कांद्या ची माहिती आणि फ़ायदे

Kandyachi Mahiti

कच्च्या कांद्यात एल.डी.एल. कोलेस्टरॉल घटविण्याचा आणि एच.डी. कोलेस्टरॉल वाढविण्याचा गुण आहे. हृदयरोग किंवा कोलेस्टरॉलची समस्या असलेल्या रुग्णांनी रोज एक छोटा कांदा किंवा त्यातून निघेल एवढा कांद्याचा रस घेतल्यास ३०% एचडीएल कोलेस्टेरॉल वाढते. त्यांचे म्हणणे आहे की कांदा जितका शिजवाल तितकी त्याची एच.डी. एल. कोलेस्टॅालमध्ये वृद्धी करण्याची शक्तीकमी होईल. म्हणून दिवसातून कमीत कमी एकदा तरी प्रत्येकाने १ छोटा कांदा आणि २/३ लसणाच्या पाकळ्या जरूर खाव्यात.

अश्या प्रकारची बरीच माहिती आम्ही तुमच्यासाठी आजच्या या लेखातून घेवून आलो आहोत, चला तर मग बघू या,

कांद्या ची माहिती आणि फ़ायदे – Onion Information in Marathi

Onion Information in Marathi
Onion Information in Marathi
हिंदी नाव  प्याज़
इंग्रजी नाव  Onion
 • उन लागल्यास पूर्ण शरीरावर कांद्याचे पाणी (कांदा किसून पिळून पाणी काढावे.) लावावे. तळपाय, हात व कपाळाला लावावे.
 • नाकातून रक्त जात असल्यास ताबडतोब कांदा फोडून कमी चिरून सुंघवावा. रक्त थांबते.
 • कांद्याला वाटून ते पाण्यात मिसळून घरात शिंपडल्यास किडे, पिसवा व मुंग्या जातात.
 • उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागून एकदम ताप येतो. अशावेळी कांद्याचे पाणी पिण्यास द्यावे व हातापायाला कपाळाला व कपाळाच्या दोन्ही (चाळ्याला) बाजूला कांदा किसून ताजा रस लावावा. कांदा थंड असल्याने शरीरातील उष्णता निघून थंड वाटते व ताप कमी होतो. प्रवासात किंवा उन्हाळ्यात बाहेर जाताना कांदा नेहमी जवळ ठेवावा.
 • सर्दी सारखी होऊन नाक वाहात असल्यास कांद्याच्या पाण्याचा वास घ्यावा. (कांदा किसून पिळून पाणी काढावे) तसेच जेवणात कांदा जास्त द्यावा.
 • कांदा गरम करून कुस्करून त्यातील पाणी काढावे व त्यात मीठ मिसळून ते पाणी पिण्यास द्यावे. पोटदुखी थांबते.
 • उलटी होत असल्यास कांदा खाण्यास द्यावा किंवा कांद्याचा वास घेण्यास सांगावे.
 • कान दुखत असल्यास कांदा, थोडासा गरम करून त्याचे पाणी काढून कानात टाकावे व कांद्याचे २-३ थेंब गरम पाणी पिण्यासद्यावे.
 • विंचू किंवा मधमाशा किंवा विषारी कीडा चावल्यास त्यावर कांद्याचे पाणी लावावे.
 • पिसाळलेला कुत्रा चावला तर कांदा व तुरटी लावल्यास व कांद्याचे पाणी पिण्यास दिल्यास कुत्र्याचे विष कमी होते
 • कांद्याचा रस व मोहरीचे तेल लावल्यास गळ्याच्या गाठी कमी होतात.हा बहुगुणी कांदा दररोजच्या स्वयंपाकातील पदार्थ सर्वांनाच आवडतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top