विष्णू देवाची आरती

Vishnu Aarti

हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये सुमारे ३३ कोटी देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक देवी देवतांचे कार्य आणि महत्व हे वेगवेगळे आहे. सृष्टीची रचण्या करण्यामागे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांना विशेष महत्व देण्यात आलं आहे.

या ठिकाणी आज आपण या लेखामध्ये भगवान विष्णु यांच्या आरतीच लिखाण करणार आहोत. ज्यामुळे ही विष्णु ची आरती सगळ्यांना पाठ होयील आणि एकादशीला किवां अजुन एखाद्या विष्णु च्या पूजेला आपण ती आरती सहजरीत्या म्हणू शकु. चला तर पाहूया भगवान् विष्णु ची आरती –

विष्णू देवाची आरती – Vishnu Aarti Om Jai Jagdish Hare

Vishnu Aarti Om Jai Jagdish Hare
Vishnu Aarti Om Jai Jagdish Hare

ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।

भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥

जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।

सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥ ॐ जय…॥

मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।

तुम बिनु और न दूजा, आस करूं जिसकी॥ ॐ जय…॥

तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥

पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥ ॐ जय…॥

तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।

मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥ ॐ जय…॥

तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।

किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥ ॐ जय…॥

दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।

अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥ ॐ जय…॥

विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।

श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥ ॐ जय…॥

तन-मन-धन और संपत्ति, सब कुछ है तेरा।

तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा॥ ॐ जय…॥

जगदीश्वरजी की आरती जो कोई नर गावे।

कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥ ॐ जय…॥  

भगवान विष्णू यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण कर्ता म्हणून संबोधलं जाते. भगवान विष्णू यांच्या विविध युगांतील अवतारांबाद्द्ल असे म्हटले जाते की, त्यांनी त्रेता युगांत जनतेच्या कल्याणासाठी राम अवतार घेतला होता.

तर, द्वापार युगांत त्यांनी कृष्ण रुपी जन्म घेतला होता. दोन्ही युगांमध्ये त्यांनी सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी या भूलोकात जन्म घेतला होता. हिंदू धार्मिक पुराणांमध्ये भगवान विष्णू यांच्या अवतारांचे वर्णन करण्यात आलं आहे. त्यानुसार भगवान विष्णू यांनी सत युगापासून कलयुगापर्यंत एकूण २४ अवतार धारण केली असून, त्यांपैकी प्रमुख दहा अवतार दशावतार स्वरुपात प्रसिद्ध आहेत.

तसचं, भागवत पुराणामध्ये भगवान विष्णू यांचे एकूण २२ अवतार सांगितले आहेत तर, महाभारत या पवित्र महाकाव्यात त्यांच्या नऊ अवतारांचा उल्लेख करण्यात आला आहे. भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या विविध अवतारानुसार त्यांना प्रत्येक ठिकाणी विविध नावाने पुकारलं जाते.

काही ठिकाणी त्यांना, कृष्ण म्हणून ओळखतात तर काही ठिकाणी राम म्हणून. तसचं, महाराष्ट्रात त्यांना विठ्ठल किंवा पांडुरंग भगवान म्हणून संबोधलं जाते. त्यांची महिमा गावी तितकी कमीच आहे. लक्ष्मीपती भगवान विष्णू यांचे रूप खूप गोजिरवाणे असून त्यांची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

माता लक्ष्मीप्रमाणे चतुर्भुजधारी रूप धारण करून उजव्या हाती सुदर्शन चक्र, डाव्या हाती पांचजन्य शंख, खालच्या उजव्या हातात कौमोदकी गदा, त्या खालील हातात पद्म, गळ्यात कौस्तुभी मणी, कानात कुण्डले, डोक्यावर किरीट मुकुट कपाळावर ऊर्ध्व पुंड धारण केलेली विष्णू मूर्ती खुपच विलोभनीय दिसते.

भगवान विष्णू असे रूप धारण करून माता लक्ष्मी यांच्या बरोबर क्षीरसागरामध्ये अनंत शेषनागावर विराजमान झालेले आहेत. तसचं, या सृष्टीचे तारणहार असलेल्या भगवंतांचे वाहन हे गरुड आहे. माता लक्ष्मी यांच्या सोबत विराजमान असलेल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या जोडीला लक्ष्मीनारायण म्हणून संबोधलं जाते.

मित्रांनो, वैकुंठ निवासी असलेल्या आणि राजरसिक तत्त्वाची देवता असणाऱ्या भगवान विष्णू यांची आराधना केल्याने आपणास धन, सुख आणि समृद्धीचा लाभ होतो. वैद पुराणामधील वर्णीत भगवान विष्णू यांची माहिती वाचल्यास आपणास त्यांची महंती कळेल.

सुख समृद्धी आणि वैभव रुपी फळ देणाऱ्या भगवान विष्णू यांची पूजा दर महिन्याच्या एकादशीला आणि अनंत चतुर्थीच्या करण्यास विशेष महत्व देण्यात आलं आहे. तसचं, आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी देखील भगवान विष्णू यांची पूजा आरती केली जाते. यांची पूजा आरती केल्याने आपले दारिद्र्य नष्ट होते आही घरात सुख समृद्धी येते. शिवाय आपल्या मनाला शांती देखील लाभते. तसचं, भगवान विष्णू यांची आराधना केल्याने माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद सुद्धा आपणास मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here