पाणीपुरी ची सुरुवात भारतात कोठे झाली? माहिती करून घ्या या लेखातून

History Of Pani Puri

जवळ जवळ सर्वांनाच पाणी पुरी खायला आवडते. पाणी पुरीचे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. विशेष करून महिला मंडळ यांना पाणी पुरी खाणे खूप जास्त आवडते. आपण बरेचदा पाणी पुरी खाण्यासाठी संपूर्ण परिवाराच्या सोबत संध्याकाळच्या वेळी बाहेर जातो.

पण पाणी पुरी खाल्ल्या नंतर कधीतरी आपल्याला एक प्रश्न पडला असेल की आपण जी पाणी पुरी आवडीने खातो त्या पाणी पुरीचा शोध कुठं लागला असेल, किंवा या पाणी पुरीची सुरुवात कोठून झाली असेल. तर आपण आजच्या लेखात पाहणार आहोत की पाणी पुरीला सर्वात आधी कोठे बनविल्या गेल्या. आणि या पाणी पुरीचा थोडक्यात इतिहास च जाणून घेऊया.आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया..

हा आहे पाणीपुरीचा इतिहास – Pani Puri History in Marathi 

Pani Puri History
Pani Puri History

पाणी पुरी काय आहे? – What is Pani Puri

रव्या मैदा यांचे मिश्रण असलेल्या पुरीला छोट्याश्या गोल आकारात बनवून त्या पुऱ्यांना तेलात तळून त्यांना फुगलेली छोटीशी पुरी बनवतात. आणि त्या फुगलेल्या पुरीत थोड्याशा प्रमाणात आलू टाकतात. पुदिना, हिरव्या मिरचीची चटणी, कोथिंबीर आणि काळे नमक यांचे मिश्रण करून बनविलेले पाणी हे त्या फुगलेल्या पुरीत टाकले जाते. आणि खायला दिल्या जाते. पाणी पुरी ला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावे आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते.

पाणीपुरीचा इतिहास थोडक्यात – Pani Puri History

पाणी पुरीचा असा काही ठराविक इतिहास नाही आहे, परंतु सुरुवातीला चीन मधून आलेल्या काही प्रवाशांनी आपल्या पुस्तकांमध्ये पाणी पुरीचा समावेश केल्याचे आपल्याला दिसून येते. मग ते Faxian असो Xuanzang असोत. असे म्हटल्या जात की पाणी पुरी ला सुरुवातीला गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले मगध या साम्राज्यात बनविण्यात आले होते. आणि सुरुवातीला पाणी पुरी फक्त पाणी पुरी म्हणून नाही बनविल्या जायची तेव्हा पाणीपुरी सोबत खायला चिवडा,आणि अन्य खाद्य पदार्थ देण्यात येत असत.

तेव्हाचे मगध आताचे बिहार आहे म्हणजे पाणी पुरी चा जन्म हा बिहार मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. यावर आधारित एक दंतकथा सुध्दा प्रचलित आहे. ती अशी की जेव्हा महाभारताच्या वेळी द्रौपती चे पाच पांडवांसोबत लग्न झाले होते, तेव्हा द्रौपती जेव्हा पाचही पांडवांसोबत आपल्या सासरी आली तेव्हा तिला कुंती ने असा खाद्य पदार्थ बनवायला लावला होतो ज्यामुळे पाचही पांडवांचे पोट भरेल. तेव्हा द्रौपतीने आपल्या ज्ञानाचा आणि कलागुणांचा वापर करून पाणी पुरीला बनविले. आणि पाचही पांडवांना खायला दिले आणि पाणी पुरी खाल्याने पाचही पांडवांचे पोट भरले, आणि कुंतीने तिला त्यासाठी वरदान दिले होते. असे दंतकथेत आपल्याला ऐकायला मिळते.

पाणी पुरीला सर्वात आधी भारतात बनविल्या गेल्याचे आपल्याला लक्षात येऊन जाते, सुरुवात जरी बिहार मधून झाली तर आज संपूर्ण भारतात पाणी पुरीला खूप चांगल्या प्रकारे चवीने खाण्यात येते. भारतात असे कोणतेही शहर नसेल जिथे आपल्याला पाणी पुरी पाहायला मिळणार नाही. यावरून आपण समजू शकता की पाणीपुरी भारतात किती जास्त प्रमाणात पसंत केली जात असेल.

वरील लेखात आपण पाणीपुरी विषयी थोडक्यात माहिती पहिली तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, तसेच परिवारातील सदस्यांना सुध्दा शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top