Facts About Polonium 210
जगात सर्वात जास्त विषारी साप आपल्याला माहिती असेल, की ज्याचा एक डंख जरी आपल्या शरीरावर झाला तरी आपल्याला विषबाधा होते. तो साप म्हणजे किंग कोबरा पण सापाच्या शरीरात तर आधीच विष असते जे तो त्याच्या जीभेने बाहेर टाकतो. पण पृथ्वीवर असेही एक विष आहे जे हजारो लोकांना फक्त क्षणार्धात मृत्यूच्या तोंडात घेऊन जाऊ शकते. आणि त्यासाठी एक किलो किंवा दोन किलो विषाची गरज नाही तर गरज आहे फक्त १ ग्रॅम विषाची. तर आजच्या लेखात आपण या विषाविषयी जाणून घेणार आहोत की हे विष कोणते आहे? याचा आविष्कार कधी झाला? सोबतच याचा आविष्कार कोणी केला? आणि या विषा मुळे सर्वात आधी कोणी आपले प्राण गमावले? तर चला पाहूया सर्वात हानिकारक विष.
आपल्याला माहिती असणार की साईनाईड हे एक विष आहे आणि ह्या विषा ला सुध्दा खूप हानिकारक विष समजल्या जातं परंतु ह्यापेक्षा ही हानिकारक एक विष आहे त्या विषाचे नाव आहे पोलोनियम २१०. जगातील सर्वात हानिकारक विष म्हणून याला ओळखल्या जात. पण बऱ्यापैकी लोकांना ह्याबद्दल माहिती नाही आहे. हे विष खूप कमी प्रमाणात सुध्दा हजारो लोकांचा बळी घेऊ शकते. हे खूप हानिकारक विष म्हणून ओळखण्यात येते. आपण या बद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पोलोनियम २१० जगातील सर्वात विषारी पदार्थ – Polonium 210 The most toxic substance in the world
पोलोनियम २१० हा एक रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहे जो शरीरात गेल्यावर रेडीएशन सोडतो आणि शरीरातील सर्व भागांना नष्ट करतो, सोबतच डीएनए आणि शरीरातील रोग प्रतिकार शक्ती ला सुध्दा पूर्णपणे नष्ट करतो. ज्यामुळे कोणत्याही प्राण्याला ह्याचे सेवन केल्यावर जीव गमवावा लागतो. मेलेल्या शरीरात हया विषाला शोधणे भयंकर कठीण काम आहे. भारतात ह्या विषा ला शोधण्याची कोणतीही चाचणी अजून उपलब्ध झालेली नाही.
पोलोनियम २१० या रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थाचा शोध महान भौतिकशास्त्रज्ञ तसेच रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी १८९८ मध्ये केली होती. त्यांना रेडियम च्या शुद्धीकरणा साठी रसायनशास्त्राचा नोबेल मिळाला होता, सोबतच रेडिओ ऍक्टिटीव्ही साठी सुध्दा त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. पोलोनियम २१० या पदार्थाचे सुरुवातीचे नाव रेडियम एफ असे ठेवण्यात आले होते. परंतु त्याचे नाव बदलवून पोलोनियम २१० असे करण्यात आले.
शास्त्रज्ञांचे असे मत आहे की जर मानवाच्या शरीरात या विषाचा एक कण सुध्दा गेला तर त्या व्यक्तीचा लगेच मृत्यू होऊ शकतो. आणि या विषाला जेवणात दिले तर कोणाला माहिती सुध्दा होणार नाही कारण या विषाला कुठल्याही प्रकारची चव नाही. या विषाची पहिली शिकार झाली होती मेरी क्युरी यांची पुत्री ईरीन ज्यूलियट क्युरी. ईरीन ने या विषाचा छोटासा कण खाऊन पाहिला होता. ज्यामुळे तीचा लगेच मृत्यू झाला होता.
असे मानले जाते की इस्राईल चा सर्वात मोठा शत्रू फिलिस्तीनी नेता यासिर अराफात ची मृत्यू सुध्दा याच विषामुळे झाली होती, याची चाचणी करण्यासाठी त्याचे शव काही वर्षांनंतर कब्रिस्थान मधून बाहेर काढण्यात आले होते तेव्हा स्वीझेर्लंड च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला होता की फिलिस्तीनी नेता यासिर अराफात याच्या शरीरात या विषाचे कण आढळले होते.
तर ही माहिती होती जगातील सर्वात हानिकारक विषा विषयी आशा करतो आपल्याला आवडली असणार आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्या नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!