अबब ! एका किलो आंब्यांसाठी मोजावे लागतात लाखों रुपये

Worlds Most Expensive Mango 

उन्हाळ्याची चाहूल लागताच सगळ्यांना आठवतो फळांचा राजा म्हणजेच आंबा. मग आपल्या घरी आपण बाजारात जाऊन खूप सारे आंबे विकत घेऊन येतो आणि त्या आंब्यांचा मन भरून आस्वाद घेतो. आपल्याला आंब्याविषयी भरपूर माहिती आहे, कारण आपण लहानपणी शिकलेलो आहे, आंबा फळांचा राजा असतो. तसेच आंबा हा आपले राष्ट्रीय फळ आहे वगैरे वगैरे. विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या कोकणात आंबा खूप प्रसिध्द आहे. जर उन्हाळ्यात कोकणात आहात आणि आंबे खाल्ले नाही तर तुमचा सर्व उन्हाळा फुकट गेला अस समजा, संपूर्ण जगात सर्वात जास्त आंब्याला आपल्या देशात खाल्ले जाते. आणि सर्वात जास्त आंब्याचे चाहते सुध्दा आपल्याच देशात पाहायला मिळतात.

पण जगात सर्वात जास्त किमतीचा आंबा हा भारतात मिळत नाही आणि आपण हे जाणून थक्क होणार की त्या आंब्याची किंमत ही साधारण नसून लाखो रुपयांमध्ये आहे, तर या लेखामध्ये आपण अश्या आंब्यांविषयी माहिती पाहणार आहोत, ज्यांची किंमत ही लाखोंच्या घरात आहे आणि या आंब्याला घ्यायला मोठमोठे श्रीमंत लोक सुध्दा एक वेळ विचार करतील. तर चला पाहूया. या अजब गजब आंब्याविषयी.

जगातील सर्वात महागड फळ – Most Expensive Mango in the World

Most Expensive Mango
Most Expensive Mango

आपण या लेखात ज्या आंब्याविषयी पाहणार आहोत त्या आंब्याचे नाव आहे, ‘ताईयो नो तामागो’ (एग ऑफ द सन) आपण ह्याला आंब्याचा एक प्रकार किंवा प्रजाती सुध्दा म्हणू शकतो. या आंब्याला विशेष करून जपान च्या एका मियाजाकी नावाच्या भागात पिकविल्या जातो. आणि येथूनच संपूर्ण देशात या आंब्याची विक्री होते. आपल्याकडे एखाद्या विशिष्ट किंवा अमूल्य गोष्टीची बोली लावून त्या गोष्टीला विकल्या जातं, त्याचप्रमाणे जपान मध्ये सुध्दा या आंब्यांची बोली लावून विकल्या जातं.

या आंब्यांना हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंच्या मधात पिकविल्या जात. आणि सर्वात आधी पिकविल्या जाणाऱ्या आंब्यांची बोली लावून ह्या आंब्यांना विकल्या जाते, या आंब्याचे उत्पादन हे मर्यादित प्रमाणात केल्या जाते. आणि या मुळे आंब्यांना बाजारात सर्वात जास्त भाव मिळतो. आपल्या कडील आंब्यांचा रंग हा पूर्णपणे पिवळा असतो पण या आंब्याची विशेषतः म्हणजे हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. या विशेषतेमुळे आंब्याला एवढा भाव मिळतो.

२०१७ मध्ये झालेल्या या आंब्याच्या निलामी मध्ये २ लाख ७२ हजार रुपयांना आंब्याची एक जोडी विकल्या गेली होती, आणि या जोडीतील एका आंब्याचे वजन हे ३५० ग्रॅम होते म्हणजेच दोन्ही मिळून फक्त ७०० ग्रॅम. यावर आपण विचार करू शकता की या आंब्याला किलो मध्ये जर विकत घ्यायचे ठरवले तर तीन लाख रुपयांच्या वर किंमत मोजावी लागेल.

आता आपण विचार करत असाल की या आंब्यांची किंमत एवढी जास्त कशी काय? तर जाणकारांच्या मते सांगितल्या जाते की या आंब्याचे होणारे उत्पादन हे मर्यादित प्रमाणात होते. तसे काळजी घेतल्या जाते.

या आंब्यांना एका छोट्याश्या जाळ्यात अडकून ठेवले जाते आणि यामुळे त्या आंब्याला आवश्यक तेवढा सूर्याचा प्रकाश मिळतो. सोबतच याचा एक फायदा म्हणजे आंबा पिकल्या नंतर जमिनीवर न पडता त्या जाळ्यात अडकतो. अश्या प्रकारे त्याची योग्य ती काळजी घेतल्यामुळे या आंब्यांचे भाव हे आकाशाला गवसणी घालणारे असतात.

तर वरील लेखात आपण एक असा आंबा बघितला ज्या आंब्याचे भाव जगातून सर्वात जास्त आहेत, तर आशा करतो ही लिहिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here