी घटना गेल्या नऊ वर्षांपासून होत आहे. दररोज डिलिव्हरी बॉय येऊन त्यांना पिझ्झा ऑफर करतो, पण त्यांनी तर ऑर्डर दिलेली सुध्दा नसते. या विषयी त्यांनी पोलिसात सुध्दा तक्रार केली पण तरी सुध्दा या समस्येवर कोणतेही समाधान निघाले नाही.

नऊ वर्षांपासून दररोज डिलिव्हरी होतो पिझ्झा – Man Gets Pizza Deliveries at his Home for 9 Years

Man Gets Pizza Deliveries at his Home for 9 Years
Man Gets Pizza Deliveries at his Home for 9 Years

त्या व्यक्तीचे नाव आहे जीन वेन लेंडघम ही व्यक्ती ६५ वर्षांची आहे. आणि त्या व्यक्तीचे असे म्हणणे आहे की मी कधीही पिझ्झा ची ऑर्डर देत नाही, पण तरी सुध्दा माझ्या घरी दररोज पिझ्झा बॉय पिझ्झा घेऊन येतो, आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्रास यामुळे की पिझ्झा घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉय ची कोणतीही एक ठराविक वेळ नाही आहे. कधी दिवसाला तर कधी मध्यरात्री सुध्दा डिलिव्हरी बॉय येऊन दारावर उभा राहून बेल वाजवतो. हे तर काहीच नाही त्यांनी बोलताना हे सांगितले की त्यांच्या घरी एक वेळ १४ पिझ्झा ची डिलिव्हरी आली होती.

ती व्यक्ती आणखी सांगताना म्हणते की मी या पिझ्झा डिलिव्हरी पासून खूप परेशान झालेलो आहे. माझ्या घराच्या बाहेरून जेव्हाही एखादी स्कुटर जाण्याचा आवाज येतो. तेव्हा मला असं वाटते की पिझ्झा डिलिव्हरी बॉय आला असेल. या पिझ्झा च्या डिलीव्हरी ने मला खूप परेशान केले आहे.

एवढेच नाही तर ते पुढे सांगतात की मला च नाही तर माझ्या मित्राला सुध्दा अश्याच प्रकारच्या पिझ्झा ची दररोज डिलिव्हरी होते. आमच्या दोघांपैकी जर कोणालाही पिझ्झा ची डिलीव्हरी झाली यर आम्ही एकमेकांना फोन करून त्याविषयी चर्चा करतो आणि एकमेकांना सांगतो की आता तुझ्या घरी सुध्दा डिलिव्हरी होऊ शकते. त्यांच्या मित्राचे असे मत आहे की हे सर्व त्यांच्यासोबत त्यांचा एखादा मित्रच करत आहे. पण त्याविषयी अजूनही दोघांनाही कोणतीही पक्की माहिती मिळाली नाही.

या डिलिव्हरी झालेल्या पिझ्झा चे त्यांना पैसे मोजावे लागले नाहीत कारण त्यांनी आजपर्यंत आलेल्या कोणत्याही पिझ्झा ला स्वीकारले नाही. पण तरीही प्रत्येक दिवशी ऑर्डर न करता त्यांच्या घरी पिझ्झा पोहचुन जातो. ही सर्व करामत कोण करत आहे? का करत आहे? याविषयी कोणालाही अजूनही कळले नाही. गेल्या नऊ वर्षांपासून दररोज पिझ्झा एकाच पत्त्यावर पाठवणे हे कोणत्यातरी मित्राचेच काम असावे असे त्यांचे मत आहे.

ह्या लेखावरून आपल्याला हे कळलं असेल की एखादी गोष्ट सतत जर तुमच्या सोबत होत असेल तर त्या गोष्टी पासून आपल्याला खूप त्रास होत असतो. आपल्या सोबत किंवा आजूबाजूला असे काही किस्से घडले असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही त्याला प्रतिसाद  द्यायचा प्रयत्न करू.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top