Top 9 Useful Websites
आजच्या जगात प्रत्येकाजवळ एक स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन असूनहि काही होत नाही, तर त्या स्मार्टफोन मध्ये इंटरनेट असायला हवे.
कारण एका दृष्टीकोनातून पाहिले असता स्मार्टफोनचा जीव झाला आहे इंटरनेट!
इंटरनेट शिवाय स्मार्टफोन म्हणजे आत्मा नसलेले शरीर, या स्मार्टफोन च्या जगात आपल्याला इंटरनेट ची खूप जास्त गरज भासत आहे.
काहीही शोधायचे म्हटल कि लगेच आपण गुगल उघडतो आणि गुगल वर शोधतो.
गुगल तर माहितीचे संग्रालय तसेच ज्ञानाचा समुद्र झालेला आहे.
जेथे आपण एक प्रश्न विचारणार तर तुम्हाला काही सेकंदात हजारो अचूक आणि योग्य उत्तरे मिळतील.
तसेच आज या लेखात सुद्धा आपल्याला काही वेबसाईट पाहायला मिळतील ज्यामुळे आपल्याला इंटरनेट वर आपले कार्य करण्यास सोपी जाईल.
“दैनिंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही विशिष्ट वेबसाईट” – Most Useful Websites
तर चला जाणून घेऊया काही अश्या वेबसाईट ज्यामुळे आपल्याला मदत होईल नवीन काही तरी जाणून घेण्यासाठी.
१) Mathway:
आपण विध्यार्थी किंवा शिक्षक असाल तर आपल्याला या वेबसाईटचा चा खूप फायदा होऊ शकतो.
ज्यामध्ये आपण गणितातील कोणतेही किचकट उदाहरण यामध्ये सोडवू शकता.
तसेच या मध्ये गणितातील सूत्र हि उपलब्ध आहेत. ज्यामुळे आपल्याला बीजगणित हा विषय शिकण्यास मदत होईल.
या वेब साईट ला भेट देण्यासाठी www.mathway.com येथे जा.
२) Navigation:.
जर आपण कुठे प्रवासासाठी निघाले असणार तर हि वेब साईट आपल्या कामात येऊ शकते.
फक्त आपल्याला वेबसाईट वर जाऊन आपण प्रवासाला जाण्याचे ठिकाण आणि तुम्ही जिथून जात आहात त्या ठिकाणाचे नाव टाकावे त्यानंतर ती साईट आपल्याला त्या ठिकाणांमधील अंतर, लागणारा वेळ सांगेल आणि त्यामुळे आपल्याला प्रवास करण्यास मदत होईल.
३) Date to Date Calculator:
बऱ्याच जणांना दिवसांचे मोजमाप करण्यात अडचण येत असते. जसे एखाद्या दिवसापासून एखाद्या दिवसापर्यंत किती दिवस होत असतील, वगैरे वगैरे.
तर आपल्याला ह्या वेब साईट ला भेट दिल्यावर अश्या प्रकारच्या अडचणीला सामोरे जाण्याचे काम पडणार नाही.
येते आपल्याला हव्या त्या दिवसांच्या मधील दिवस आपण मोजू शकता.
४) ऑनलाईन अलार्म क्लॉक – Online Alarm Clock:
काही वेळा आपण आपला मोबाईल तसेच क्लॉक कुठे ठेवला आपल्याला आठवत नाही.
मग अश्या वेळेला आपण आपल्या कॉम्पुटर वर अलार्म लावू शकतो. ते सुद्धा या वेबसाईट च्या मदतीने.
तर पुढच्या वेळेस जेव्हा सुद्धा आपल्याला अलार्म ची गरज असेल तेव्हा आपण या वेबसाईट ला भेट देऊन अलार्म लाऊ शकता.
