…अश्या प्रकारे झाली फोन वर हॅलो बोलण्याची सुरुवात. हॅलो हॅलो!

History of Hello

आज जवळ जवळ प्रत्येका जवळ एक फोन आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा संपूर्ण जगाशी जुळलेला आहे, तो त्याच्या घरून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो, फोन ने जगाला एकमेकांशी जोडले.

जेव्हा कोणत्याही एखाद्या व्यक्तीला आपण फोन करतो आणि फोन उचलल्या नंतर आपण सर्वात आधी जे शब्द बोलतो ते म्हणजे “हॅलो”.

हॅलो या शब्दाला बोलल्या नंतर आपण आपल्या पुढच्या संभाषणाला सुरुवात करतो, पण आपल्याला माहिती आहे का? कि, फोन वर सर्वात आधी हॅलो कोणी आणि का म्हटले होते. सोबतच हॅलो शब्दाची सुरुवात केव्हा पासून झाली.

नसेल माहिती तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो, तर चला आजच्या या लेखात आपण पाहूया कि फोन वर हॅलो बोलण्याची सुरुवात केव्हा आणि कशी झाली होती?

तर चला जाणून घेवूया.

अश्या प्रकारे झाली फोन वर हॅलो बोलण्याची सुरुवात. हॅलो हॅलो! – Origin of the Word Hello

Origin of the Word Hello
Origin of the Word Hello

टेलिफोन चा शोध – Telephone Invented

अलेक्जेंडर ग्राहम बेल यांनी १० मार्च १८७६ मध्ये टेलिफोन चा शोध लावला होता, त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सोबती मित्राला एक फोन केला तो मित्र होता वाटसन. आणि बेल यांनी त्याला फोन वर मला तुझी गरज आहे, असे म्हटले आणि त्याला आपल्याकडे बोलावून घेतले.

बऱ्याच लोकांच्या आतापर्यंत असं ऐकण्यात कि ग्राहम बेल याच्या पत्नीचे नाव हॅलो असल्यामुळे फोन वर हॅलो म्हणण्याची पद्धत सुरु झाली, पण आपल्याला मी सांगू इछितो कि या सर्व अफवां गोष्टी आहेत.

हॅलो नावाची बेल यांची ना कोणती पत्नी होती आणि नाही कोणती प्रेमिका. आणि नाही बेल यांनी सर्वप्रथम हॅलो नावाचा उच्चार आपल्या मुखातून काढला होता.

बेल फोन वर हॅलो नाही तर Ahoy असे म्हणत असत. आणि जेव्हा लोकांनी सर्वप्रथम फोन चा वापर सुरु केला तेव्हा लोक एकमेकांना Are You There. असे विचारत असत. यामागे असे कारण होते कि समोरच्या व्यक्तीला आपला आवाज व्यवस्थित जातो कि नाही.

पण एकदा थॉमस अल्वा एडिसन यांनी Ahoy ला हॅलो ऐकले आणि तेव्हापासून त्यांनी फोन वर सुरुवातीला हॅलो बोलण्याचा प्रस्ताव मांडला.

१८७७ मध्ये एडिसन यांनी या प्रस्तावाला पिट्सबर्ग सेंट्रल डिस्ट्रिक्ट आणि प्रिंटिंग टेलीग्राफ कंपनी चे मालक स्मिथ यांना पत्र लिहिले कि टेलिफोन वर जेव्हा बोलण्याची सुरुवात होईल तेव्हा सगळ्यांनी हॅलो या शब्दाचा उल्लेख करावा. आणि तेव्हा त्यांनीही हॅलो या शब्दाचाच सर्वप्रथम वापर केला होता.

त्यानंतर या शब्दाला सगळीकडे फोन वर म्हटल्या जाऊ लागले. हॅलो हा शब्द बेल यांची देन नसून एडिसन यांची देन आहे, पण टेलिफोन हे ग्राहम बेल यांचीच देन आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top