Home / Festival / नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी – Navratri Information in Marathi

नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी – Navratri Information in Marathi

Navratri information

आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे, संपुर्ण नउ दिवस देविची पुजा अर्चा आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देविची अनेक रूपं या नउ दिवसात पुजतात. हिंदु धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे बघीतल्या जाते.

नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मधे नवरात्री या शब्दाचा अर्थ “नऊ रात्री” असा आहे. या नऊ रात्री आणि दहा दिवशी 9 वेगवेगळया देविंची पुजा अर्चा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्यानं या दिवसाला साडे तिन मुहूर्तापैकी एक मानल्या जातं.

भारतात आणि नेपाळ मधे साजरा करण्यात येणा.या सणांपैकी नवरात्र हा एक सण आहे. तसच दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा एक सण आहे जो दस.या नंतर 20 दिवसांनी साजरा केल्या जातो. तसं पाहीलं तर एका वर्षात 5 प्रकारचे नवरात्र येतात त्यात शारदिय नवरात्र सर्वात प्रसिध्द आहे. ब.याच ठिकाणी नवरात्राचा अर्थ शारदिय नवरात्र असाच असतो.

नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी – Navratri Information in Marathi

Navratri Information in Marathi

नवरात्राची प्रथा आणि परंपरा – Navratri Puja Vidhi

मुख्य नवरात्र सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात येत असतं. तेव्हां भाविक आपल्या आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रौत्सवाची स्थापना केली जाते. घरी आणि मंदीरात दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात देवीला नैवैद्यात फळं आणि फुलं वाहिले जातात. लोक एकत्र येउन आरती, गायन आणि भजनं देखील म्हणतात.

नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसांमधे दुर्गेची पुजा केली जाते जीला उर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातं. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा केली जाते. पहिले तिन दिवस त्यांच्या कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पुजन करण्यात येतं.

परंतु साधारणतः पाहिल्यास एका लाकडी काडयांपासुन बनविलेल्या नव्या टोपलीत माती भरली जाते त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरले जातात. या टोपलीत दहा ही दिवस पाणी टाकल्या जाते. दहा दिवसांमधे संपुर्ण टोपली धानाने हिरवीगार झालेली आणि मातीचा घट त्यामधे झाकुन गेलेला असतो. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेउन त्यात विडयाची पाच पाने ठेवली जातात त्यावर नारळ ठेवल्या जातो.

प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी विडयाच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे. पुजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. गणपतीची देवीची आणि नवरात्राची आरती म्हंटल्या जाते. सकाळ संध्याकाळ आरती आणि धुप पेटवला जातो.

देवीच्या घटाजवळ अखंड दिवा दहा दिवसांकरीता लावला जातो. हा दिवा दहा दिवस विझु दिला जात नाही. या दहा दिवसांमधे नऊ कुमारीकांचे पुजन केल्या जाते त्यांचे पाय धुवुन त्यांना भेटवस्तु दिल्या जातात.

अष्टमीला होमहवन करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. अनेक ठिकाणी नवमीला नवरात्रीचा कुळाचार असतो तर बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला देखील कुळाचार असतो. नऊ दिवस देवीला वेगवेगळया रंगाच्या साडया नेसवल्या जातात आणि त्या रंगांप्रमाणे स्त्रिया देखील त्या त्या रंगांच्या साडया परिधान करतांना दिसतात.

नवरात्रातील नववा दिवस हा या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो या दिवसाला महानवमी देखील म्हणतात. या दिवशी कुमारिकांचे पुजन केले जाते, नऊ छोटया कुमारिकांना बोलावुन त्यांचे पुजन करण्याची प्रथा आहे. या नऊ कुमारिकांपैकी प्रत्येकीला देवि दुर्गेचे एक रूप मानले जाते.

या दिवशी या कन्यांचे पाद्यपुजन केले जाते मोठया आदर आणि सन्मानाने त्यांना घरी आमंत्रीत केले जाते. नंतर त्या कन्यांना जेऊ घातले जाते. नंतर भाविक त्यांना नवे वस्त्र आणि भेटवस्तु देखील देतात.

अनेक कुटुंबांमधे जोगवा मागण्याची देखील परंपरा आहे त्याप्रमाणे घरातील सवाष्ण स्त्री पाच घरी जाऊन जोगवा मागते. त्यामधे कणीक, तांदुळ, गुळ असे जिन्नस असतात. या मिळालेल्या जोगव्यातुनच कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो.

सार्वजनिक मंडळांमधे मोठया मोठया मुर्तींची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात. पारंपारीक आणि पुराणकाळातील देखावे आकर्षक असतात आणि भाविकांचे लक्ष वेधणारे देखील असतात.

कोल्हापुर, तुळजापुर, माहुर आणि सप्तश्रृंगी या महाराष्ट्रातील साडेतिन शक्तीपिठांवर या दहा दिवसांमधे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भाविक या दिवसांमधे देवीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे कार्य समजतात.