५) ZAMZAR:
बरेचदा आपल्याला एखादी विशिष्ट फाईल किंवा फोटोस पीडीफ,जीआयफ,या आणखी कोणत्या फोर्मट मध्ये रुपांतरीत करायचे असतात, त्यासाठी आपल्याला वेळेवर काय करावे हे काळत नाही, त्यावेळी आपल्याला हि वेब साईट मदत करू शकते.
आपल्याला या वेब साईट वर गेल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेली फाईल त्यामध्ये अपलोड करावी लागेल त्यानंतर आपल्याला ज्या फोर्मट मध्ये फाईल हवी आहे, त्या फोर्मट ला निवडून त्यानंतर रुपांतरीत करण्याच्या बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली फाईल हव्या असलेल्या फोर्मट मध्ये भेटून जाईल.
६) DUOLINGO:
ज्या व्यक्तींना नवीन भाषा शिकण्यात रस असेल तर त्या व्यक्तींसाठी हि वेब साईट खूप उपयोगाची आहे.
ज्यामध्ये ३० पेक्षा आणखी भाषा आपण शिकू शकता. लाखो लोक या वेब साईट चा वापर भाषा शिकण्यासाठी करत आहेत.
तर आपण हि वेगवेगळ्या भाषेचे प्रेमी असाल तर आपण देशविदेशातील वेगवेगळ्या भाषा या वेब साईट ला भेट देऊन शिकू शकता.
ज्यामध्ये आपण आपले नवीन खाते उघडून सुद्धा त्यामध्ये प्रवेश करू शकता.
७) AMAZON:
या वेब साईट विषयी बऱ्याच लोकांना माहिती असेल, तरीही या वेबसाईट विषयी आम्ही आपल्याला यासाठी सांगत आहोत कारण अमेझॉन जगातील सगळ्यात उत्तम ई-कॉमर्स कंपनी आहे.आणि आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट या साईट वर आपलयाला भेटू शकते.
आपण या साईट च्या सहाय्याने कोणतीही वस्तू आपल्या घरापर्यंत बोलावू शकता तेही बाजारातील किमतीपेक्षा स्वस्त.
तर झाली ना अमेझॉन आपल्या साठी एक उपयुक्त साईट.
८) MINICLIP:
प्रत्येकाला कामातून फावला वेळ मिळाला कि तो त्या वेळात काही तरी मजेशीर गोष्टी करण्याचा विचार करत असतो, आपण हि काम करतेवेळी कंटाळून आले असाल तर आपल्याला ह्या वेब साईट वर जाऊन आपण आपला काही वेळ मजेत घालवू शकता.
ह्या वेब साईट वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे गेम्स दिसतील ज्या गेम्स ला आपण आपला काही वेळ घालवण्यासाठी खेळू शकता ज्यामुळे आपला कंटाळवाणा वेळ सहज निघून जाईल. तसेच लहान मुलांसाठी गेम्स ची चांगली वेबसाईट आहे.
९) Photo Pos Pro:
Photo Pos Pro हे एक फ्री फोटो एडिटर आहे. याला कोणत्याही प्रकारची फी किंव्हा प्रीमियम घ्यायची गरज नाही. हे तुम्हाला फुकट वापरायला मिळते.
Photo Pos Pro चे तुम्ही APP सुद्धा डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड करून फोटो एडीट करू शकता. यामध्ये तुम्ही एडिटिंग साठी वेगवेगळे ब्रश सुद्धा वापरू शकता. आणि फोटो ला चांगला लुक देऊ शकता. आणि या एडिटर मुळे तुमचा एडिटिंग चा अनुभव पण वाढेल, तसेच तुम्हाला बरेच काही शिकायला सुद्धा मिळेल.
तर मित्रांनो आशा करतो आपल्याला आजचा हा लेख आवडला असेल, तसेच एक वेळ अवश्य या सर्व वेब साईटना भेट देऊन पाहा आपल्याला चांगला अनुभव येईल. आणि आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरु नका.
सोबतच आपला अभिप्राय आम्हाला नोंदवा. कारण आपला अभिप्राय आमच्या साठी खूप मौल्यवान आहे.