Putalabai Wife of Shivaji Maharaj
उभं आयुष्य छत्रपती शिवरायांना मातोश्री जिजाबाई…सईबाई यांच्यानंतर जर कुणाचा आधार वाटला असेल तर त्या होत्या धाकल्या राणीसाहेब पुतळाबाई!
आपलं संपूर्ण जीवन महाराजांच्या चरणांकडे पाहून ज्या पुतळाबाईंनी वेचलं, कधीही खालची मान वर केली नाही, भोसले घराण्याची मान, मर्यादा, अब्रू, इभ्रत, प्राणा पलीकडे जपणाऱ्या पुतळाबाईंनी महाराजांच्या निधना नंतर मात्र हिम्मत हरली.
राणीसाहेब पुतळाबाई भोसले – Putalabai Information in Marathi
नाव (Name): | पुतळाबाई भोसले |
घराणे: | पालकर |
भाऊ (Brother): | नेताजी पालकर |
विवाह (Husband): | छत्रपती शिवरायांसोबत 1653 साली संपन्न झाला |
मृत्यू (Death): | 27 जून 1680 |
पुतळाबाई या छत्रपती शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी. यांचा विवाह 1653 मध्ये संपन्न झाला त्या पालकर घराण्यातील होत्या. पुतळाबाईंचे भाऊ म्हणजे नेताजी पालकर. पुतळाबाईंना मुल-बाळ झाले नाही, त्या महाराजांच्या निष्ठावंत जोडीदार होत्या.
महाराजांनी ज्या स्वराज्याची जडण-घडण प्राणापलीकडे केली त्यात पुतळाबाईंचे अमूल्य योगदान आहे. त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या. शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपविला.
पुतळाबाईंचा महाराजांमध्ये खूप जीव होता…महाराजांच्या निधनानंतर पुतळाबाई अत्यंत शोकमग्न झाल्या…महाराजांच्या आठवणीनी व्याकूळ झालेल्या पुतळाबाई एकाकी पडल्या.
27 जून 1680 साली महाराजांच्या निधनानंतर अवघ्या 85 दिवसांनी पुतळाबाईंनी देह ठेवला.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ पुतळाबाईंबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
*संभाजीराजे राणी पुतळाबाईंच्या महाली विराजमान झाले होते……*
राणी पुतळाबाई म्हणाल्या,
‘शंभूराजे –
‘जी मासाहेब “.
आम्हाला मासाहेब म्हणता. आमची एक मागणी मान्य करता ! ”
आवाजाला थेट आबासाहेबांची झाक आली होती. ” मासाहेब, मागणी कशाला करता ? आज्ञा करा आपल्या शंभूराजांना…
संभाजीराजे अदबीने बोलून गेले.
मग आमची अंतिम आज्ञा माना.
” काऽऽय ? अंतिम- ‘
” होय. आईच्या माळेवर हात ठेवून सांगा- आज्ञा पाळू म्हणून
” मासाहेब, असे कैचीत का पकडता ? स्पष्ट सांगाना आधी. ”
‘नको’ आधी शब्द द्या.
‘जी पाळू” ”
“शंभूराजे, स्वारी गेली. आता आमचा जीव अजिबात लागत नाही.
आता हे आयुष्य मिटवावे म्हणतो आम्ही! आम्ही स्वामीच्या मोजड्याची दौलत उराशी घेऊन अग्नी भक्षण करणार ! सती जाणार — सिद्धता करा ! ” —
” मासाहेब असे तुम्ही शब्दात पकडले !
आम्हाला · आपल्या शंभूबाळाला एकटे टाकून जाणार! आपला — मायेचा पदर काढून घेणार! मग आम्ही कुणाच्या मायेवर जगावे ? आम्ही आप्तगणाकडून खरेच फसवले जात आहोत ! एक एक मायेचे माणूस आम्हाला सोडून जात आहे ! आमच्या कुंडलीत तो योग आहे आम्ही तरी काय करणार ?
” संभाजीराजांनी जड अंतःकरणाने राणी पुतळाबाईंचा निरोप घेतला.
सती जाण्याचा तो दिवस उगवला. भल्या पहाटेच स्नान घेऊन जगदीश्वराचे.
देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या राणी पुतळाबाई सातमहालाच्या ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या.
त्यांच्या अंगी हिरव्या शालूचा सौभाग्य नेसू, गळ्यात काळ्या मण्यांचा
पोत आणि कपाळी मेणमळत्या दाट कुंकवाच्या मळवटाच्या आडव्या रेषा स्पष्ट दिसत होत्या.
आणि राणी पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या.
पूर्वीभिमुख होत त्यांनी बैठक घेतली.
महाराजांचे चढाव त्यांनी हृदयाशी कवटाळले होते. चढत्या, बाजुंनी चढत्या माणसांनी सतीचा देह चंदनकाष्ठांनी
गळ्यापर्यंत रचला.
उमाळा फुटू नये म्हणून, ओठ दाताखाली दाबत मागून आलेल्या राजोपाध्यांनी उचलून भरलेल्या तबकातील कर्पूरवड्यांची मुठ संभाजी
राजांनी भरली.
मुठीमागून मुठी त्या ओंजळीत पडू लागल्या.
सतीला चुड मिळाला.
पेटत्या चंदन काष्ठांतून अग्नीच्या ज्वाला उंच उंच आकाशातून भिडू लागल्या. चितेतून अस्पष्ट क्षीण आवाज येत होता स्वामी – स्वामी- स्वामी ”
*शांतपणे पावले टाकत महाराज स्वर्गी गेले आणि महाराजांच्या मागोमाग सकलसौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित राणी पुतळाबाई सती गेल्या ..!!*
आषाढ ।। शु एकादशी, शके १६०२ . *दि २७ जून १६८०* 📜
🌼 *पुतळाबाई_मातोश्री*🌼