नवरात्रात रात्री लोक दांडिया आणि गरबा खेळतात विशेषतः गुजरात मधे लोक मोठया प्रमाणात रासगरबा खेळतात. गरबा आरतीच्या आधी आई दुर्गेच्या सन्मानार्थ खेळल्या जातो, आणि दांडिया आरतीच्या नंतर खेळल्या जातो.

सप्टेंबर आॅक्टोबर मधे नवरात्री च्या वेळी नवरात्राचा दहावा दिवस दसरा म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिवशी भाविक सरस्वतीची पुजा करतात आणि आई दुर्गेला मानसिक शांती आणि ज्ञानाचे मागणे मागतात. या दिवशी लंकाधीश असुर रावणाचा पुतळा बनवुन त्याचे दहन केले जाते.

नवरात्राची कथा – Navratri Story in Marathi

रामायणानुसार प्रभु रामचंद्रांनी देवी दुर्गेला रावणासोबत युध्द होत असतांना बोलवले होते. वसंतऋतु च्या शेवटी दुर्गा देवीची पुजा अर्चना केली जाते. युध्दाची शक्यता पाहाता प्रभुरामचंद्रांनी देवी ला अस्तं महाविद्येने बोलवले होते ज्याला आपण अकाल बोधन या नावाने देखील जाणतो, पण ही पुजा पारंपारिक दुर्गापुजे पेक्षा थोडी वेगळी असते या पुजेला अकाल बोधन असे म्हणतात. जीला आपण कधीही करता येणारी पुजा देखील म्हणतो.

नवरात्री गरबा डांस – Navratri Dance

गुजरात इथं गरबा नेहमी नवरात्र, शरद पौर्णिमा, वसंत पंचमी आणि होळी या प्रसंगी खेळला जातो. या सोबतच नवरात्रीच्या नऊ दिवसांमधे आई जगदंबेच्या सन्मानार्थ पारंपारीक संगीत देखील वाजवले जाते. नृत्य साधारणतः महिलाच करतात पण वर्तमान काळात पुरूष देखील यात सहभागी होतांना दिसुन येत आहेत. डान्स करतांना सगळेजणं एक मोठा गोल बनवुन उभे राहातात, गरबा या शब्दाच्या उत्पत्ती मागे देखील बरीच कारणं आहेत. प्राचीन मान्यते नुसार भगवान श्रीकृष्णाच्या वहिनी उषा नेच लास्य नृत्याला लोकप्रीय बनवले ज्याला नंतर गरबा या नावाने ओळखले जाउ लागले.

गरबाच्या सर्वसाधारण प्रकारात स्त्रिया गरबा खेळतांना डोक्यावर दिवे ठेवतात आणि गोल गोल फेर धरतात, फिरतांना त्या गाणे देखील म्हणतात आणि टाळया देखील वाजवतात. हे नृत्य करत असतांना नेहमी लोकवाद्यांचाच वापर केला जातो. गरबा खेळत असतांना मध्यभागी सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवले जाते त्यावर नारळ देखील ठेवतात जे पवित्र कंुभाचे प्रतिनिधीत्व करते.

गुजरात मधे नवरात्रात गरबा हा रात्रीच केल्या जातो. नृत्याचे आयोजन विविध समुह, क्लब आणि समिती करत असतात. गरबा च्या रात्री सगळे सहभागी एका मोकळया जागी जमा होतात. जमा झाल्यानंतर ते गोलाकार आकारात उभे राहातात, मध्यभागी नेहमी दुर्गेची प्रतीमा ठेवण्यात येते.

नृत्याची सुरूवात मंद संगीताने केली जाते, जसजसे नृत्य पुढे जाते तसतसे नृत्य करणा.यांचा उत्साह वाढत जातो. संगीताला देखील मधे मधे बदलण्यात येतं आणि गरबागीतं वाजवले जातात. नवरात्री गरबा भारतात नृत्याचा सर्वाधीक प्रसिध्द आणि लोकप्रीय प्रकार आहे, या नृत्याला महिला आणि पुरूष दोघेही सोबत करू शकतात. बरेचजणं पारंपारीक गुजराती पोषाख घालुन गरबानृत्य करतात.

सौराष्ट्रात हे नृत्य करतांना घाघरा चोली आणि ओढणी हा पेहराव असतो. या सोबतच सुरेख आणि आकर्षक आभुषण देखील घालतात. तिथे पुरूष मंडळी शर्ट आणि ट्राऊजर परिधान करतात. अश्या पध्दतीने संपुर्ण भारतात लोक नवरात्राचा उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजर करत आनंदाची देवाणघेवाण करतात.

लक्ष्य दया : तुमच्या जवळ आणखी नवरात्रीबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू … धन्यवाद्

Please : आम्हाला आशा आहे की हा नवरात्री / Navratri Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच …. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका … आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा

Check Also

Kojagiri Purnima

“कोजागरी पौर्णिमा” जाणुया काय आहे या सणाच महत्व?

Kojagiri Purnima in Marathi अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *