• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विषयी असणारे काही गैरसमज नक्की होतील दूर त्यासाठी वाचा हा लेख 

Misconceptions about Computers

दैनंदिन जीवनात कॉम्प्युटर एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. ज्याचा वापर जवळ जवळ प्रत्येक दुकानात, प्रत्येक ऑफिसमध्ये, शोरूम्स मध्ये तसेच आपल्या वैयक्तिक कामासाठी सुध्दा केला जात आहे. आणि कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप विषयी बरेच लोकांना काही गोष्टी विषयी गैरसमज आहे जे चुकीचे आहे. तर कोणत्या अश्या गोष्टी आहेत ज्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप विषयी खऱ्या नसतानाही खऱ्या मानल्या जातात. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विषयी काही गोष्टी ज्या लोकांमध्ये गैरसमज आहे  तर चला पाहूया..

कॉम्प्युटर विषयी असलेले ५ गैरसमज – 5 Common Myth About Computer

Misconceptions about Computers
Misconceptions about Computers

१) कॉम्प्युटर जुना झाल्यावर स्लो चालतो – Computer Runs Slower when it’s Older

बरेच लोकांना हे वाक्य बोलतांना आपणही ऐकले असेल, की कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप जुने झाल्यावर त्यांची स्पीड कमी होते. आणि या गोष्टीला खरं समजून काही लोक जुन्या ऐवजी नवीन कॉम्प्युटर किंवा नवीन लॅपटॉप घेतात. पण आपल्या माहिती साठी जुने कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ची स्पीड स्लो होत नाही.

तर काही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप च्या मेमोरी म्हणजेच हार्ड डिस्क मध्ये खूप जास्त डेटा स्टोर असल्यामुळे सिस्टम ची बुटिंग प्रोसेस वाढते आणि सुरू होण्यासाठी बराच वेळ लागतो. आणि आपल्याला वाटते की कॉम्प्युटर जुना झाल्यामुळे स्लो चालत आहे.

२) कॉम्प्युटर वरील काम झाल्यानंतर त्याला बंद करूनच सोडले पाहिजे – Should Always Turn Your Computer off

काही लोकांच अस मत आहे की कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर आपले काम झाल्यावर त्याला बंद करून ठेवले पाहिजे आणि आपण बंद करून ठेवले नाही तर आपले सिस्टम खराब होण्याची शक्यता असते. पण असे काहीही नाही आहे. कॉम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये एक सिस्टम असते जर आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ला बंदही केले नाही तरीही काही वेळानंतर कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आपोआप स्लिप मोड जात असतो.

कॉम्प्युटर ची प्रोसेसिंग पूर्णपणे बंद होत असते. फरक फक्त एवढा असतो की जर आपण कॉम्प्युटर ला बंद केले तर जेव्हा आपण पुन्हा कॉम्प्युटर ला उघडणार तेव्हा कॉम्प्युटर सुरुवातीपासून प्रोसेस होत उघडणार आणि जर कॉम्प्युटर ला बंद न करता स्लिप मोड मध्ये ठेवले तर तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर ला उघडणार तुमचा कॉम्प्युटर तुम्ही सोडून गेलेल्या परिस्थिती मध्येच तुम्हाला मिळणार. आणि कॉम्प्युटर ला यामुळे कोणताही धोका येणार नाही.

३) कॉम्प्युटर मध्ये अँटी व्हायरस असल्याने व्हायरस येऊ शकत नाहीत – Computer has Antivirus, Viruses cannot come

कॉम्प्युटर चा वापर करणारे बरेच लोकांच अस मत आहे की कॉम्प्युटर मध्ये अँटी व्हायरस असल्यावर कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येत नाहीत. आणि कॉम्प्युटर ला वापरणारे निश्चिंत होतात की त्यांच्या कॉम्प्युटर ला कोणत्याही प्रकारच्या व्हायरस पासून आता धोका नाही, पण खरं तर अँटी व्हायरस असताना सुध्दा आपल्या कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळोवेळी आपल्या अँटी व्हायरस  ला स्कॅन करून चेक करावे की आपल्या कॉम्प्युटर मध्ये कुठल्या प्रकारचा व्हायरस तर आला नाही. आल्यास आपल्याला अँटी व्हायरस सूचित करणारच आणि आपण त्याला आपल्या कॉम्प्युटर मधून डिलीट सुध्दा करू शकतो.

४) कॉम्प्युटर मधून डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर करता येत नाही -Data Deleted from Computer cannot be Recovered

कॉम्प्युटरचा वापर करणारे बरेच लोक या गोष्टीला मानतात की एकदा कॉम्प्युटर मधून डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर करता येत नाही. पण ही गोष्ट खरी नाही आहे आपल्याकडून जर चुकून कॉम्प्युटर मधील डेटा डिलीट झाला तर आपण त्या सर्व डेटा ला रिकव्हर करू शकतो आपल्याला फक्त रिसायकल बिन मध्ये जाऊन त्या डेटा ला रिस्टोर करावे लागेल. आणि आपल्या कॉम्प्युटर मध्ये आपला डेटा पुन्हा आपल्याला मिळून जाईल पण जर आपण रिसायकल बिन मधून सुध्दा जर डेटा डिलीट केलेला आहे तर आपण डेटा रिकव्हर करू शकत नाही. कॉम्प्युटर मधून कायमचा डिलीट केलेला डेटा सुध्दा हार्ड डिस्क मध्ये सेव राहतो. आणि कुठल्याही रिकव्हर सॉफ्टवेअर चा वापर करून आपण डेटा रिकव्हर करू शकतो.

५) Gmail च्या स्पॅम बॉक्स ला उघडल्याने कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येतात – Opening Gmail’s Spam Box can Infect your Computer

Gmail च्या इनबॉक्स मध्ये स्पॅम नावाचे फोल्डर पाहायला मिळते आणि या फोल्डर मध्ये त्यांचे संदेश आलेले असतात ज्यांना आपण ओळखत नाही. आणि बरेच लोकांचे असे मत आहे की या स्पॅम बॉक्स ला ओपन केल्याने आपल्या कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते, पण असे काहीही नाही आहे कारण कोणत्याही फोल्डर ला उघडल्याने जर व्हायरस आले असते तर कॉम्प्युटर वापरणे कठीण झाले असते. स्पॅम बॉक्स ला उघडल्याने कोणत्याही प्रकारचा व्हायरस आपल्या कॉम्प्युटर मध्ये येत नाही.

परंतु आपण जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या संदेशाच्या लिंक वर क्लिक केले तर कदाचित आपल्या कॉम्प्युटर मध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. म्हणून कधीही कोणत्याही अनोळखी संदेशामध्ये आलेल्या लिंक वर क्लिक करू नका. आणि आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ला व्हायरस पासून आपण क्लिक न करता वाचवू शकतो.

ह्या काही गोष्टी होत्या ज्या  बद्दल लोकांना गैरसमज आहे तर या लेखाच्या माध्यमातून आपल्याला माहिती झाले असेल की या गोष्टी खऱ्या नाही आहेत. आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved