ताबूत मध्ये ममी ठेवण्याची प्रथा अशी झाली होती सुरु, हे होते त्यामागील कारण

“द ममी रिटर्न” नावाची हॉलीवूड ची मूवी आपण पाहिली असणारच, त्यामध्ये आपल्याला पुरातन काळातील ममी पाहायला मिळते. कशाप्रकारे ममी वर्षानुवर्ष जसेच्या तसे राहतात. जगात इजिप्त मध्ये सर्वात आधी ममीला बनविल्या गेले होते. आणि सर्वात जास्त ममी ह्या इजिप्त मध्येच पाहायला मिळतात.

ममी बनविण्याचे सुरुवातीला कोणीही ठरविले नव्हते, ममी हि अकस्मात बनविल्या गेली होती आता ती कशी बनविल्या गेली आणि बनविल्या नंतर हजारो वर्ष ममी सुरक्षित कशी राहिली. यामागचे रहस्य आपण या लेखात पाहणार आहोत, तर चला सुरुवात करूया

हजारो वर्ष ममी सुरक्षित राहण्यामागचे हे आहे रहस्य, जाणून होणार हैराण – Mummy History

Mummy History
Mummy History

ममी म्हणजे काय? – What is a Mummy

ममी हा इजिप्त च्या प्राचीन इतिहासातील एक शब्द आहे, आणि हा शब्द अरबी भाषेतील मुमिया या शब्दापासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ असा होतो कि एखाद्या प्राण्याचे शरीर मेणाच्या आणि आणखी काही गोष्टीचा वापर करून एका ठिकाणी सुरक्षित ठेवलेली जाते ती म्हणजे ममी होय. इजिप्त च्या लोकांचा पुर्जन्मावर विश्वास होता. म्हणून ते ममी बनवून त्यांना एका ठिकाणी सुरक्षित ठेवून देत असत. जेणेकरून त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला तर त्या व्यक्तिला त्याचे शरीर पुन्हा मिळावे अशी मान्यता होती.

इजिप्त मध्ये जगातील सर्वात जास्त ममी असल्याचे दिसून येत, ममी ला पूर्ण श्रद्धा आणि भावाने बनविल्या जात असे. ममी बनविण्याच्या प्रक्रियेला ७० दिवसांचा कालावधी लागतो. ममीला बनविण्याचे कार्य त्यावेळी फक्त काहीच लोक करू शकत होते. ते तेव्हाचे वैद्य मानल्या जात असत.

अश्या प्रकारे बनवत ममीला सुरक्षित – Facts about Mummies

एखादी व्यक्ती मरण पावल्या नंतर सर्वात आधी त्या व्यक्तीच्या शरीराला स्वच्छ धुवून घेतल्या जात. मरण पावल्या नंतर शरीराचा सर्वात आधी मेंदू बंद पडतो, म्हणून सुरुवात तेथूनच केल्या जात असे. त्यानंतर त्या मृत शरीरातून काही अवयव बाहेर काढल्या जात असत. त्यांनतर त्या अवयवांना भांड्यांमध्ये सुरक्षित ठेवल्या जात असे, आणि या अवयवांना एका कैपोनिक नावाच्या बरणीत भरून ठेवल्या जात असे व या बरणीला मृत शरीराच्या सोबत ठेऊन दिल्या जात होत.

त्या अवयवांना काढण्यासाठी शरीराच्या एका बाजूला छोटासा चिरा मारून पोटातील सर्व अवयव बाहेर काढत असत. असे का केल्या जात असे आपल्याला प्रश्न पडला असेल, तर याचे उत्तर असे आहे कि आपल्या शरीरात काही एंझाइम्स असे असतात जे आपल्याला अन्न पचन करण्यास मदत करत असतात.

परंतु जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा शरीरातील एंझाइम्स पूर्ण शरीराचे विघटन होण्यासाठी उपयोगी ठरत असतात. आपण बरेचदा पाहिले असेल एखादे मृत पडलेले जनावराचे शरीर काही दिवसात जमिनीत कुजून जाते. हि पद्धत सुद्धा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. जर एखाद्याच्या मृत शरीराला आपण बरेच दिवस तसेच सोडून दिले तर त्या शरीरामध्ये असणाऱ्या हाडच आपल्याला दिसतील.

म्हणून ममी बनते वेळी मृत शरीरातील हे एंझाइम्स बाहेर काढले जात असत, आणि शरीरारामधील पाण्याला बाहेर काढले जात असे या संपूर्ण प्रक्रियेला ६०-७० दिवसांचा कालावधी लागत असे. या प्रक्रियेदरम्यान मृत शरीरातील सर्व अवयव काढल्या जात असत फक्त हृदय काढल्या जात नसे. ते शरीरात तसेच ठेवत असत.

या प्रक्रियेनंतर त्या मृत शरीराला रोगकारक पदार्थांनी मालिश केल्या जात असे. इजिप्त च्या प्रत्येक शहरात ममी बनविण्याचे सामान उपलब्ध होते मग ते मालिश करायचे तेल असो कि तागाच्या कापडाची पट्टी असो.

मृत शरीराची मालिश झाल्यानंतर त्या शरीराला पट्टीने गुंडाळल्या जात असे तेही काही विशिष्ट पदार्थांचा लेप लाऊन. जेणेकरून ते शरीर लवकर खराब होऊ नये. तागाच्या कपड्याला चिटकवून ठेवण्यासाठी राळेचा उपयोग केल्या जात असे.

यांनतर काम सुरु होत होते ते कलाकारीचे. बऱ्याच कलाकारांना कामाला लावले जात असे त्या शरीराच्या आकाराची शवपेटी बनविण्यासाठी ज्यावर मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे चित्र काढल्या जात असे. आणि त्यांनतर धर्मगुरूंनी सांगितल्या प्रमाणे शरीरावर अंतिम विधी करून ती शवपेटी एका व्यवस्थित ठिकाणी ठेवल्या जात असे. अश्या प्रकारे ममी हजारो वर्ष सुरक्षित राहत असत.

आपल्याला ममी कश्या असतात हे पाहायचे असेल तर आपण आपल्या देशातील काही संग्रहालयांना भेट देऊ शकता. जेथे हजारो वर्षा आधीच्या ममी ठेवलेल्या आहेत. आणि अजूनही त्या सुरक्षितच आहेत.

आशा करतो आपल्याला या लेखातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल, आपल्याला या लेखातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपण या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करून त्यांच्या माहितीत भर टाकू शकता, सोबतच अश्याच नवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top