PPE किट काय आहे? आणि भारतात याचे किती उत्पादन होत आहे? जाणून घ्या या लेखातून

Personal Protective Equipment Kit

कोरोनाचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आणि त्यामुळे मानवी जीवन ठप्प पडलेलं आहे, आणि बऱ्याच देशांत लॉक डाऊन ची स्थिती कायम आहे. तसेच आपल्या भारतात सुध्दा लॉक डाऊन लागलेलेच आहे. आणि या कोविड-१९ मुळे सर्वदूर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, आणि काही ठिकाणांहून तर अश्या बातम्या समोर येत आहेत की इलाज करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण होत आहे.

हे सर्व PPE किट उपलब्ध नसल्याने होत होते परंतु आता भारतात मुभलक प्रमाणात PPE किट बनवल्या जात आहेत. तर अश्या प्रकारच्या बातम्या आता खूप कमी प्रमाणात येत आहेत. तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की PPE किट काय आहे आणि भारतात याचे उत्पादन किती होते? आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडेल. तर चला पाहूया..

PPE किट म्हणजे काय – Meaning of PPE Kit (Personal Protective Equipment)

PPE Kit
PPE Kit

PPE किट म्हणजे Personal Protective Equipment. ज्याप्रमाणे एखाद्या युध्दात तलवारी, भाले आणि आणखी काही अस्त्र शस्त्र यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे कोरोनाच्या लढाईत PPE किट त्या अस्त्र शस्त्रांचे काम करत आहे म्हणजेच मेडिकल स्टाफ यांच्या सुरक्षेतेसाठी ज्या किट चा वापर केला जातो त्या किट ला PPE किट संबोधले जाते.

या किट मध्ये कोणकोणते वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा सामावेश होतो, तर आपल्या माहितीसाठी या किट मध्ये हाताला सुरक्षित करणारे रबरी हातमोजे. आपल्या नाकाला आणि तोंडाला सुरक्षा ठेवण्यासाठी वापरण्यात घेणारे मास्क, डोक्याच्या सुरक्षिततेसाठी प्लास्टिक चे कव्हर, रबराचे बूट, चष्मा, आणि फेसशिल्ड या सर्व वस्तूंचा सामावेश PPE किट मध्ये होतो.

आणि या संपूर्ण किट चा वापर हा मेडिकल स्टाफ जसे डॉक्टर, नर्सेज, आणि त्यांना मदत करणारे लोक, सफाई कर्मचारी हे करत असतात, कारण त्यांना कोरोनाची लागण होणार नाही. जेव्हा WHO ने १ मार्च ला कोरोना शी लढण्यासाठी संपूर्ण विश्वात सुरक्षा करणाऱ्या उपकरणांची कमी असल्याचे सांगितले होते, तेव्हा भारतामध्ये PPE किट चे उत्पादन होतही नव्हते. भारत देश पूर्णतः विदेशातुन आयात होणाऱ्या समानांवर अवलंबून होता.

जगात सर्वात जास्त PPE किट चे उत्पादन चीन मध्ये पाहायला मिळते. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भारताने सुध्दा या किट चे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. भारत दिवसाला १२००० किंवा त्यापेक्षा जास्त PPE किट चे निर्माण करत आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाच्या दिशानिर्देशाखाली कोविड-१९ च्या विरुध्द लढण्यासाठी देशातील २५ विविध प्रकारच्या कंपन्या याचे उत्पादन करत आहेत. गोकुलदास एक्स्पोर्ट, कुसुमगर इंडस्ट्री, शाही एक्स्पोर्ट, आदित्या बिर्ला फॅशन इत्यादी.

PPE किट एवढी आवश्यक का आहे – Importance of Personal Protective Equipment (PPE)

कोरोना हा असा विषाणू आहे जो थोडेशे जरी दुर्लक्ष झाले तरीही पसरण्याची शक्यता असते. आणि या किट चा वापर हॉस्पिटल स्टाफ साठी अत्यंत आवश्यक आहे कारण हॉस्पिटल स्टाफचे लोक कोरोनाने संक्रमण झालेल्या रुग्णांशी त्यांचा सरळ संपर्क असतो. आणि या किट ला वापरून ते या कोरोनाच्या लढाईत आणखी चांगल्या प्रकारे लढू शकतील.

तर वरील लेखात आपण पाहिले PPE किट विषयी थोडक्यात माहिती आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असणार आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here