Home / History / कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

कुतुबुद्दिन ऐबक / Qutubuddin Aibak हे मध्यकालीन भारताचे शासक होते.ते दिल्ली या जहागिरीचे शासक सुद्धा होते. ते गुलाम बक्ष यांच्या आधीचे सुलतान होते. ऐबक समुदाय मुळचे तुर्कस्थानचे.ते फक्त्त १२०६ ते १२१० पर्यंत चार वर्षे सुलतान होते.

Qutubuddin Aibak

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास / Qutubuddin Aibak History In Marathi

एका काझी ने कुतुबुद्दिन यांचे पालन पोषण केले.त्यांना उत्तम तिरंदाजी,तलवारबाजी,धार्मिक शिक्षण आणि घोडेस्वारी इत्यादींचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या गुरूंच्या मृत्युनंतर गुरुपुत्राने त्यांना तेथील शासक मोहम्मद घौरी यास विकून टाकले. कुतुबुद्दिन याने आपल्या अंगगुणांच्या जोरावर मोहम्मद घौरी यांना आकर्षित केले. कुतुबुद्दिन त्यांचा चाहता बनला.

मोहम्मद घौरी ने त्यांना मोठा मातब्बर सरदार बनविले. कुतुबुद्दिन ऐबकांनी उत्तर भारताच्या काही राज्यांवर आपला अधिकार गाजवला.मोहम्मद घौरींचे भारतात कारस्थान वाढवण्यात कुतुबुद्दिन ऐबकांचा मोठा सहभाग होता.त्यावर खुश होऊन मोहम्मद घौरीने मध्य भारतावर राज्य करण्याचा अधिकार दिला.

अफगाणिस्तान प्रांतात आपल्या साम्राज्याचा विस्तार करीत भारतातील बरयाच भागांवर आपला कब्जा करून एक मजबूत व शक्तिशाली शासन म्हणून उदयास आला होता. त्याचा साम्राज्यविस्तार संपूर्ण अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि उत्तर भारतातील काही राज्यांपर्यंत पसरला होता. आपल्या विलक्षण कामगिरीमुळे कुतुबुद्दिन ऐबकास खुश होऊन मोहम्मद घौरीने त्यास साल १२०६ मध्ये दिल्लीचा सुलतान ही पदवी बहाल केली.

एका युद्धात मोहम्मद घौरीचे निधन झाल्यानंतर त्याने घोरीचे साम्राज्य सांभाळण्याचे भरगोस प्रयत्न केले परंतु कुतुबुद्दिन ऐबकास अपयश आले.

मध्यंतरी दिल्लीचा सुलतान असताना कुतुबुद्दिन ऐबकांनी कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद आणि कुतुबमिनार यांचे निर्माण करायला सुरुवात केली.परंतु या निर्माण कार्यांना ते स्वतःदेखत पूर्ण करू शकले नाही.हे निर्माण पृथ्वीराज चौहान यांनी बांधलेल्या मंदिरांना पूर्णपणे नष्ट करून त्या जागेवर केले जात होते.ह्या मंदिरांचे काही अवशेष आजही मशिदी बाहेर पाहायला मिळतात.ह्या निर्माण कार्याला शमसुद्दीन अल्तमश यांनी पूर्ण केले.

१२१० मध्ये पोलो खेळत असताना घोड्यावरून पडून जबर मार बसून कुतुबुद्दिन ऐबक यांचा मृत्यू झाला.सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील अनारकली बाजाराजवळ त्यांना पुरवले गेले होते.नंतर त्यांचा पुतण्या शमसुद्दीन अल्तमश त्यांचा उत्तराधिकारी बनला.सर्व राज्यकारभार त्याच्या हाती आले. त्याने मामलुक उर्फ गुलाम साम्राज्य पुढे नेले.

शमसुद्दीन अल्तमश यांनी दिल्लीमध्ये कुव्वत-उल-इस्लाम आणि कुतुबमिनार यांचे निर्माण पूर्ण केले.अजमेर येथे अढाई दिन झोपडी सुद्धा त्यांनी तयार करून घेतली.आपल्या काकाच्या आठवणीत अल्तमश याने कुतुबमिनारचे निर्माण कार्य पूर्ण केले.

प्राचीन लेखांमधील उल्लेखानुसार कुतुबमिनार कुतुबुद्दिन ऐबकाच्या विजयाचे प्रतिक समजले जाते.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कुतुबुद्दिन ऐबक बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Qutubuddin Aibak History – कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराची संपूर्ण माहिती – Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur “अवघे गरजे पंढरपुर . . . अवघे गरजे पंढरपुर . …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *