Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी 

Most Powerful People in World

फोर्ब्स नावाचे अमेरिकी मासिक दरवर्षी एक यादी जाहीर करते ज्यामध्ये जगातील शक्तिशाली व्यक्तींची यादी सुद्धा सांगितल्या जाते, त्या मध्ये सर्वच प्रकारच्या व्यक्तींचा समावेश असतो, जसे व्यावसायिक, राजनेता, आणखी बरेच व्यक्तिमत्व.

आजच्या लेखात आपल्याला मी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींविषयी माहिती देणार आहे, ज्यामध्ये एका भारतीय व्यक्तीचे सुद्धा नाव आहे, आणि ते जाणून आपल्याला अभिमान वाटेल,

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी – Most Powerful People in World 

Most Powerful People in World

तर चला जाणून घेऊया त्या १० व्यक्तींविषयी जे आहेत जगातून सर्वात शक्तिशाली,

  • मार्क झुकरबर्ग – Mark Zuckerberg

Mark Zuckerberg  यांचा जन्म १४ मे १९८४ साली अमेरिकेत झाला होता, त्यांचे शिक्षण हे हार्वर्ड विद्यापीठातून पूर्ण झाले, त्यांना सुरुवातीलाच कॉम्प्यूटर मध्ये आवड असल्याने त्यांनी कॉलेजमध्ये असताना शिक्षकांनी एक प्रोजेक्ट बनवायला सांगितल्या नंतर त्यांनी एक अश्या अॅप चे निर्माण केले.

जे आज आपण दैनंदिन जीवनात वापरतो पण तेव्हा त्यांना कुठ माहिती होते कि ते अॅप पूर्ण जगात एवढ्या जास्त प्रमाणात वापरल्या जाईल.

आज मार्क फेसबुक मुळे जागातील सर्वात श्रीमंत तसेच शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहेत, ते जगातून दहाव्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्ती आहेत.

  • नरेंद्र मोदी – Narendra Modi

Narendra Modi  यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० साली गुजरात च्या वाडनगर येथे एका गरीब परिवारात झाला, त्यांचे वडील रेल्वे स्टेशन वर चहा विकून स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असत.

लहान पणापासूनच धाडसी व्यक्तिमत्व असलेला हा नरेंद्र मोठे होऊन देशाचा पंतप्रधान होईल कोणी विचार सुद्धा नसेल केला,

लहानपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मध्ये शामिल झाले, व पुढे ते बरेच वर्ष स्वतःचे घर सोडून बाहेर राहिले, त्यांनतर काही दिवसांनी संघाच्या लोकांशी ओळख होऊन आपले पाय समाज सेवा करत राजनीती कडे वळवले,

पाहता पाहता ते गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून समोर आले, आपल्या लोकप्रियतेने त्यांना आज देशातील लोकांचे प्रेम मिळून ते भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून निवडून आले, तसेच आज जगातील सर्वात ताकदवर व्यक्तीमध्ये एकमेव भारतीय व्यक्ती आहेत ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोधरदास मोदी.

आज ते जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

  • डेव्हिड कॅमेरॉन – David Cameron

David Cameron यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९६६ साली लंडन येथे झाला होता, त्यांनी त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापिठातून पूर्ण केले, त्यांनी राजकारणात आपले पाउल हे १९९७ मध्ये ठेवले, पण त्या वर्षी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

पण तेच २००१ मध्ये पूर्ण तयारी करून जेव्हा निवडणुकीला उतरले तेव्हा त्यांचा विजय झाला, तेव्हा त्यांना विपक्ष म्हणून संसद मध्ये जागा मिळाली, सोबतच २००५ मध्ये जिंकल्यानंतर कंज़र्वेटिव पार्टी मधून त्यांना ब्रिटन चे प्रधानमंत्री बनवल्या गेले, भारतामध्ये झालेल्या जालियानवाला हत्याकांडा साठी त्यांनी सार्वजनिक स्वरूपाने क्षमा मागितली होती.

आज ते जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

  • लेरी पेज – Larry Page

Larry Page यांचा जन्म २६ मार्च १९७३ साली अमेरिकेत झाला होता.

त्यांचे आई आणि वडील हे कॉम्प्यूटर चे प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या घरी कॉम्प्युटर विषयी जास्त गोष्टीमुळे आणि वस्तूंमुळे त्यांना लहापणा पासूनच कॉम्प्यूटर मध्ये रुची निर्माण झाली.

त्यानंतर त्यांनी आपले पद्युत्तर शिक्षणात WORLD WIDE WEB हा विषय निवडला, तेथेच त्यांची भेट त्यांचे आजचे पार्टनर सर्जी बिन यांच्याशी झाली त्यांनी दोघांनी मिळून जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांमधून एक GOOGLE सारख्या कंपनीचे निर्माण केले.

