जगातील ५ ठिकाणे जेथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे

Protected Area in World 

आपण बऱ्याच ठिकानांविषयी ऐकलेलं, वाचलेलं आणि कुठेतरी पाहिलेलं असेलच. कारण जगात असे बरेच ठिकाणे आहेत जे प्रसिध्द आहेत आणि त्या ठिकानांची चर्चा खुप कमी ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण जगात बरेच ठिकाणे असेही आहेत जेथे कोणालाही जायला परवानगी दिल्या जाते. पण खूप कमी असे ठिकाणे आहेत जेथे लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. आपल्यालाही या ठिकाणांची माहिती असेल तर चांगलेच आणि जर माहिती नसेल तर आजच्या लेखात आपल्याला ५ अश्या ठिकाणांची माहिती देणार आहोत जेथे प्रवेश निषेध आहे.

या ठिकाणांवर जर माणसाला जाऊ दिल्या जात नसेल तर आपण विचार करू शकता की हे ठिकाणे किती भयंकर किंवा अनोखे असतील, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार, तर चला पाहूया जगातील असे काही ५ ठिकाण जेथे जाण्यास परवानगी नाही आहे. जगात काही ठिकाणे आहेत जेथे प्रत्येकाला जाण्यास परवानगी नाही आहे आणि त्यापैकी काही ठिकाणे खाली दिलेली आहेत.

जगातील असे काही ठिकाण जिथे कुणालाही जाता येत नाही – Protected Areas in the World

Protected Areas in the World
Protected Areas in the World

१) लसकस गुफा – Lascaux Cave 

ही गुफा पुरातन काळातील आहे. लसकस गुफेला १९४० मध्ये शोधल्या गेले होते. २० हजार वर्षे जुनी ही गुफा आहे. ही गुफा फ्रांस देशात आहे आणि या गुफेच्या भिंतीवर आदिमानवांच्या काळातील हजारो चित्रे आहेत. आणि या गुफेत कोणालाही जायची परवानगी नाही आहे यामागील कारण असेही आहे की ही गुफा खूप जुनी आहे म्हणून कधीही ही गुफा जमीनदस्त होऊ शकते, आणि दुसरे कारण असे की या गुफेत वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक किडे आहेत, ने मनुष्याला चावल्या नंतर मरण सुध्दा देऊ शकतात. त्यामुळे या गुफेत जायला कोणालाही परवानगी नाही आहे.

२) जपानचे एक मंदिर – A Temple in Japan

या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे ठिकाण हे जपान मधील आहे. त्या ठिकाणचे नाव आहे ‘द ग्रैंड श्राइन ऑफ आईज’ हे जपानच्या राजघराण्याचे एक मंदिर आहे आणि येथे राजघराण्यातील व्यक्ती आणि पुजारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे.

हे मंदिर जपान च्या शिंटो शहरात वसलेलं आहे. या मंदिराची विशेषतः म्हणजे या मंदिराला दार २० वर्षात तोडल्या जाते आणि पुन्हा निर्माण केल्या जाते. हे जगात असे ठिकाण आपल्याला पाहायला मिळत ज्या ठिकाणी बाकी कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे शिवाय राजघराण्या च्या लोकांना सोडून.

३) जमिनीतील बियाणे भांडार केंद्र – Soil Seed Storage Center

हे बियाणे भांडार केंद्र नॉर्वे आणि नॉर्थ पोल यांच्या मध्ये स्वालबर्ड शहरात आहे, आणि या भांडाराला जमिनीच्या खाली ४३० फूट खोल बनविल्या गेले आहे. येथे संपूर्ण जगातून कमीत कमी वेगवेगळ्या प्रजातीचे १० लाखाच्या वर बियाणे संकरित केल्या गेले आहेत. आणि या बियाणांना एमर्जन्सी साठी सुरक्षित ठेवल्या गेले आहे. आणि या ठिकाणावर त्याच लोकांना जाण्याची परवानगी मिळते जे तेथे काम करतात किंवा जे आपल्या नवीन बियाणांना सुरक्षित ठेवू इच्छितात. बाकी कोणालाही या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही आहे.

४) व्हेटिकन सिटी मधील एक गुप्त ठिकाण – Secret Place in Vatican City

व्हेटिकन सिटी च्या एका गुप्त ठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे कारण या ठिकाणी पुरातन काळातील पुस्तके आणि कागदपत्रं सांभाळून ठेवल्या गेलेली आहेत, या ठिकाणी पोप आणि काही खास व्यक्तींना ओळख दाखवल्या नंतर आतमध्ये जाण्याची परवानगी मिळते. परंतु बाहेरील कोणत्याही व्यक्तीला येते प्रवेश वर्जित केलेला आहे.

५) हर्ड आयलँड – Heard Island

हर्ड आयलँड हे ऑस्ट्रेलिया मधील ज्वालामुखी असलेलं एक बेट आहे. आणि या बेटावर धोका असल्याने पर्यटकांसाठी या बेटावर जाण्यासाठी तेथील सरकार ने बंधी घातली आहे. कारण तेथे जीवाचा धोका आहे. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला तेथे जाण्याची परवानगी नाही आहे.

तर आजच्या लेखात आपण पाहिले जगातील ५ असे ठिकाणे ज्या ठिकाणी कोणालाही जायची परवानगी नाही आहे. तर आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here