मोबाईलचा वापर करता मग इथे जाणून घ्या मोबाईलविषयी असणारे गैरसमज.

Myths about Cell Phones

प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला मोबाईल ज्याच्या साहाय्याने संपूर्ण जग माणसाच्या एका टच वर असते. मोबाईल माणसाच्या जीवनातील एक मूलभूत गरज बनलेला आहे. त्याच्या शिवाय काही जणांना अन्न सुध्दा जात नाही, पण याच मोबाईल आणि त्याच्याशी जुळलेल्या काही गोष्टी विषयी गैरसमज आहे जे चुकीचे आहे. तर आजच्या लेखात आपण अश्याच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या खोट्या असतात पण त्याला काही व्यक्ती खरे मानतात. तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

मोबाईल विषयी असलेले  गैरसमज – Common Mobile Myths in Marathi

Mobile Myths
Mobile Myths

१) मोबाईल च्या बॅटरी विषयी – About Mobile Battery  

आपण बरेच वेळा ऐकले असेल की मोबाईल ची बॅटरी खराब झाल्यास आपल्याला मोबाईल च्या कंपनीचीच बॅटरी विकत घ्यावी कारण दुसरी कोणती बॅटरी आपण आपल्या मोबाईल मध्ये वापरली तर मोबाईल फुटण्याची शक्यता असते. पण आपल्या माहिती साठी अशी कोणतीही गोष्ट होत नाही परंतु आपण जर दुसऱ्या कंपनीची बॅटरी आपल्या मोबाईल मध्ये वापरली तर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही फक्त ती बॅटरी नकली नसावी.

२) मोबाईल च्या कॅमेरा विषयी – About Mobile Camera 

आपण बरेचदा ऐकत असतो की कधीही मोबाईल फोन घ्यायचा असल्यास त्या मोबाईल फोन चा कॅमेरा हा जास्त मेगा पिक्सल चा असावा. कारण जास्त मेगा पिक्सल च्या कॅमेराने जास्त चांगला फोटो येतो, असे आपण मोबाईल विषयी ऐकतो पण ही गोष्ट खरी नाही आहे कारण की फोटो ची क्वालिटी ही कॅमेराच्या मेगा पिक्सल वर नसून कॅमेरा च्या लेन्स वर अवलंबून असते. की कॅमेऱ्यात किती चांगली लेन्स वापरली आहे. आणि जर कॅमेराच्या मेगा पिक्सल वर फोटो ची क्वालिटि अवलंबून असती तर ४८ मेगा पिक्सल चा कॅमेरा आयफोन ७ च्या पिक्सल कॅमेरा पेक्षा अधिक चांगली असती.

३) मोबाईल च्या इअरफोन विषयी – About Mobile Earphones

आपण बरेचदा ऐकतो की इयर फोन चा बराच वेळ वापर केल्याने आपल्या कानांना हानी पोहचू शकते. पण आपल्या माहिती साठी बाजार पेठेमध्ये आज काल जे स्मार्टफोन तयार होत आहेत त्यांना ग्राहकांच्या आरोग्याला लक्षात घेऊन बनवल्या जात असते. आताच्या स्मार्टफोन मध्ये आधीच फिचर असतात, की आपण जर आवाज मोठा केला तर ते फिचर आपल्याला अगोदरच सांगते की ह्याच्यापेक्षा मोठा आवाज आपल्या कानांसाठी हानिकारक ठरू शकतो.

जर तुम्ही चांगल्या कंपनीचे इयर फोन चा वापर केला तर आपल्या कानाचे आरोग्य ९०% चांगले राहू शकते.

४) मोबाईल वापरण्या विषयी – About Mobile Use 

आपण आपल्या मित्र परिवारात ऐकत असतो की मोबाईल च्या अधिक वापर केल्याने मोबाईल गरम होऊन मोबाईल फुटण्याची शक्यता असते सोबतच मोबाईल चा अधिक वापर केल्याने मोबाईल खराब होत असतो.

पण आपल्या माहिती साठी आजकाल च्या मोबाईल कंपनी ग्राहकांची रुची पाहून मोबाईल ला बनवते आणि काही गोष्टींना लक्षात घेऊनच मोबाईल चे निर्माण केल्या जाते. ज्यामुळे मोबाईल चा वापर बराच वेळ केला तरी मोबाईल ला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही.

आणि ९०% नवीन मोबाईल मध्ये कुलिंग सिस्टम असते त्यामुळे मोबाईल चा मोठ्या प्रमाणात वापर केला तरीही तो गरम होऊन आपोआप त्याचे कुलिंग होईल.

५) मोबाईल चार्जर विषयी – About Mobile Charger

आपण ऐकतो की आपल्या मोबाईल च्या चार्जर नेच आपल्या मोबाईल ची चार्जिंग करावी. नाहीतर आपला मोबाईल खराब होण्याची शक्यता असते. असे काहीही नाही आहे कोणत्याही चार्जर ने आपला मोबाईल चार्ज केला तरी चालतो, फक्त एवढी काळजी घ्यायची की जेवढी ऊर्जा ओरिजनल चार्जर ने आपल्या मोबाईल ला मिळते तेवढीच ऊर्जा दुसऱ्या चार्जर ने मिळावी.

वरील काही बाबी मोबाईल फोन विषयी आपण नेहमी ऐकत असतो पण त्यामागे नेमकं कारण काय आहे हे आपण आजच्या लेखात पाहिले तर आशा करतो लिहिलेला छोटासा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top