मुंगा च्या डाळीची माहिती

Mung Bean Information

मूग हा आपल्याला सर्वाना महीत आहे. या डाळीला वेगवेगळ्या प्रकारे शिजवली जाते. तसे या डाळीपासून अनेक पोषक तत्त्वे मिळतात. मुगाच्या डाळीपासून वेगवेगळे पदार्थ बनतात. आणि विशेष करून मुगाचा शिरा हा छान बनतो. अशी बरीच माहिती मुग या विषयी आपण समोर पाहणार आहोत.

मुंगा च्या डाळीची माहिती – Moong Dal Information in Marathi

Moong Dal Information in Marathi
Moong Dal Information in Marathi
मुगाचे विविध नावे : मूग
शास्त्रीय नाव : ‘विग्ना रेडिएटां’
धान्याचे प्रकार: कडधान्य.
हंगाम: रब्बी
हरभरयाचे उत्पादन : भारतात तसेच चीन,फिलिपाईन्स,थायलंड, बांग्लादेश, इंडोनेशिया,ब्रम्हदेश इत्यादि
हरभरा यामध्ये असणारी पोषक तत्वे : २४% प्रथिने, ५६ ते ६०% कार्बोहायड्रेटस्, तंतू ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्व, मॅग्नेशियम, कॅलशियम, पोटॅशियम व फॉस्फरस असे घटक असतात.

सर्व डाळींमध्ये ज्यामुळे पोटात सर्वात कमी वायू (गॅस) तयार होतो अशी डाळ म्हणजे मुगाची डाळ आहे. बलराजाने आपल्या ‘पाकदर्पण’ या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असं म्हटलं आहे आणि ती शिजविण्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा दिले आहेत. जुन्या पाकशास्त्रावरील ग्रंथामधूनही मुगाच्या डाळीचा उपयोग जास्त केला जात होता आस पाहण्यास मिळत. अगदी पुरणपोळीतही त्या काळी मुगाच्या डाळीचं पुरण भरत असतं. या सगळ्यातून आपल्या लगेच लक्षात येतं की मूग आणि मुगाची डाळ आपल्या देशात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. आयुर्वेदानेही मुगाला खूप महत्वपूर्ण स्थान दिले आहे. उत्खननातील पुराव्यानुसार ख्रिस्तपूर्व १५०० पासून मूग डाळ भारतीयांना परिचयाची आहे.

‘विग्ना रेडिएटां’ असं शास्त्रीय नाव असलेल्या फॅबॅसी कुटूंबातील मूग हे एक कडधान्य आहे. मुगाचा उगम जरी भारतातला असला तरी थायलंड, चीन, व फिलिपाईन्स, बर्मा, इंडोनेशिया, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल अश्या बऱ्याच रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे जे मूग आहेत ते अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या मुगांमध्ये साधारण ५६ ते ६०% कार्बोहायड्रेटस्, २४% प्रथिने, तंतू ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्व, मॅग्नेशियम, कॅलशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. मुगामध्ये भरपूर प्रमाणात तंतू असतो जो मुगाच्या डाळीत जवळजवळ नसतो. मुगापासून जे पानी काढल जात ते आजाऱ्यासाठी अगदी उपयुक्त समजलं जातं. मुगाची डाळ आणि तांदूळ यांची खिचडीही आजान्यांसाठी योग्य समजली जाते. अशी खिचडी खाल्ल्याने सर्व अपरिहार्य अमीनो आम्ले पोटात जातात त्यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम असते.

काही वेळा प्रश्न पडतो की खिचडीसाठी तूर डाळ, चणा डाळ, मसूर डाळ किंवा उडदाची डाळ वापरली का जात नाही? यापैकी मसुराची डाळ लवकर शिजून गळते. उडदाची डाळ शिजली म्हणजे बुळबुळीत होते आणि तूर व चणा डाळ तांदुळाच्या आकाराच्या मानाने मोठ्या असल्याने त्या वापरल्यास खिचडी एकसंघ दिसत नाही. तसेच त्यांचा रंगही गडद पिवळा असल्याने उठून दिसतो. याउलट मुगाची डाळ तांदुळाच्या आकाराची. तांदुळाप्रमाणे शिजणारी, फिक्या रंगाची असल्याने अशी खिचडी एकसंघ दिसते. मिळून येते. याशिवाय मूग डाळ स्वादिष्ट आणि पथ्यकर असल्याने खिचडीची पोषकमूल्ये व स्वादिष्टपणा वाढतात ते वेगळंच.

दुसऱ्या वस्तूंबरोबर शिजवली की मिळून येण्याचा मूगडाळीचा गुणधर्म असल्याने दुधी, मुळा, पालक यासारख्या भाज्यांबरोबर ती वापरण्यात येते. भिजलेली मुगाची डाळ कच्च्या कोशिंबिरीत घालता येते. डाळ भिजवून मग जरा कोरडी करून त्याला आपल्या आवडीप्रमाणे मीठ, तिखट लावतात. अशी डाळ चहाबरोबर खायला छान असते. मुगाची डाळ भिजवून, वाटून त्यात लसूण, आलं, मिरची याचं वाटणं आणि कोथिंबीर घालून छोटे वडे करून तळतात त्यांना मुगाची भजी किंवा मुगवडे म्हणतात. आणि सनावाराला ही आवडीने करतात. अशा मुगवड्यावर चिंचगूळाची चटणी चाट मसाला घालून आवडीने खातात.

मुगाची डाळ विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ about Moong Dal

Q. मुगाचे उत्पादन कुठे होते ?

उत्तर – मुगाचे उत्पादन भारतात तसेच चीन,फिलिपाईन्स,थायलंड, बांग्लादेश, इंडोनेशिया,ब्रम्हदेश इत्यादि देशामध्ये होते.

Q. मुगामध्ये कोणकोणते पोषक तत्वे आहेत ?

उत्तर – मुगामध्ये २४% प्रथिने, ५६ ते ६०% कार्बोहायड्रेटस्, तंतू ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्व, मॅग्नेशियम, कॅलशियम, पोटॅशियम व फॉस्फरस असे घटक असतात.

Q. मूग हे कोणते धान्य आहे ?

उत्तर – मूग कडधान्य आहे.

Q. मुगाचे शास्त्रीय नाव काय आहे ?

उत्तर – मुगाचे शास्त्रीय ‘विग्ना रेडिएटां’ नाव असे आहे.

Q. मूग कोणत्या हंगामात येतात ?

उत्तर – मूग खरीप हंगामात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here