बैला बद्दल माहिती

Ox in Marathi

आपल्याकडे पुष्कळ पाळीव प्राणी आहेत. बैल हा त्यापैकीच एक प्राणी आहे. प्रामुख्याने शेतकरी लोक बैल पाळतात.

बैला बद्दल माहिती – Ox Information in Marathi

Ox Information in Marathi
Ox Information in Marathi
हिंदी नाव : बैल
इंग्रजी नाव : Ox

बैलाला चार पाय असतात. तसेच दोन डोळे, दोन कान, दोन शिंगे असतात. बैलाला एक लांब शेपटी असते. बैलाच्या मानेजवळ वर एक उंचवटा असतो, त्याला “खांदा’ म्हणतात.

बैलाचे पुष्कळ रंग असतात. यात काळा, पांढरा, तपकिरी असे अनेक रंग प्रामुख्याने आढळतात.

बैलाचे अन्न – Ox Food

बैल हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत, वाळलेला चारा (कडबा) खातो. तसेच अन्नपदार्थसुद्धा खातो.

जाती : बैलाच्या खिल्लारी, व जरसी अशा विविध जाती आहेत.

वयोमर्यादा : बैलाची वयोमर्यादा सर्वसाधारणपणे १५ ते २० वर्षे असते.

उपयोग :

हा प्राणी शेतात काम करण्यासाठी व ओझी वाहण्यासाठी फार उपयोगी पडतो. खेडेगावात एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी बैलगाडीचा उपयोग होतो. बैलाच्या शणाचा पण उपयोग होतो. शेतकरी नांगरणी, पेरणी यांसारखी कामे बैलांकडून करवा घेतात.

बैलाचे वजन – Ox Weight

बैलाचे वजन साधारणपणे २५० ते ३०० किलोग्रॅमपर्यंत अस शकते.

हा प्राणी शेतकऱ्यांना फार उपयुक्त आहे. त्याला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हटले जाते. वर्षातुन एकदा एका विशिष्ट दिवशी बैलाची पूजा करतात, त्या दिवसाला बैल पोळा किंवा बेंदूर म्हणतात, त्या दिवशी बैलाला छानपैकी सजवले जाते. पुरणपोळी खायला दिली जाते. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या या प्राण्याला वर्षातून एकदा सुट्टी मिळते. बैलाचा उपयोग ओझी वाहण्यासाठी, तेलाचा घाणा चालविण्यासाठी होतो. बरेच लोक बैलांना पाळून त्यांना भरपूर प्रमाणात चांगले खायला घालून, धष्टपुष्ट करून ते विकून अर्थोत्पादन करतात. खेडेगावांमध्ये विविध यात्रांमध्ये

बैलगाड्यांच्या शर्यती लावतात. त्यामुळे बैल हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. बैलाची विष्ठा म्हणजे शेणखत म्हणून शेतात वापरतात.

मोठ्या रस्त्यावरून जाताना मोटारीच्या दिव्याचा उजेड समोरून येणाऱ्या बैलगाडीवर फेकल्यास बैलाच्या डोळ्यात विजेऱ्या पेटल्यासारखे वाटण्याचे कारण हेच आहे. बैलाच्या डोळ्यात स्फटिकासारखा भाग असल्यामुळे त्याला रात्रीच्या अंधारातही दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here