या ५ चित्रपटांमध्ये एकाच ठिकाणी फसलेली व्यक्ती आपली वेळ कशाप्रकारे काढतात ते दाखवले आहे, या चित्रपटांपासून लॉक डाऊन मध्ये वेळ घालविण्यासाठी होणार मदत.

Best 5 Optimistic Movies

प्रत्येक जण कोरोनामुळे आपापल्या घरामध्ये बंद आहे, घरामध्ये बंद असताना काही व्यक्ती आपल्या छंदासाठी वेळ देत आहेत तर काही व्यक्ती आपल्या परिवाराला वेळ देत आहेत, आणि असेही बरेच व्यक्ती आहेत जे त्यांचे काम घरून करत आहेत, या लॉक डाऊन मधील बरेच व्यक्तींचं टॅलेंट बाहेर येत आहेत काही जण स्वयंपाक घरात मदत करताना दिसत आहेत तर काही घराची साफसफाई करताना, या लॉक डाऊनच्या काळात आपण आपला वेळ कसा घालवू शकता यावर याआधी पण एक लेख लिहिलेला आहे तो आपण वाचू शकता.

आज कोरोनामुळे संपूर्ण जगात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे हा आपल्या सगळ्यासाठी एक वाईट काळ आहे. अश्या परिस्थिती मध्ये कस जगायचं यावर आधारित तसेच प्रोत्साहित करणारे काही चित्रपट आपल्यासाठी आणले आहे.

खाली ५ असे काही चित्रपट दिले आहेत, त्या चित्रपटात एक व्यक्ती एका ठिकाणी कित्येक महिन्यापर्यंत फसलेली असते तरीही सुध्दा ती व्यक्ती त्या परिस्थिती वर मात करते, आणि त्या परिस्थिती मधून बाहेर निघते. तर चला पाहूया..

संकटावर कश्या प्रकारे मात करायची हे सांगणारे चित्रपट – Best 5 Optimistic Movies on How to Handle Difficult Situations in Life

Optimistic Movies
Optimistic Movies

१) लाईफ ऑफ पाय (२०१२) – Life of Pi 

लाईफ ऑफ पाय हा एक हॉलीवूड चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते की एक प्राणिसंग्रलयाचा मालक आपल्या प्राण्यांना एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जात असतो तेव्हा त्यांचं जहाज पाण्याच्या लाटांसामोर टिकत नाही आणि सर्वजण बुडून जातात पण त्या व्यक्तीचा मुलगा आणि एक वाघ एका छोट्या जहाजावर कसे तीन चार महिने जिवंत राहतात या चित्रपटातून आपण पहा. आणि तुम्हाला सांगू इच्छितो या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

२) बरीड (२०१०) – Buried

रॉड्रिगो कोरतस निर्मित बरीड हा सुध्दा एक हॉलीवूडचा चित्रपट असून या चित्रपटात पॉल नावाची एक व्यक्ती जमिनीखाली ६ फूट एका ताबूत अडकते, तेही फक्त एक मोबाईल आणि लायटर सोबत, पॉल नावाची व्यक्ती वाचते की मरण पावते, हे त्या चित्रपटातच पाहा.

३) कास्ट अवे (२०००) – Cast Away

या चित्रपटामध्ये फेडेक्स कंपनी मध्ये काम करणारा एक व्यक्ती मलेशियाला जात असतो पण प्रवासादरम्यान विमान क्रॅश झाल्याने तो प्रशांत महासागराच्या एका बेटावर पडतो, या बेटावर तो आदि माणसासारखे जीवन व्यतीत करतो, तो जिवंत राहतो की तेथेच मरण पावतो, पहा चित्रपटात.

) पॅसेंजर (२०१६) – Passenger

पॅसेंजर ही २०१६ मध्ये निघालेली एक हॉलीवूड मूवी आहे. या चित्रपटाचे निर्माते मार्टन टिलडम आहेत, या चित्रपटात दाखवले आहे की एक विमान दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी निघाले आहे, त्या विमानातील सर्व व्यक्ती झोपेत आहेत परंतु जिम नावाची व्यक्ती वेळेच्या अगोदरच उठते आणि पुढे काय होते ते आपण पहा या बेस्ट मूवी मध्ये.

५) १२७ हवर्स (२०१०) – 127 hours

या चित्रपटात एक मुलगा १२७ तास म्हणजेच ५ दिवसांपेक्षा जास्त वेळ दोन पहाडांच्या मधात राहतो आणि जिवंत राहण्यासाठी तो प्राण पणाला लावतो. आणखी जास्त जाणून घेण्यासाठी पहा १२७ हवर्स.

आशा करतो या चित्रपटानां पाहून आपल्याला लॉक डाऊन चे दिवस आठवतील नाही आणि लॉक डाऊन चे दिवस काढण्यास मदत होईल, तर आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here