असाही एक देश जिथे भ्रष्टाचार नसल्यासारखा आहे. इथे एका दिवसात सुरू करू शकता आपण आपला व्यवसाय

World’s Least Corrupt Country

संपूर्ण पृथ्वीवर १९४ देश आहेत आणि प्रत्येक देशाची आपली एक वेगळी ओळख आहे. कोणी जगातील सर्वात जास्त शस्त्रसाठा ठेवणारा देश आहे तर कोणता देश जगातून नंबर एकचे सैन्य ठेवण्यात पारंगत आहे. अश्याच तमाम देशांपैकी पृथ्वीवर असाही एक देश आहे ज्या देशात भ्रष्टाचार हा नसल्यासारखा आहे. आणि या देशातील कोणीही व्यक्ती फक्त आणि फक्त एका दिवसात आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, की कोणत्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण हे नसल्या सारखे आहे आणि त्या देशात आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचे बाकी देश अनुसरण करू शकतील. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया.

कोणता देश आहे जिथे भ्रष्टाचाराचे प्रमाण नसल्यासारखे आहे – New Zealand is the least corrupt country in the world

New Zealand ranked world's least corrupt country
New Zealand ranked world’s least corrupt country

न्यूझीलँड हा असा देश आहे जिथे भ्रष्टाचाराचे प्रमाण नसल्या सारखे आहे, बाकी देशांमध्ये एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिने लागतात. तेच या देशात फक्त आणि फक्त एक दिवसाचा कालावधी लागतो, यावर आपण विचार करू शकता की न्यूझीलँड हा बाकी देशांपैकी कश्या प्रकारे वेगळा आहे. न्यूझीलँड हा ऑस्ट्रेलिया च्या जवळ वसलेला एक सुंदर देश आहे. ह्या देशात ओपन माइंडेड लोक जास्त प्रमाणात राहतात.

या देशाची विशेषता म्हणजे या देशात स्त्रियांना पुरुषांच्या समान मानलं जातं आणि येथे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या वेतनात खूप कमी अंतर आहे. म्हणजे जवळ जवळ कोणताही फरक नाही पुरुषांच्या वेतनापेक्षा ५% कमी वेतन महिलांना दिल्या जातं. जगात न्यूझीलँड हा एकमेव असा देश आहे जिथे पुरुष आणि स्त्रियांच्या वेतनात एवढा कमी अंतर पाहायला मिळतो.

या देशात महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची परवानगी तर आहेच सोबत त्यांना तसे अधिकार सुध्दा दिल्या गेलेले आहेत. न्यूझीलँड येथील महिलांना १८९३ मधेच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. तर आपण समजू शकता की न्यूझीलँड हा देश कसा असेल.

यानंतर या देशाची आणखी एक विशेषता आहे ती म्हणजे येथे एका दिवसात व्यवसायाला सुरुवात केल्या जाऊ शकते. यामागे सुध्दा कारण आहे. कारण की या देशात भ्रष्टाचार हा नसल्यासारखा आहे. त्यामुळे व्यवसायाला मान्यता मिळणे सहाजिकच आहे. आणि न्यूझीलँड हा देश जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणाऱ्या टॉप पाच देशांच्या सूची मध्ये येतो.

या देशाने खूप कमी वेळात जगात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आजपासून ८०० वर्षांपूर्वी या देशाला माओरी जाती शिवाय दुसरी ओळख प्राप्त नव्हती. परंतु आज सर्व जगामध्ये या देशाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. येथील लोकांना प्रवास करणे खूप आवडते. पण प्रवासासाठी ते रेल्वेचा वापर करत नाहीत.

वरील लेखात आपण पाहिले न्यूझीलँड देशाविषयी थोडक्यात माहिती आशा आकारते आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here