नरसिंह मंत्र

Narasimha Mantra Lyrics

भगवान विष्णू यांनी हिरण्यकश्यपू नामक दैत्याचा वध करण्यासाठी भूलोकात धारण केलेला अर्धा सिंह व अर्धा मनुष्य रुपी अवतार म्हणजे भगवान नरसिंह हा होय. धार्मिक ग्रंथांनुसार भगवान विष्णू विविध युगांत या भूलोकातील दैत्यांचा वध करण्यासाठी अवतरीत झाले आहेत. म्हणून त्यांना पृथ्वीवरिल प्राणीमात्रांचे संहारक संबोधलं जाते.

भगवान विष्णू यांनी विविध युगांत धारण केलेल्या अवतारांपैकी आज आपण नरसिंह अवताराबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, त्यांची आराधना करतांना पठन करण्यात येत असलेल्या व त्यांची स्तुती केल्या असलेल्या नरसिंह मंत्राचे लिखाण करणार आहोत.

नरसिंह मंत्र – Narasimha Mantra Lyrics

Narasimha Mantra
Narasimha Mantra

“उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।

नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम्॥”

भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराबाबत पुराणांत अशी आख्यायिका आहे की, भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतार राजा हिरण्यकशिपू यांचा वध करण्यासाठी घेतला होता. तसचं, याबाबत पुराणात एक कथा देखील प्रचलित आहे. ब्रह्म पुत्र मरिची यांचे पुत्र ऋषी कश्यप हे एका महान वैदिक ऋषी होते.

ऋषी कश्यप पत्नी दिती यांना ‘हिरण्यकश्यपू’ आणि ‘हिरण्याक्ष’ नामक दोन पुत्र होते. ऋषी पुत्र पृथ्वीवर वास्तव्य करीत असलेल्या पशु,पक्षी आणि मानवाला नाहक त्रास देत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळून लोक भगवान विष्णू यांची आराधना करू लागले. तेंव्हा भगवान विष्णू यांनी ‘हिरण्याक्ष’  यांचा वध केला.

भगवान विष्णू यांनी आपल्या भावाचा वध केल्याने क्रोधीत होवून राजा हिरण्यकश्यपू यांनी आपल्या मनात भगवान विष्णू यांचा वध करण्याचा संकल्प करून भगवान ब्रह्म देव यांच्याकडून अजिंक्यपदाचे वरदान प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.

राजा हिरण्यकशिपू यांची कठोर तपश्चर्या पाहून ब्रह्म देव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा हिरण्यकशिपू यांना अजिंक्यपदाचे वरदान दिले. वर प्राप्त केल्यानंतर त्यांनी स्वर्ग लोकावर स्वारी केली आणि आपले अधिराज्य स्थापित केले. देव लोकांतील देव सुद्धा त्यांचा सामना करू शकत नव्हते.

भक्त प्रल्हाद यांची भक्ती भगवान विष्णू यांच्या चरणी प्रबळ होती म्हणूनच त्यांना भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन झाले. आपण सुद्धा भगवान नरसिंह यांची आराधना करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या लेखात लिखाण करण्यात आलेली भगवान नरसिंह यांच्या आरतीचे नियमित पठन करावे.

वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या साह्याने मिळवली असून, भगवान नरसिंह यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या नरसिंह आरतीचे लिखाण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here