लेरी पेज हे आज जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

  • बिल गेट – Bill Gates

Bill Gates यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ ला अमेरिकेच्या वाशिंग्टन मध्ये झाला होता.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे पदवी पूर्ण न करता सोडले, आणि स्वतः निर्माण केलेल्या कंपनी कडे ते लक्ष देत होते, त्या कंपनीचे नाव होते मायक्रोसॉफ्ट.

आज मायक्रोसॉफ्ट कंपनीची वार्षिक कमाई हि जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.

आणि त्या कंपनीचे मालक आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स.

तसेच आज बिल गेट्स जगातून सहाव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत,

  • शी जिनपिंग – Xi Jinping

Xi Jinping यांचा जन्म १५ जून १९५३ साली चीनच्या बीजिंग शहरात झाला होता, त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शी जिनपिंग हे चीन मधील साम्यवादी पार्टीचे एक नेता म्हणून पुढे आले, ते साम्यवादी पार्टीचे नेता शी झोंगशून यांचे पुत्र आहेत, तसेच काही काळानंतर साम्यवादी पार्टीचे नेतृत्व करत त्यांना  पाचव्या पिढीचा प्रधान म्हणून ओळखल्या जाते.

आज शी जिनपिंग हे जगातून पाचव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

  • पोप फ्रान्सिस – Pope Francis

Pope Francis यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ साली आर्जेन्टिना मध्ये झाला होता, जॉर्ज मारिओ यांचे ते सुपुत्र जे रोमन कॅथालिक चे धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत, आणि आज ते महिलांच्या सुरक्षीते साठी तसेच महिल्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत,

पोप फ्रान्सिस व्हॅटिकन सिटी मधील लोकांना आपल्या प्रभावी भाषणाने जगण्याची प्रेरणा देतात.

तसेच आज ते जगातून चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. 

  • अँजेला मर्केल – Angela Merkel

Angela Merkel यांचा जन्म १७ जुलै १९५४ साली जर्मनी येथे झाला.

अँजेला मर्केल ह्या जर्मनीच्या कुलपती आहेत, ती जगातील सर्वात प्रबळ महिला आहे. जी जगामध्ये एक उत्तम उदाहरण आहे महिला सशक्तीकरनाचे, आज त्या जर्मनीत वास्तव्यास आहेत, २००७ मध्ये त्या युरोपियन कौन्सिलच्या दुसर्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या,

आज त्या जगातून तिसर्या क्रमांकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत.

  • डोनाल्ड जे ट्रम्प – Donald Trump

Donald Trump यांचा जन्म १४ जून १९४६ साली अमेरिकेच्या न्यू योर्क शहरात झाला होता. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यात रस घेतला.

त्यांनतर त्यांना त्यामध्ये तोटा पण सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी तो तोटा भरून सुद्धा काढला.

तसेच २०१६ च्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना जनतेने चांगल्या प्रकारे जिंकून दिले व २० जानेवारी २०१७ ला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

आज ते जगातून दुसर्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत.

  • ब्लादीमीर पुतीन – Vladimir Putin

Vladimir Putin  यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ साली एका गरीब परिवारात झाला होता, लहानपणापासून गुप्तहेर बनण्याच्या आवडीने त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास भाग पाडले, सोबतच त्यांनी रशिया साठी गुप्तहेराचे काम केले.

गुप्तहेर बनण्याच्या ट्रेनिंग ने त्यांना सर्व गोष्टी शिकून दिल्या घोडस्वारी पासून तर जेट उडवण्यापर्यंत तसेच त्यांना कराटे मध्ये ब्लेक बेल्ट मिळाला आहे.

त्यांच्या नावावर बऱ्याच उपल्ब्ध्या आहेत, सर्वात जास्त रशिया च्या राष्ट्राध्यक्ष पदावर आजपर्यंत कोणी राहिले असेल तर ते पुतीन आहेत.

पुतीन आज जगातून पहिल्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

तर मित्रहो आपण आज पाहिले जगातील १० सर्वात शक्तिशाली व्यक्तींची नावे, जी आज जगामध्ये खूप प्रभावी व्यक्तीमध्ये येतात.

आशा करतो आपल्याला हि माहिती आपल्या ज्ञानात भर टाकेल, जर आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.

आम्ही आणखी असेच माहितीपर लेख आपल्यासाठी घेऊन येत राहू,

आमच्यावर असेच प्रेम करत रहा. धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल.

Previous Post

तरुणांसाठी काही आवश्यक गोष्टी

Next Post

आर.आर.पाटील यांची माहिती

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
RR Patil

आर.आर.पाटील यांची माहिती

Sonali Kulkarni Biography in Marathi

चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

Satyachi Vat

"सत्येच्या वाटेवर" एक प्रेरणात्मक कविता

Sanjay Raut

संजय राऊत यांच्या विषयीची संपूर्ण माहिती

poetry on ziddi in marathi

जिद्द हि कविता वाचून येईल एक नवा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved