असाही एक तानाशाह ज्याने जनतेला घर, वीज, तसेच बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या फुकट

Facts about Muammar Gaddafi

जेव्हा तानाशाह असा शब्द आपल्या कानावर पडतो तेव्हा आपल्याला एखाद्या क्रूर तानाशाह चे चित्र डोळ्यासमोर येते आणि आपल्या डोक्यात तानाशाह विषयी नकारात्मक विचार येतात. की भल्या मोठ्या प्रमाणात जनतेवर अत्याचार होत असतील किंवा तानाशाह त्याच्या स्वतःच्या नियमांमध्ये अडकवून देशातील जनतेला छेडत असेल. कारण बऱ्याच देशांमध्ये असे होत आहे.

आपल्या डोळ्यासमोर उत्तर कोरियाचे उदाहरण आहे. की कश्या प्रकारे आपल्या नियमांत देशातील जनतेला बांधून मानवी हक्कांचा गळा घोटल्या जात आहे. आणि जर कोणी त्याविरुद्ध बोलण्याचे धाडसही करतो तर त्याला सरळ मृत्यू दिल्या जातो. पण म्हणतात ना पाचही बोटे सारखे नसतात त्याचप्रमाणे जगातील सर्वच तानाशाह सारखे नाही आहेत.

काही तानाशाह जनतेला आपला परिवार समजून त्यांच्या भल्यासाठी आपल्या देशात योग्य ती पाऊले उचलतात आणि देशातील जनतेला कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याचे काम पडेल असे कार्य ते करत नाहीत, हो आपण योग्य वाचले आहे एक तानाशाह असून सुध्दा अशी वागणूक, की लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर लढण्यासाठी तयार असणे. हो या पृथ्वीवर असाही एक तानाशाह होऊन गेला आहे जो लोकांच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर राहिला. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत असा एक तानाशाह ज्याने लोकांना अनेक सुविधा पुरविल्या, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार, तर चला पाहूया.

लीबिया के तानाशाह नेता कर्नल मुअम्मर गद्दाफी – Information about Muammar Gaddafi in Marathi 

Muammar Gaddafi
Muammar Gaddafi

आजच्या लेखात आपण गोष्ट करत आहोत तानाशाह मुअम्मर गद्दाफी. मुअम्मर गद्दाफी हे लिबिया चे माजी तानाशाह होऊन गेले होते. त्यांच्या सरकार मध्ये त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला विजेचे बिल माफ केल्या गेलं होतं, संपूर्ण देशातील नागरिकांनी वापरलेल्या विजेच्या बिलाचा खर्च सरकारी तिजोरीतून भरल्या जात होतं.

गद्दाफी यांनी त्यांच्या देशात जाहीर केलेलं होत की लिबिया च्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर दिल्या जाईल आणि जो पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळत नाही तोपर्यंत ते त्यांच्या आई वडिलांसाठी घर बांधणार नाहीत. या प्रकारची शपथ त्या तानाशाह ने घेतली होती.

मुअम्मर गद्दाफी जेव्हा लिबिया चे तानाशाह बनले होते तेव्हा त्यांनी स्वतःची एक बँक काढली आणि या बँक ची एक विशेषतः होती की या बँकमधून लोन घेतल्या नंतर त्या लोन वर कोणत्याही प्रकारचे व्याज ग्राहकाला द्यावे लागत नसे, फक्त जेवढी रक्कम बँकेतून घेतली तेवढीच रक्कम परत करावी लागत असे.

यासोबतच असेही सांगितल्या जाते की लिबिया मध्ये लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मुअम्मर गद्दाफी यांच्या कडून ५० हजार रुपये दिल्या जात असत. एवढेच नाही तर नवीन जन्म झालेल्या बाळाला आणि आईला या तानाशाह कडून ३ लाख रुपये दिल्या जात असत.

या तानाशाह ला कर्नल गद्दाफी च्या नावाने सुध्दा ओळखले जायचे. या तानाशाह ने लिबिया वर जवळजवळ ४२ वर्ष राज्य केले, परंतु २० ऑक्टोबर २०११ ला सिर्त नावाच्या शहरात एका सैनिकी हमल्यात या तानाशाह ला मारल्या गेले.

जगात असाही तानाशाह असेल अशी आशंका खूप कमी जणांना असेल पण या लेखाला वाचल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनातील तानाशाह या शब्दाचा अर्थच बदलून जाईल तर आजच्या लेखात आपण पाहिले की असाही एक दिलदार तानाशाह या पृथ्वीवर होऊन गेलाय जो जनतेच्या भल्यासाठी कार्य करत होता.

तर आशा करतो आपल्याला या तानाशाह बद्दल लिहिलेली माहिती आवडली असेल, आपल्याला लिहिलेली ही माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top